Pan Aadhaar Linking : आयकर खात्याचा मोठा दिलासा, पॅन-आधार लिंकिंगबाबत केला हा खुलासा

Pan Aadhaar Linking : आयकर खात्याने पॅनधारकांना मोठा दिलासा दिला. या 30 जूनपर्यंत पॅन-आधार कार्डची जोडणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. या पॅन कार्डधारकांना प्राप्तिकर खात्याने मोठा दिलासा आहे.

Pan Aadhaar Linking : आयकर खात्याचा मोठा दिलासा, पॅन-आधार लिंकिंगबाबत केला हा खुलासा
Follow us
| Updated on: Jul 01, 2023 | 4:16 PM

नवी दिल्ली : पॅन-आधार कार्ड लिंक (Pan-Aadhaar Card Linking) करण्याची अंतिम मुदत 30 जून 2023 उलटून गेली. 2017 मध्ये पॅन-आधार लिंकिंग करण्याबाबतचा नियम तयार करण्यात आला. हे दोन्ही कार्ड जोडणे बंधनकारक करण्यात आले. त्यासाठी वेळोवेळी मुदत वाढ देण्यात आली. तरीही नागरिकांनी दोन्ही कार्ड जोडणी केली नाही. त्यानंतर दंडासहित कार्ड लिकिंग अनिवार्य करण्यात आले. यापूर्वी मार्च 2023 पर्यंत जोडणीची सवलत होती. त्यानंतर ती या जूनपर्यंत वाढविण्यात आली. केंद्र सरकारने त्यानंतर यामध्ये वाढ केली नाही. पण आयकर खात्याने (Income Tax Department) पॅनधारकांना मोठा दिलासा दिला. या 30 जूनपर्यंत पॅन-आधार कार्डची जोडणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. या पॅन कार्डधारकांना प्राप्तिकर खात्याने मोठा दिलासा आहे.

असा मिळेल दिलासा अंतिम मुदतीपूर्वी ज्या पॅनधारकांनी दंड जमा केला आहे. तसेच दोन्ही कार्ड लिंकिंगसाठी प्रयत्न केला. पण कार्डची नोंदणी झाली नाही, अशांसाठी आयकर विभागाने खुलासा केला आहे. प्राप्तिकर खात्याने एक ट्विट केले आहे. त्यानुसार, ही प्रक्रिया पूर्ण करणाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

ई-मेल आला का आधार-पॅनकार्ड जोडणीसाठी दंडाची रक्कम भरली. पण पावती डाऊनलोड झाली नाही. पुढील प्रक्रिया कोणत्या तरी कारणाने पुढे सरकली नाही तर त्यांना संधी देण्याचा विचार होत आहे. कार्डधारकाने ई-पे-टॅक्स या वेबसाईटवर लॉगिंन करावे. त्याला दंड भरल्याची खातरजमा करता येईल. त्यानंतर आधार-पॅन लिंक करण्यासाठी तो पुढील प्रक्रिया पूर्ण करु शकतो. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर त्याला ई-मेल येईल. पण ही प्रक्रिया अडकली असल्यास अशा कार्डधारकांना आधार-पॅन लिंक करण्याची संधी देण्यासंबंधीचा विचार होणार आहे. त्यासंबंधीची घोषणा लवकरच करण्यात येईल.

हे सुद्धा वाचा

पॅन-आधार जोडण्याचा नियम पॅन-आधार कार्डशी जोडण्यासाठी आयकर खात्याने 1 जुलै 2017 रोजी कायदा लागू केला होता. तेव्हापासून पॅन-आधार जोडण्याची मुदत सातत्याने वाढवण्यात आली. याशिवाय अर्थसंकल्प 2021 मध्ये केंद्र सरकारने हे दोन्ही कार्ड जोडणे बंधनकारक तर केलेच पण त्यासाठी दंडाची तरतूद केली. नियम 234H त्यामध्ये जोडण्यात आला. 31 मार्च 2022 रोजीपर्यंत त्यासाठी कोणताही दंड वसूल करण्यात आला नाही.

दंड वसुली 1 एप्रिल 2022 आणि जून 2022 या दरम्यान आधार लिंक केल्यावर 500 रुपये दंड लावण्यात आला. तर गेल्या वर्षी 1 जुलै 2022 पासून आधार-पॅन जोडणीसाठी 1,000 रुपये दंडाची तरतूद करण्यात आली.

तर हे नुकसान पॅन-आधार लिंक न केल्याने नुकसान होईल. सर्वात अगोदर तुम्हाला विलंब केल्याबद्दल दंड भरावा लागेल. तुम्हाला आयकर विभागाकडून कोणताही रिफंड, परतावा मिळणार नाही. पॅन कार्ड बंद असल्याने तुम्हाला व्याज मिळणार नाही. करदात्याकडून अधिक टीसीएस, टीडीएस वसूल करण्यात येईल. बँकिंग व्यवहार, शेअर बाजार, म्युच्युअल फंड खाते हाताळताना अडचणी येतील. नवीन बँक खाते उघडता येणार नाही. काही योजनांचा लाभ घेता येणार नाही.

सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.