Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Home Loan : लवकरच गृहकर्ज होतील स्वस्त! गुलाबी नोट बंदीने अशी आणली आनंदवार्ता

Home Loan : 2000 रुपयांच्या नोट माघारी बोलविण्याचा मोठा फायदा झाला आहे. त्यामुळे गृहकर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे, कशी?

Home Loan : लवकरच गृहकर्ज होतील स्वस्त! गुलाबी नोट बंदीने अशी आणली आनंदवार्ता
Follow us
| Updated on: Jun 03, 2023 | 4:16 PM

नवी दिल्ली : देशात 2000 रुपयांच्या (2000 Note Ban) नोट माघारी बोलविणयाची घोषणा भारतीय रिझर्व्ह बँकेने 19 मे रोजी केली होती. 23 मे रोजीपासून प्रत्येक दिवशी 10 नोटा परत घेण्यास सुरुवात झाली. एका दिवशी एक व्यक्ती 20,000 रुपये परत करु शकते. या निर्णयाचा मोठा परिणाम दिसून आला. साठेबाजांनी गुलाबी नोटा बाहेर काढल्या. हा नोटा बदलीचा कार्यक्रम चार महिने सुरु राहणार आहे. कालावधी मोठा अनेकांना सहज नोटा बदलता येतील. पण याचा परिणाम पण दिसून आला आहे. 2000 रुपयांच्या नोट माघारी बोलविण्याचा मोठा फायदा झाला आहे. त्यामुळे गृहकर्ज स्वस्त (Home Loan Cheap) होण्याची शक्यता आहे, ती कशी?

मोठा बदल आयसीआयसीआय बँकेने एमसीएलआरमध्ये 15 बेसिस पाँईटची कपात केली. त्यामुळे एमसीएलआर बेस्ट होम लोनच्या व्याज दरात कपात होईल. याचा सरळ अर्थ असा आहे की, सर्वसामान्यांना आता स्वस्त दराने गृहकर्ज मिळेल. दुसरीकडे सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक एसबीआयने गृहकर्जासाठी खास ऑफर दिली आहे. बँकेने 30 जूनपर्यंत गृहकर्जावर 0.45 टक्क्यांची सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे ग्राहकांना 0.45 टक्क्यांनी गृहकर्ज स्वस्त मिळेल.

नोटबंदीचा असा झाला फायदा देशाच्या केंद्रीय बँकेने गुलाबी नोट मागे घेण्याची अधिसूचना काढली. 23 मे ते 30 सप्टेंबर या कालावधीत 2000 रुपयांच्या नोटा माघारी बोलविण्यात आल्या आहेत. त्याचा लागलीच परिणाम दिसून आला. एका अहवालानुसार, एका आठवड्यात देशातील बँकांमध्ये 2000 रुपयांच्या नोटा जमा केल्याने 50 हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा झाली आहे.

हे सुद्धा वाचा

इतक्या नोटांची साठेबाजी केंद्रीय बँकेने यापूर्वीच दोन हजार रुपयांच्या साठेबाजीचा विषय ऐरणीवर घेतला होता. 2000 रुपयांच्या 3.60 लाख कोटी रुपयांची बाजारात साठेबाजी करण्यात आल्याची माहिती बँकेने दिली होती. ही रक्कम परत बँकेत आणणे आवश्यक असल्याचे केंद्रीय बँकेने स्पष्ट केले होते. आता बँकेत या गुलाबी नोटा 30 सप्टेंबरपर्यंत जमा करता येणार आहे.

किती नगद जमा स्टेट बँक ऑफ इंडियाचे अध्यक्ष दिनेश कुमार खारा यांच्या माहितीनुसार, अंदाजे 17,000 कोटी रुपये मूल्याच्या 2000 रुपयांच्या नोटा खात्यात जमा करण्यात आल्या, वा एसबीआयमध्ये बदलविण्यात आल्या. एसबीआय ला 14,000 कोटी रुपये मूल्याच्या 2000 रुपयांच्या नोट मिळाल्या आहेत तर बँकेने 3000 कोटी रुपये मूल्याच्या 2000 रुपयांच्या नोटा बदलविल्या आहेत. ज्यांच्याकडे 2000 रुपयांच्या नोटा आहेत. ते 30 सप्टेंबर 2023 रोजीपर्यंत या नोटा बदलवू शकतात.

कपातीचे कारण काय बँकांकडे झपाट्याने ठेवी येत आहेत. काही जण त्यांच्या खात्यात रक्कम जमा करत आहेत. ही संख्या सर्वाधिक आहे. तज्ज्ञांच्या मते बँकांकडे जवळपास 1.5 लाख ते 2 लाख कोटी रुपये सरप्लस होतील. त्यामुळेच बँका आता गृहकर्ज स्वस्त करण्याच्या तयारीत आहेत. रिअल इस्टेट क्षेत्रात त्यामुळेच तेजीचे वारे आहे.

250 बेसिस पॉईंटची वाढ भारतीय केंद्रीय बँकेने आतापर्यंत रेपो रेट दरात सहा वेळा वाढ केली आहे. ज्या दरावर इतर बँकांना आरबीआय उधार कर्ज पुरवठा करते, त्याला रेपो दर म्हणतात. मे 2022 पासून आतापर्यंत रेपो रेटमध्ये 250 बेसिस पॉईंटची वाढ झाली आहे. नवीन आर्थिक वर्षातील ही पहिली तर या वर्षातील दुसरी वाढ ठरेल. फेब्रुवारी महिन्यात आरबीआयने यापूर्वी रेपो दर 25 बीपीएसने वाढवला होता.

किती होऊ शकते कपात बँकिंग क्षेत्रातील अधिकाऱ्यानुसार, गुलाबी नोटा अशाच जमा होत राहिल्या तर लवकरच गृहकर्जावर स्वस्त होऊ शकते. सण, उत्सवावर ऑफर आणत बँका स्वस्तात गृहकर्ज देतील. बँका व्याजदरात सर्वसाधारणपणे 1.25 ते 2.25 टक्के कपात करण्याची शक्यता आहे. येत्या दिवाळीपर्यंत हा परिणाम दिसून येईल.

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.