7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, महागाई भत्त्यामुळे खिसा खुळखुळणार

7th Pay Commission : लवकरच देशातील कोट्यावधी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होईल. केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ करण्याची शक्यता आहे. सध्याच्या डीएमध्ये तीन टक्क्यांची वाढ होण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

7th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज, महागाई भत्त्यामुळे खिसा खुळखुळणार
Follow us
| Updated on: Aug 06, 2023 | 2:53 PM

नवी दिल्ली | 06 ऑगस्ट 2023 : देशातील कोट्यवधी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी (Central Government) आनंदवार्ता आहे. लवकरच त्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार एक कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तीधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ (DA Hike) करण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार यावेळी महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ करु शकते. त्यामुळे सध्याचा 42 टक्के डीएमध्ये वाढ होऊन तो 45 टक्के होईल. अर्थात त्यासाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकांचा AICPI-IW (All India Consumer Price Index- Industrial Worker) आधार घेण्यात येईल.

कर्मचारी संघटनांची मागणी काय

मीडियामध्ये डीए हाईक विषयीची चर्चा रंगली आहे. त्यावर ऑल इंडिया रेल्वेमेन फेडरेशनचे महासचिव शिव गोपाल मिश्रा यांनी पीटीआयला प्रतिक्रिया दिली आहे. जून 2023 साठी सीपीआय-आयडब्ल्यूची आकडेवारी 31 जुलै रोजी जाहीर करण्यात आली आहे. महागाई भत्त्यात चार टक्क्यांची वाढ करण्याची मागणी कर्मचाऱ्यांनी केल्याचे मिश्रा यांनी स्पष्ट केले.

हे सुद्धा वाचा

केंद्रीय मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव

केंद्र सरकार तीन टक्के महागाई भत्ता देण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयातील कार्मिक खर्च विभाग त्यासाठीचा प्रस्ताव तयार करेल. हा प्रस्ताव मंजूरीसाठी केंद्रीय मंत्रीमंडळासमोर ठेवेल.

केव्हापासून लागू होईल भत्ता

डीएमधील वाढ 1 जुलै 2023 रोजी पासून प्रभावी असेल. सध्या कर्मचाऱ्यांना 42 टक्केने महागाई भत्ता मिळत आहे. डीएमध्ये यापूर्वी 24 मार्च 2023 रोजी वाढ झाली होती. ही वाढ यावर्षी 1 जानेवारीपासून लागू होती.

घरभाडे सवलतीत वाढ

महागाई भत्त्यात वाढ होईल. केंद्रीय कर्मचाऱ्यांना हाऊस रेंट अलाऊंन्समध्ये (House Rent Allowance) वाढ होऊ शकते असे वाटते. घरभाडे सवलतीत 3 टक्के वाढ अपेक्षित आहे. त्यामुळे 50 लाखांहून अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांना थेट फायदा होईल.

फिटमेंट फॅक्टरचा फायदा

अनेक दिवसांपासून केंद्रीय कर्मचारी आणि त्यांच्या संघटना फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ करण्याची मागणी करत आहेत. मीडियातील वृत्तानुसार, केंद्र सरकार त्यांच्या मागणीवर विचार करु शकतात. केंद्रीय कर्मचाऱ्यांना सध्या 2.57 टक्क्यांच्या हिशोबाने फिटमेंट फॅक्टरचा लाभ मिळाला. कर्मचारी हा भत्ता 3.68 टक्के करण्याची मागणी करत आहे. असे झाले तर कर्मचाऱ्यांचा मुळ पगार 18,000 रुपयांहून 26,000 रुपये होईल.

ग्राहक निर्देशांक वाढला

केंद्र सरकार, कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता निश्चित करण्यासाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकांचा AICPI-IW (All India Consumer Price Index- Industrial Worker) आधार घेते. महागाईत वाढ झाल्याने कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात वाढ होणार आहे. AICPI इंडेक्समध्ये 0.50 अंकांची तेजी आली आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना जुलै 2023 मधील महागाई भत्त्यात 4% अतिरिक्त फायदा होईल. महागाई भत्ता 46 टक्के होईल, असा अंदाज आहे.

महिन्याच्या शेवटी निर्देशांक जाहीर

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ग्राहक किंमत निर्देशांकावर निर्धारीत होतो. प्रत्येक महिन्याच्या शेवटी तो जाहीर करण्यात येतो. त्याआधारे महागाई भत्त्याचे गणित मांडण्यात येते. CPI(IW)BY2001=100 मार्चच्या 134.2 अंकांच्या तुलनेत मे महिन्यातील आकडा 134.7 अंक राहीला. यामध्ये 0.50 अंकांची भर पडली.

धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.