Service: 1 ऑ़क्टोबरपासून एकदम सैराट.. कामे होतील सुपर फास्ट..

Service: 1 ऑ़क्टोबरपासून देशातील टेलिकॉम क्षेत्रात क्रांती येणार आहे. त्याचा झंझावात तुमच्या मोबाईलमध्ये येणार आहे..

Service: 1 ऑ़क्टोबरपासून एकदम सैराट.. कामे होतील सुपर फास्ट..
आता 5G चं वारं Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 25, 2022 | 8:35 PM

नवी दिल्ली : भारतात येत्या 1 ऑ़क्टोबरपासून टेलिकॉम क्षेत्रात (Telecom Sector) क्रांती येणार आहे. त्याचा झंझावात तुमच्या मोबाईलमध्ये (Mobile) जाणवणार आहे.आता आम्ही कोणत्या क्रांतीची गोष्ट करतोय याचा अंदाज तुम्हाला एव्हाना आला असेल. तर देशात 5G चं वारं आलं आहे. त्याची सुरुवात 1 ऑक्टोबरपासून होत आहे.

National Broad Brand Mission ने याविषयीची माहिती ट्विट करुन दिली आहे. त्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय मोबाईल काँग्रेसमध्ये 5जी सेवा सुरु करणार आहेत. ट्वीट नुसार, डिजिटल ट्रांसफॉर्मेशन आणि कनेक्टिविटीला नवीन आयाम देण्याचा प्रयत्न होणार आहे.

1 ऑ़क्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते, आशियातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञानांचा मेळा असणाऱ्या इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये 5जी सर्व्हिसचे उद्धघाटन करतील. म्हणजे देशात 5G सेवेचा श्रीगणेशा पंतप्रधानांच्या हस्ते होत आहे. ही एका क्रांतीपेक्षा कमी गोष्ट नाही. या सेवेमुळे भारत जगात विकसीत राष्ट्रांच्या पंक्तीत जाऊन बसेल.

हे सुद्धा वाचा

दूरसंचार विभागाने (DoT) इंडिया आणि सेल्युलर ऑपरेशन्स असोसिएशन ऑफ इंडिया (COAI) यांच्या संयुक्त उपक्रमातून मोबाईल काँग्रेसचे आयोजन करण्यात येते. इंडिया मोबाईल काँग्रेस केवळ भारतातच नाही तर आशियातील सर्वात मोठी दूरसंचार, मीडिया आणि तंत्रज्ञानाचा मंच असल्याचा केंद्र सरकारचा दावा आहे.

केंद्रीय IT मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, अत्यंत कमी वेळेत केंद्र सरकारने 5जी सेवेचे लक्ष्य ठेवले आहे. सध्या 80 टक्के क्षेत्र व्यापण्यावर लक्ष्य केंद्रीत करण्यात आले आहे. उत्तर भारतातून ही योजना मजबूत होईल.

पहिल्या टप्प्यात भारतातील जवळपास 13 शहरात 5जीची सेवा सुरु करण्यात येणार आहे. तर दुसरीकडे भारतीय दूरसंचार कंपनी एअरटेल एका महिन्याच आतच सर्वदूर 5जीची सेवा सुरु करणार असल्याची चर्चा आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत काही प्रमुख शहरात कंपनी 5जीची सेवा सुरु करण्याचा प्रयत्न करत आहे.

तर आघाडीची कंपनी रिलायन्स जिओनेही देशात 5जी नेटवर्कमध्ये छापा सोडण्यासाठी कंबर कसली आहे. कंपनीने क्वालकॉम या कंपनीसोबत हातमिळवणी केली आहे. एवढंच नाही तर कंपनी गूगल क्लाऊड विकसीत करण्यसाठीही प्रयत्न करत आहे.

सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.