Aadhaar-Ration Card Linking : आधार – रेशन कार्ड लिंक करण्याची तारीख 30 जूनपर्यंत वाढविली, असे करा ऑनलाईन लिंक
आधारकार्डला रेशनिंग कार्ड लिंक करण्याची मुदत आता 31 मार्च वरून आता 30 जून 2023 पर्यंत वाढविण्यात आली आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा पद्धतीने करा लिंक
नवी दिल्ली : केंद्र सरकारने आधार कार्डला रेशनकार्ड बरोबर लिंक करण्याची अंतिम तारीख वाढविली आहे. आता 30 जून 2023 पर्यंत नागरिक आपल्या आधार कार्डला रेशनिंग कार्डशी लिंक करू शकणार आहेत. अन्न आणि नागरी वितरण मंत्रालयाने यासंदर्भातील नोटीफिकेशन जारी केले आहे. या आधी आधार कार्डला रेशन कार्डशी लिंक करण्याची शेवटची मुदत 31 मार्च 2023 अशी ठेवण्यात आली आहे. सरकारने ही मुदत वाढवित आता ती 30 जूनपर्यंत करण्याचा निर्णय घेतला आहे.
देशातील कोट्यवधी जनतेला रेशनिंग कार्यालयलातून सबसिडीचे धान्य आणि इंधन पुरविले होते. पासपोर्ट आणि पॅन कार्ड सारखे रेशनकार्डला ओळखपत्र आणि निवासाचा पुरावा म्हणून वापरले जात आहे. काही ठिकाणी गरजू लोकांना स्वस्त धान्य मिळण्यात अडचणी होत आहेत, तर काही ठिकाणी रेशनकार्डधारक आपल्या वाट्यापेक्षा जास्त अन्नधान्य घेत आहे. जे पात्र नाहीत असेही लोक अशा सबसिडीचा बेकायदा लाभ घेत असल्याच्याही तक्रारी सरकारला आल्या आहेत. त्यामुळे जे खरोखरच पात्र नागरिक आहेत ते लाभापासून वंचित राहत आहेत. अशा घटनांना लगाम लावण्यासाठी आधारकार्डशी रेशनकार्डला लिंक करण्याची सरकारने योजना आहे.
आधारशी रेशनकार्ड कसे लिंक कराल पाहूया…
सर्वात आधी पब्लिक डिस्ट्रीब्यूशन सिस्टम यानी पीडीएस (PDS) च्या अधिकृत वेबसाई़डवर जा
आता मागितलेली माहीती उदा. आधार नंबर, राशन कार्ड नं. आणि रजिस्टर मोबाईल क्र. भरा
‘Continue’ बटन वर क्लिक करून पुढे जा
आता मागितलेली माहीती उदा. आधार नंबर, राशन कार्ड नं. आणि रजिस्टर मोबाईल क्र. भरा
‘Continue’ बटन वर क्लिक करून पुढे जा
आता आपल्या रजिस्टर मोबाईलवर OTP प्राप्त होईल
हा ओटीपी मागितल्या जागी भरा, आधारशी रेशनकार्ड लिंक करण्यासाठी क्लिक करा
Aadhaar-Ration offline Linking : आधारला रेशन कार्ड ऑफलाइन लिंक असे करा
पात्र रेशनकार्ड धारकाने आपल्या घरातील सर्व सदस्यांची आधार आणि रेशनकार्ड फोटोकॉपी झेरॉक्स काढावी
जर रेशनकार्डधारकाचे बॅंक खात्याशी आधार लिंक नसेल तर बॅंकेच्या पासबुकची फोटोकॉपी काढावी
कुटुंब प्रमुखाचा पासपोर्ट आकाराचा फोटो इतर कागदपत्रांची फोटोकॉपी रेशन कार्यालय, पीडीएस किंवा रेशन दुकानात जमा करावे
आधार डेटाबेस वॅलिड करण्यासाठी फिंगर प्रिंट आयडी द्यावी लागले
विभागाला दस्ताऐवज वितरीत केल्यानंतर तुम्हाला एसएमएस किंवा इमेलवर कळविले जाईल
पीडीएसशी संबंधित विभाग तुमची कागदपत्रे प्रोसेससाठी पाठवेल, आणि रेशनकार्डला आधारकार्डशी यशस्वी लिंक केल्यानंतर तुम्हाला सुचना मिळेल
या कागद पत्राची आवश्यकता
ओरिजनल रेशन कार्ड फोटोकॉपी
कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आधारकार्डची फोटोकॉपी
कुटुंब प्रमुखाच्या आधार कार्डची फोटोकॉपी
बॅंक पासबुकची फोटोकॉपी
कुटुंब प्रमुखाचे दोन पासपोर्ट साइज फोटो