FD Return | हो, अगदी बरोबर, FD वरही 8 टक्के व्याज, कॉर्पोरेट एफडीचा पर्याय खुणावतोय..

FD Return | गेल्या तीन महिन्यात रेपो रेटमध्ये 1.40 आधार अंकाची वाढ झाली आहे. आरबीआयच्या या धोरणामुळे गुंतवणूकदारांनी मुदत ठेवींकडे मोर्चा वळवला आहे.

FD Return | हो, अगदी बरोबर, FD वरही 8 टक्के व्याज, कॉर्पोरेट एफडीचा पर्याय खुणावतोय..
मुदत ठेवीवर जोरदार परतावाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 05, 2022 | 4:00 PM

FD Return | गेल्या तीन महिन्यात रेपो रेटमध्ये (Repo Rate) 1.40 आधार अंकाची वाढ झाली आहे. आरबीआयच्या (RBI) या धोरणामुळे गुंतवणूकदारांनी मुदत ठेवींकडे मोर्चा वळवला आहे. किरकोळ महागाई दर (inflation rate) अजून ही मध्यवर्ती बँकेच्या लक्ष्यापेक्षा 2 ते 6 टक्क्यांनी अधिक आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत रेपो दर वाढण्याची दाट शक्यता आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेनेही व्याजदरात वाढीचे स्पष्ट संकेत दिले आहेत. आरबीआयने रेपो दरात वाढ केल्यास व्याजदर वाढतील. त्याचा फायदा एफडीत (FD) गुंतवणूक करणाऱ्यांना मिळेल.

सोयीनुसार गुंतवणूक करा

तुम्हाला एकरक्कमी गुंतवणूक करता येत नसेल. तर एफडीत थोडी थोडी गुंतवणूक करता येते. दर महिन्याला काही रक्कम मुदत ठेवीमध्ये जमा करा. त्यामुळे चांगल्या व्याजदरांचा तुम्हाला फायदा घेता येईल.

यापूर्वी दर वृद्धी नाही

जुलै महिन्यात मुदत ठेवीवरील व्याजदरात काहीच वाढ करण्यात आली नव्हती. त्यावेळी वास्तविक किरकोळ महागाई दर 6.71 टक्के होता. तर सरकारी बँका एफडीवर 5 ते 6 टक्के व्याज देत होत्या.

हे सुद्धा वाचा

कॉर्पोरेट एफडीचा पर्याय

जास्त परताव्यासाठी गुंतवणूकदारांनी कॉर्पोरेट एफडीचा पर्याय शोधला आहे. एका ठराविक कालावधीसाठी गुंतवणूक केल्यास त्यावर चांगला परतावा मिळतो. कंपन्या त्यावर ठरलेल्या व्याजदरानुसार परतावा देते.

कंपन्यांचे धोरण काय

या कंपन्यांना मोठ्या रक्कमेची गरज असते. बँकांकडून कर्ज घेताना त्यांना 15 ते 20 टक्के दराने व्याज मिळते. अशावेळी त्यांना थेट लोकांमध्ये जाऊन कॉर्पोरेट एफडीच्या माध्यमातून रक्कम जमा करता येते.

व्याजदर जास्त

बँकेतील मुदत ठेवींवरील व्याजदरांपेक्षा कॉर्पोरेट एफडीवर जास्त व्याज मिळते. 2 ते 3 टक्क्यांनी हे व्याज जास्त असते. सध्या कॉर्पोरेट एफडीवर 9 टक्क्यांपर्यंत व्याज मिळते. तर बँकांच्या मुदत ठेव योजनेवर गुंतवणूकदारांना अवघे 5 ते 6 टक्के व्याज मिळत आहे.

ग्राहकांचा फायदा

अर्थात जास्त व्याजदर असल्याने ग्राहक बँकांपेक्षा कंपन्यांच्या एफडीमध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असतात. परंतु, बँकांपेक्षा कॉर्पोरेट एफडीमध्ये जोखीमही तशीच असते हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

कंपनी एफडी की रेटिंग

ही गुंतवणूक करताना कंपनीचे रेटिंग तपासणे आवश्यक आहे. व्याज जास्त देते म्हणून त्या कंपनीच्या एफडीत गुंतवणूक करणे गरजेचे नाही. ही गुंतवणूक धोकादायक असल्याने गुंतवणूक करताना कंपनीची माहिती आणि तिचे एएए रेटिंग पाहूनच गुंतवणूक करा.

काही कंपन्या फसवतात

यातील काही कंपन्या मुदत ठेवीचा अवधी उलटल्यानंतरही ग्राहकांना ठेवीची रक्कम लवकर परत करत नाहीत. अथवा ठरवलेल्या व्याजदरात प्रक्रिया शुल्क जोडून कमी रक्कम देतात. त्याचाही विचार करणे आवश्यक आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.