Systematic Deposit Plan | कष्टाचा पैसा हुशारीने गुंतवाल तर फायदात रहाल, SDP म्हणजे काय रे भाऊ?

Systematic Deposit Plan | चांगला परतावा मिळवण्यासाठी सर्वचजण धडपडतात. कष्टाच्या पैशाचे चिज झालं तर कोणाला नकोय? त्यासाठी सिस्टिमॅटिक डिपॉझिट स्कीम किंवा SDP हा चांगला पर्याय आहे.

Systematic Deposit Plan | कष्टाचा पैसा हुशारीने गुंतवाल तर फायदात रहाल, SDP म्हणजे काय रे भाऊ?
जोखीम कमी परताव्याची हमी Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 26, 2022 | 4:00 PM

Systematic Deposit Plan | चांगला परतावा मिळवण्यासाठी सर्वचजण धडपडतात. कष्टाच्या पैशाचे चिज झालं तर कोणाला नकोय? आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आणि सुरक्षित भविष्यासाठी आपण दरमहा गुंतवणूक (Investment) करतो. त्यातच अनेकांना गुंतवणुकीत कसली आणि कुठलीही जोखीम नको असते. त्यामुळे ते अनेकदा शेअर बाजाराच्या वाटेला जात नाही. त्यामुळे अशांसाठी सिस्टिमॅटिक डिपॉझिट स्कीम किंवा SDP हा चांगला पर्याय आहे. पद्धतशीर, नियोजनबद्ध गुंतवणूक योजना हा त्यातील सर्वोत्तम पर्याय आहे. आपल्या देशात उपलब्ध सुरक्षित गुंतवणूक पर्यायांमध्ये आवर्ती ठेव (RD), मुदत ठेव (FD) आणि पद्धतशीर गुंतवणूक योजना (SIP) यांचा समावेश होतो. पोस्ट कार्यालय आणि बँकांमध्ये आवर्ती ठेव आणि मुदत ठेव योजनांमध्ये परतावा मिळतो. पण तो फार मोठा नसतो. तर एसआयपी हा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचा सुवर्णमार्ग आहे. एकरकमी गुंतवणुकीपेक्षा हा मार्ग सर्वात चांगला मानण्यात येतो. त्यामुळे यातून मिळणारा परतावा अविश्वसनीय असतो.

SDP म्हणजे काय रे भाऊ ?

सिस्टिमॅटिक डिपॉझिट स्कीम (Systematic Deposit Scheme) अथवा एसडीपी गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. यामध्ये तुम्हाला एकदाच, एकाचवेळी रक्कम गुंतवण्याची गरज नसते. दर महा तुम्ही थोडी मात्र नियमीत स्वरुपात गुंतवणूक करता. आरडी आणि एफडीतील गुंतवणुकीसारखाच हा पर्याय आहे. आरडी आणि एफडीतील व्याज काही महिन्यांनी निश्चित होते. त्यात बदल होतो आणि त्याचे दर ही फार मोठा नसतो. मात्र एसडीपीमध्ये तसे नसते. यामध्ये जमा होणाऱ्या रक्कमेवर दरमहिन्याला व्याज बदलते. म्हणजे सलग 12 महिने तुम्ही गुंतवणूक केल्यास तुम्हाला मिळणारा परतावा दर महिन्याच्या व्याजाआधारे कमी अधिक राहिल. ही छोटी बचत तुम्हाला दीर्घकालीन गुंतवणुकीवर जबरदस्त परतावा देते. अनेक वित्तीय संस्था तुम्हाला एसडीपीचा पर्याय देतात.

यात किती धोका?

एसडीपीची (SDP) तुलना अनेकदा एसआयपीशी (SIP) केली जाते. इक्विटी योजनांमध्ये गुंतवणूक करण्यामागील मुख्य उद्देश म्हणजे बाजारातील अस्थिरतेचा फायदा घेणे हा असतो. शेअर बाजार खूप अस्थिर आहे. बाजार तेजीत असेल तर गुंतवणुकीवर तगडा फायदा होतो. तर बाजारात घसरण झाली की, गुंतवणुकीची चांगली संधी मिळते. एसडीपीमध्ये व्याजदर असे निश्चित करण्यात येतात की, गुंतवणूकदारांना अचानक फायदा होतो. परंतु, एसडीपीच्या निश्चित तारखेनंतर जमा रक्कमेवर एखाद्यावेळी परतावा कमी होऊ शकतो.

हे सुद्धा वाचा

वेळेआधी काढा पैसा

एसडीपी योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे तुम्हाला अचानक पैशांची निकड भासली तर लागलीच रक्कम हाती येते. तुम्हाला रक्कम काढता येते. जमा होणाऱ्या रक्कमेतून पैसे काढता येतात आणि त्यावर दंड ही भरावा लागत नाही.

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.