चलनातून हटविलेल्या 2000 रु. नोटांपैकी इतक्या नोटा बँका परत आल्या, रिझर्व्ह बँकेने दिली माहीती
भारतीय रिझर्व्ह बॅंकेने दोन हजार रुपयांच्या नोटांना 30 सप्टेंबर 2023 पर्यंत बॅंकांत जमा करण्याची किंवा अन्य मुल्य वर्गाच्या नोटांत बदल्याचे आवाहन केले आहे.
नवी दिल्ली | 1 सप्टेंबर 2023 : दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून हटविण्याचा निर्णय सरकारने घेतल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना बॅंकामध्ये या नोटा बदलून घेण्यासाठी किंवा जमा करण्यासाठी 31 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. आतापर्यंत 2000 रुपये मुल्यांच्या एकूण 93 टक्के नोटा बॅंकांमध्ये परत आल्या असल्याची महत्वाची माहीती भारतीय रिझर्व्ह बॅंकेने शुक्रवारी जाहीर केली आहे. 19 मे 2023 रोजी दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भारतीय रिझर्व्ह बॅंकेने ( आरबीआय ) 19 मे 2023 रोजी 2000 रुपयांचे नोटा चलनातून मागे घेण्याची घोषणा केली होती. रिझर्व्ह बॅंकेने म्हटले आहे की बॅंकांतून आलेल्या माहीतीनूसार 31 ऑगस्ट 2023 पर्यंत बॅंकात नागरिकांनी जमा केलेल्या 2000 रुपयांचे नोटांचे एकूण मुल्य 3.32 लाख कोटी रुपये इतके आहे.
दोन हजाराच्या नोटा अशा परत केल्या
याचा अर्थ असा आहे की 31 ऑगस्ट 2023 मध्ये 2000 रुपयांच्या 0.24 लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात होत्या. प्रमुख बॅंकांचे एकत्रित आकडे पाहिले तर आतापर्यंत 93 टक्के नोटा बॅंकात परत आल्या. त्यापैकी 87 टक्के नोटा बॅंकेत नागरिकांनी जमा केल्या, तर 13 टक्के नोटांना अन्य मूल्य वर्गातील नोटांमध्ये नागरिकांनी बदलून घेतल्या. 31 मार्च 2023 रोजी चलनात अस्तित्वात असलेल्या 2000 रुपयांच्या नोटांचे एकूण मुल्य 3.62 लाख कोटी रुपये होते. 19 मे 2023 रोजी दोन हजाराच्या नोटा परत घेण्याची घोषणा झाली त्यावेळी त्यावेळी ते घटून 3.56 लाख कोटी रुपये इतके झाले होते.
नोटा बदल्यासाठी एक महिनाअवधी
भारतीय रिझर्व्ह बॅंकेने दोन हजार रुपयांच्या नोटांना 30 सप्टेंबर 2023 पर्यंत बॅंकांत जमा करण्याची किंवा अन्य मुल्य वर्गाच्या नोटांत बदल्याचे आवाहन केले आहे. चलनातून बाद झालेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा बॅंका परत करण्यासाठी अजून एक महिन्याचा अवधी आहे. परंतू जवळपास 93 टक्के दोन हजार रुपयांच्या नोटा बॅंकात परत आल्याने खूपच कमी नोटा चलनात राहील्या आहेत.