Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pan Aadhaar Card : आधार-पॅन जोडणीसाठी हजार रुपये नाही तर आता इतका जबरी फटका

Pan Aadhaar Card : आधार कार्ड आणि पॅन कार्डच्या जोडणीची अनेकदा संधी देण्यात आली. पण हजार रुपयांचा दंड टाळण्यासाठी अनेकांनी जोडणी केली नाही. आता त्यांना दोन्ही कार्ड जोडणीसाठी इतका जबरी दंड भरावा लागेल.

Pan Aadhaar Card : आधार-पॅन जोडणीसाठी हजार रुपये नाही तर आता इतका जबरी फटका
Follow us
| Updated on: Jul 07, 2023 | 7:01 PM

नवी दिल्ली : अनेक डेडलाईन संपल्यानंतर या 30 जून रोजी पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक (PAN Aadhaar Link) करण्याची अंतिम मुदत संपली. ज्यांनी जोडणी केली नाही, ते पॅन कार्ड आता निष्क्रिय (PAN Inoperative) झाले आहेत. हे निष्क्रिय पॅन कार्ड वापरल्यास 10000 रुपयांचा दंड भरावा लागेल. तसेच अनेक आर्थिक व्यवहार तुम्हाला करता येणार नाही. तुमच्या आर्थिक व्यवहारांवर एक प्रकारे बंधने आली आहेत. पॅन कार्ड तुम्हाला पुन्हा सुरु करता येते. पण त्यासाठी आता एक हजारांचा दंड नाही तर त्यापेक्षा ही जबरी दंड भरावा लागणार आहे. निष्क्रिय पॅन कार्ड वापरल्यास दहा हजारांचा दंड भरावा लागेल. तर यापूर्वी केलेली टाळाटाळा आता तुमच्या अंगलट येणार आहे.

करदात्यांना फटका पॅन-आधार कार्डची जोडणी न केल्याने 1 जुलैपासून पॅन निष्क्रिय झाले आहे. त्यामुळे सर्वाधिक नुकसान आयटीआर (Income Tax Return) फाईल करणाऱ्यांचे झाले आहे. आयटीआर फाईल करण्यासाठी तुम्हाला पॅन कार्डची गरज पडते. आयटीआर फाईल करण्यासाठी जुने पॅनकार्ड उपयोगात येणार नाही.

इतका भरावा लागेल दंड पॅन कार्ड सुरु करण्यासाठी 1000 रुपये जमा करावे लागतील. ही प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 1 महिना लागतो. तर टॅक्स रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत 31 जुलै आहे. ही मुदत संपली तर तुम्हाला 5000 रुपयांचे विलंब शुल्क अदा करावे लागेल. पॅन सुरु झाल्यानंतर आयटीआर फाईल कराल तर तुम्हाला 5000 रुपये विलंब शुल्क जमा करावे लागेल. म्हणजे एकूण 6000 रुपयांचा फटका बसेल.

हे सुद्धा वाचा

आधार सक्रिय होण्यास इतके दिवस इनकम टॅक्स रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2023 आहे. तुम्ही आता आधार-पॅन लिंक करण्यासाठी प्रक्रिया केली तर 7 ऑगस्ट पर्यंत पॅन कार्डचा वापर करता येईल. 31 जुलैपर्यंत आयटीआर फाईल करता येणार नाही. आयटीआर फाईलिंग ही दीर्घ प्रक्रिया आहे. त्यासाठी एक महिनाही लागू शकतो. त्यामुळे ही प्रक्रिया करण्यासाठी तुम्हाला तितके विलंब शुल्क अदा करावे लागेल.

तर एक महिन्याची प्रतिक्षा तुम्ही दंडाची रक्कम भरली आणि लागलीच पॅन कार्ड सक्रिय झाले, असे होत नाही. पॅनकार्ड पुन्हा सक्रिय होण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागतो. तुम्ही दंडाची रक्कम भरल्यानंतर त्याची माहिती संबंधित विभागाला द्यावी लागते. त्यानंतर एका महिन्यात तुमचे पॅन कार्ड सुरु होते. म्हणजे आता प्रक्रिया केली तर पुढील महिन्याच्या त्याच तारखेपर्यंत पॅन सक्रिय होईल.

फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?
फक्त शिंदेवरच जोक का? कामराची वादानंतर TV9 कडे पहिली प्रतिक्रिया काय?.
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका
शिंदेंच्या तमाशातला नाच्या म्हणजे पाटील, मनसेची गुलाबराव पाटलांवर टीका.
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार
कुणाल कामराच्या CDR आणि बँक खात्यांची चौकशी होणार.
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है
कामराच्या स्टुडिओची तोडफोड कंबोज म्हणाले, अभी तो सिर्फ स्टूडिओ टूटा है.
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट
अमीर खानने घेतली धनंजय देशमुखांची भेट.
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ
कामराच्या गाण्यावरून ठाकरे vs शिंदेंच्या सेनेची जुगलबंदी, बघा व्हिडीओ.
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी
शेतकऱ्यांना दिलासा; भरपाई म्हणून मिळणार 53 हजार 727 कोटी.
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर
आरोपी फहीम खानच्या घरावर फिरवला बुलडोजर.
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? श्रीमंत कोकाटेंनी म्हटलं...
रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवणार? श्रीमंत कोकाटेंनी म्हटलं....
हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला कसा? उद्धव ठाकरेंचा प्रश्न
हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला कसा? उद्धव ठाकरेंचा प्रश्न.