Aadhaar Card मोफत करा अपडेट; पुन्हा वाढवली सरकारने मुदत

Aadhaar Card | आधार कार्डची माहिती मोफत अपलोड करता येणार आहे. केंद्र सरकारने देशातील कोट्यवधी जनतेला मोदी सरकारने पुन्हा दिलासा दिला. 14 मार्चपर्यंत यासाठीची अंतिम मुदत होती. ही मुदत आता 14 जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. आधार कार्डधारकांना आता त्यांचे आधार कार्ड अपडेट करता येईल.

Aadhaar Card मोफत करा अपडेट; पुन्हा वाढवली सरकारने मुदत
आधार असे करा मोफत अपडेट, वाढवली मुदत
Follow us
| Updated on: Mar 12, 2024 | 5:23 PM

नवी दिल्ली | 12 March 2024 : मोदी सरकारने फ्री आधार सविस्तर अपडेट करण्याची मुदत 14 मार्चहून 14 जून, 2024 रोजीपर्यंत वाढवली आहे. आता देशातील कोट्यवधी लोकांना 4 महिन्यांचा कालावधी वाढून मिळाला आहे. समाज माध्यम X वर UIDAI ने याविषयीची पोस्ट केली आहे. युआयडीएआयने लाखो आधार कार्डधारकांना लाभ मिळण्यासाठी फ्री ऑनलाईन कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा 14 जून 2024 रोजीपर्यंत वाढवली आहे. ही मोफत सेवा केवळ myAadhaar पोर्टलवर उपलब्ध आहे. जर तुमचे आधार कार्ड 10 वर्षांपेक्षा अधिक जुने असेल आणि अजून ते अपडेट केले नसेल तर ही संधी उपलब्ध झाली आहे.

या ठिकाणी करता येईल बदल

या निर्णयामुळे नागरिकांना कागदपत्रांआधारे myAadhaar पोर्टल https://myaadhaar.uidai.gov.in/ च्या माध्यमातून 14 जूनपर्यंत मोफत बदल करण्यात येणार आहे. आधार कार्डमधील हा बदल केवळ ऑनलाईन अपडेशनसाठी आहे. पण तुम्ही आधार केंद्रावर जाऊन कागदपत्रांआधारे आधार कार्डमध्ये बदल कराल तर त्यासाठी 25 रुपये शुल्क अदा करावे लागेल.

हे सुद्धा वाचा

10 वर्षें झाल्यास करा बदल

आधार कार्ड अत्यंत आवश्यक पुरावा मानण्यात येतो. अनेक सरकारी आणि गैर सरकारी कामासाठी आधार कार्ड दाखवावे लागते. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण वेळोवेळी आधार कार्ड अपडेटविषयी निर्देश देते. सध्या आधार कार्डला 10 वर्षांपेक्षा अधिकचा कालावधी झाला असेल तर आधार कार्डमध्ये अपडेट मोफत करता येते.

असे करा आधार कार्ड अपडेट

  1. UIDAI च्या https://myaadhaar.uidai.gov.in/ वर जा
  2. अथवा https://ssup.uidai.gov.in/ssup/ यावर लॉगिन करा
  3. 12 अंकांचा आधार कार्ड क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकून लॉगिन व्हा
  4. ओटीपीचा पर्याय निवडा, पुढील प्रक्रिया करा
  5. आधार संबंधीत मोबाईल क्रमांकावर हा ओटीपी येईल
  6. ओटीपी टाकून ‘अपडेट आधार ऑनलाइन’ हा पर्याय निवडा
  7. ‘प्रोसीड टू अपडेट आधार’ हा पर्याय निवडा, माहिती भरा

ऑफलाईन असे करा अपडेट

  • https://shuvan.nrsc.gov.in/aadhaar/ या अधिकृत पोर्टलवर जा
  • आता जवळचे आधार केंद्र शोधण्यासाठी ‘निअर बाय सेंटर’ वर क्लिक करा
  • तुमचा योग्य पत्ता द्या. लोकेशन व्हेरिफिकेशन होऊन जवळचे केंद्र सापडेल
  • पिन कोड टाकून सुद्धा तुम्हाला जवळचे आधार केंद्र सापडेल
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.