UPI Payment Record | झटक्यात पेमेंटवर स्मार्ट नागरीक फिदा, जुलै महिन्यात 6 अरब युपीआय व्यवहार
UPI Payment Record | युपीआय पेमेंटवर नागरीक फिदा असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले. देशभरात जुलै महिन्यात 6 अरब युपीआय व्यवहार झाल्याची आकडेवारी सरकारने प्रसिद्ध केली आहे.
UPI Payment Record | सहज, सोपं आणि सरळ पद्धतीने अगदी काही सेकंदात समोरच्या देय रक्कम अदा होत असल्याने स्मार्टफोन (Smart Phone) वापरकर्त्यांनी युपीआय पेमेंटला (UPI Payment) डोक्यावर घेतले आहे. रोखतील व्यवहार आणि कार्डांव्यतिरिक्त, नागरिकांनी UPI द्वारे अधिक व्यवहार केल्याची आकडेवारी दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीच जाहीर केली आहे. जुलै महिन्यातच 6 अब्ज UPI व्यवहार झाल्याची माहिती त्यांनी ट्विटवर दिली. 2016 नंतरचा व्यवहारातील हा पहिला मोठा रेकॉर्ड असल्याची माहिती त्यांनी दिली. 2016 मध्ये पहिल्यांदा रेकॉर्डब्रेक (Record break) युपीआय पेमेंट करण्यात आले होते. त्यानंतर युपीआय दरवर्षी नवे उच्चांक गाठत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय लोक नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत अर्थव्यवस्था पारदर्शक करत असल्याबद्दल कौतूक केलं आहे. डिजिटल पेमेंट विशेषतः COVID-19 साथीच्या काळात उपयुक्त ठरले आणि ते नागरिकांच्या जीवनांचा महत्वाचा हिस्सा झाले आहे.
कोट्यवधींची उलाढाल
राष्ट्रीय देयके महामंडळाने (NPCI) याविषयीची आकडेवारी समोर आणली आहे. त्यानुसार, जुलैमध्ये एकूण 6.28 अब्ज व्यवहार झाले, त्यापैकी 10 लाख 62 हजार कोटी रुपयांचे व्यवहार करण्यात आले. NPCI, UPI चे सर्व कामकाज सांभाळते. एका महिन्याच्या आकडेवारीवर नजर टाकली तर, UPI मध्ये 7.16% ची उडी मारली आहे. मूल्याचा विचार करता ही वाढ 4.76% आहे. एक वर्षापूर्वीचा रेकॉर्ड पाहता, UPI व्यवहार दुप्पट झाले आहेत आणि एका वर्षात मूल्यात 75% वाढ झाली आहे.
This is an outstanding accomplishment. It indicates the collective resolve of the people of India to embrace new technologies and make the economy cleaner. Digital payments were particularly helpful during the COVID-19 pandemic. https://t.co/roR2h89LHv
— Narendra Modi (@narendramodi) August 2, 2022
मार्च 2022 इलेक्ट्रॉनिक्स आणि आयडी मंत्रालयाने अहवाल दिला होता की डिजिटल पेमेंटमध्ये वर्षानुवर्षे एक नियमीत वाढ होत आहे. सरकारचं ही या योजनेला पाठबळ मिळाले असल्याने ही वाढ स्थिर आहे. आर्थिक क्षेत्र आणि अर्थव्यवस्थेच्या डिजिटायझेशनवर सरकारने लक्ष केंद्रित केलं आहे. भीम UPI लोकांची सर्वात मोठी पसंती म्हणून उदयास आली आहे.
कोविडमध्ये डिजिटल पेमेंटमध्ये वाढ
28 फेब्रुवारी 2022 पर्यंत BHIM UPI द्वारे 452.75 कोटी डिजिटल पेमेंट करण्यात आले. त्यात 8.27 कोटी रुपयांचे व्यवहार झाले. कोविड-19 महामारीच्या काळात डिजिटल पेमेंटचा वापर झपाट्याने वाढला आहे आणि आरोग्य सेवा क्षेत्रात त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. कोविड काळात भीम UPI QR कोडद्वारे पेमेंटचा वापर झपाट्याने वाढवला. याचा परिणाम म्हणून, UPI हे आज पेमेंटचे सर्वात सोपे साधन म्हणून उदयास आले आहे.
सुरक्षितात ही जपली
डिजिटल पेमेंट व्यवहाराच्या इतर पद्धतींपेक्षा अधिक सुरक्षित मानण्यात येते. कारण त्यात मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन वापरल्या जाते. पडताळणीनंतरच समोरच्या व्यक्तीला पेमेंट केले जाते. त्यामुळे पेमेंट डेटाचे संरक्षण करते आणि सायबर गुन्ह्यांचा धोका कमी करते. सायबर गुन्ह्यांपासून डिजिटल पेमेंटचे संरक्षण करण्यासाठी मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन प्रभावी असल्याचे सिद्ध होते. ग्राहकाच्या डिजिटल पेमेंटचे फिशिंग, कीलॉगिंग, स्पायवेअर किंवा मालवेअरपासून संरक्षण करण्यात मदत करते. सायबर आर्थिक फसवणुकीपासून पेमेंटचे संरक्षण करण्यासाठी, रिझर्व्ह बँकेने तक्रार निवारणासाठी एक विशेष प्राधिकरणाची स्थापना केली आहे.