Adani : अदानी ग्रुप सुसाट..150 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीमुळे सर्वांच्या नजरा खिळल्या..काय आहे कंपनीचा फ्यूचर प्लॅन?

Adani : अदानी समूहाने पुन्हा एकदा अब्जवधींची गुंतवणूक केली आहे..

Adani : अदानी ग्रुप सुसाट..150 अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीमुळे सर्वांच्या नजरा खिळल्या..काय आहे कंपनीचा फ्यूचर प्लॅन?
नवीन क्षेत्रात अदानींचा दबदबाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 30, 2022 | 9:57 PM

नवी दिल्ली : आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी (Gautam Adani) आता ग्रीन एनर्जी, डेटा सेंटर आणि विमान तळ यामध्ये नवीन गुंतवणूक (Investment) करणार आहे. एवढेच नाही तर आरोग्य क्षेत्रात हा समूह मोठी गुंतवणूक करणार आहे. या क्षेत्रात हा समूह 150 अब्ज डॉलरपेक्षा अधिकची गुंतवणूक करणार आहे.

या कंपनीचे लक्ष्य 1,000 अब्ज डॉलर मूल्यांकनची वैश्विक कंपनी होण्याचे आहे. अदानी ग्रुपचे मुख्य आर्थिक अधिकारी (CFO) जुगेशिंदर ‘रॉबी’ सिंह यांनी नुकतीच व्हेचुरा सिक्योरिटीज लिमिटेडच्या गुंतवणूक बैठकीत याविषयीची माहिती दिली.

वर्ष 1988 मध्ये एका व्यापारी स्वरुपात अदानी यांनी व्यवसायाला सुरुवात केली होती. त्यानंतर या समुहाने मागे वळून पाहिलेच नाही. या समुहाने बंदरे, विमानतळ, रस्ते, वीज, अक्षय ऊर्जा, वीज पारेषण, गॅस वितरण आणि एफएमजी क्षेत्रात जोरदार प्रगती केली आहे.

हे सुद्धा वाचा

आता काही दिवसांपासून या समुहाने डेटा केंद्र, विमानतळ, पेट्रोरसायन, सिमेंट आणि मीडिया क्षेत्रात विस्तार केला आहे. या नवीन क्षेत्रात ही कंपनीने प्रगती साधली आहे. हा उद्योग समूह इतर उद्योजकांना टफ फाईट देत आहे.

हा समूह येत्या 5-10 वर्षांत हरित हायड्रोजन व्यवसायात 50-70 अब्ज डॉलरची तर हरित ऊर्जा क्षेत्रात 23 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे . हा ग्रुप वीज वितरणात सात अरब डॉलर, दळणवळण, वाहतूक क्षेत्रात 12 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे.

रस्ते विकासामध्ये 5 अब्ज डॉलर, समूह क्लाऊड सेवांसह डेटा केंद्रासाठी 6.5 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यात येणार आहे. विमानतळासाठी 9-10 अब्ज डॉलरची योजना तयार करण्यात येत आहे.

सिमेंट क्षेत्रात तर कंपनी मोठी मजल मारली आहे. कंपनीने एसीसी आणि अंबुजा सिमेंटचे अधिग्रहण केले आहे. आता सिमेंट क्षेत्रात प्रवेशासाठी या समुहाने 10 अब्ज डॉलरची गुंतवणूक केली आहे.

हा ग्रुप पेट्रो रसायन व्यवसायात 2 अब्ज डॉलरची गुंतवणुकीचे उद्दिष्ट आहे. तर आरोग्य क्षेत्रात विमा, रुग्णालय आणि डायग्नॉसिक आणि औषधी क्षेत्रात हा समूह 7-10 डॉलरची गुंतवणूक करणार आहे.

2015 मध्ये या समुहाचे बाजार मूल्य 16 अब्ज डॉलर होते. त्यानंतर या ग्रुपने सुसाट कामगिरी केली. या समुहाने 2022 साली, म्हणजे केवळ सात वर्षांत 16 पटीने वाढ झाली आहे. या समुहाचे आताचे बाजार भांडवल 260 अब्ज डॉलर झाले आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.