Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai : मुंबईकरांच्या सेवेत लवकरच दाखल होणार एसी डबलडेकर बस; ‘या’ खास वैशिष्ट्यांमुळे प्रवास ठरणार अधिक आरामदायी

मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. लोकलनंतर (Local) बेस्टहीच (Best) मुंबईची लाईफलाईन मानली जाते. आता लवकरच बेस्टच्या एसी डबलडेकर बस मुंबईकरांच्या सेवेत हजर होणार आहेत.

Mumbai : मुंबईकरांच्या सेवेत लवकरच दाखल होणार एसी डबलडेकर बस; 'या' खास वैशिष्ट्यांमुळे प्रवास ठरणार अधिक आरामदायी
काल बसचा स्थापना दिवस होताImage Credit source: sabrangindia.in
Follow us
| Updated on: Jul 10, 2022 | 11:53 AM

मुंबई : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. लोकलनंतर (Local) बेस्टहीच (Best) मुंबईची लाईफलाईन मानली जाते. कोरोना काळात लोकल बंद होती तेव्हा मुंबईकर हे बेस्टवरच अवलंबून होते. बेस्ट कर्मचाऱ्यांनी देखील आपल्या जीवाची परवा न करता प्रवाशांना सेवा पुरवली. प्रवासाचा दर्जा सुधारावा तसेच बेस्टला आहे त्याच्यापेक्षा अधिक चांगला प्रतिसाद मिळाला यासाठी आता लवकरच प्रवाशांच्या (Passengers) सेवेत एसी डबलडेकर बस दाखल होणार आहे. बेस्ट दिनानिमित्त ऑगस्ट महिन्यात डबलडेकर एसी बस बेस्टच्या ताफ्यात दाखल होणार आहे. त्यानंतर तिच्या चाचण्या घेण्यात येतील. सर्व प्रकारच्या चाचण्या पूर्ण झाल्यानंतर ही बस रस्त्याने धावताना दिसणार आहे. सध्या बेस्टकडे एकूण 45 डबल डेकर बस आहेत. बेस्टच्या साध्या बसची प्रवासी क्षमता 54 इतकी असून, डबल डेकर बसची प्रवाशी क्षमता 74 इतकी आहे.

बेस्टच्या डबलडेकर बसचे फायदे

बेस्टच्या डबलडेकर बसचे साध्या बसच्या तुलनेत अनेक फायदे आहेत. एक म्हणजे प्रवासी क्षमता. साध्या बेस्ट बसची प्रवासी क्षमता ही 54 इतकीच आहे. तर डबलडेकर बसची प्रवासी क्षमता ही 74 इतकी आहे. म्हणजेच डबलडेकर बसमधून अधिक प्रवाशांचे वहन होते. विशेष म्हणजे दोन्ही बसचे क्षेत्रफळ समान असल्यामुळे जागा तेवढीच व्यापली जाते. त्यामुळे अधिक जागा व्यापली जाण्याचा प्रश्न नाही. सध्या महापालिकेकडे एकूण 45 डबलडेकर बस आहेत. आता तर प्रवाशांच्या सेवेत एसी डबलडेकर बस दाखल होणार आहे. ऑगस्ट महिन्यात ही बस बेस्टच्या ताफ्यात दाखल होईल. त्यानंतर सर्व चाचण्या पूर्ण होईऊ, येत्या सप्टेंबरपासून मुंबईकरांना एसी डबलडेकर बसचा लाभ मिळू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

नव्या डबलडेकर एसी बसचे वैशिष्टं

ही नवीन डबलडेकर बस भारत 6 श्रेणीमधील असून, तिला दोन स्वयंचलित दरवाजे आहेत. या दरवाजांचे संपूर्ण नियंत्रण हे चालकाकडे अरणार आहे. या बसमध्ये सीसीटीटीव्ही कॅमरा देखील असणार आहे. या बसचे गिअर हे स्वयंचलित आहेत. समोर येत असलेल्या माहितीप्रमाणे बेस्टकडून अशा 900 बस भाडे तत्वावर घेतल्या जाणार आहेत. या बसच्या चार्जिंगसाठी मुंबईत 50 ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहेत.

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.