आता शिधापत्रिकेत चुटकीसरशी जोडले जाईल कुटुंबातील सदस्याचे नाव, फक्त करावे लागेल ‘हे’ काम
रेशन कार्डमध्ये तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे नाव अजून जोडले नाही. तर तुम्ही आता ऑनलाईन पद्धतीने काही मिनिटात या प्रक्रियेद्वारे अगदी सहज तुमच्या कुटुंबातील व्यक्तींची नावे शिधापत्रिकेत जोडू शकतात. प्रक्रिया काय असेल ते जाणून घेऊया.
सर्वसामान्य लोकांच्या गरज लक्षात घेऊन भारत सरकार लोकांसाठी अनेक फायदेशीर योजना राबवत असते. लोकांच्या वेगवेगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी सरकार विविध प्रकारच्या योजना आणते. जेणेकरून या योजनांचा लाभ सगळ्या गरजवंतांना निशुल्क आणि कमी दारात घेता येईल. भारतातील अनेक लोक आजही असेच आहेत. ज्यांना दोन वेळच्या जेवणासाठीही पैसे कमावता येत नाहीत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत सरकार अशा लोकांना कमी खर्चात रेशन पुरवते.
कमी खर्चात लोकांना धान्याचा पुरवठा करण्यासाठी सरकारकडून लोकांना शिधापत्रिका देण्यात येते. शिधापत्रिकेवर लोकांना कमी खर्चात धान्याच्या सर्व सुविधेचा लाभ मिळतो. ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही. त्या लोकांना कमी खर्चात उपलब्ध असलेल्या धान्यांच्या सुविधेचा लाभ मिळत नाही. त्यातच जर शिधापत्रिकेमध्ये तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे नाव जोडले नसेल तर तुम्ही अगदी सहज या पद्धतीने घरातील सदस्याचे नाव जोडू शकता. चला तर जाणून घेण्यात शिधापत्रिकेत नाव जोडण्याची सोपी प्रक्रिया काय असेल.
ऑनलाइन पद्धतीने नावं जोडता येते
जर तुमच्या घरातील शिधापत्रिकेमध्ये तुमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे नाव अजूनही जोडले गेले नाही तर काळजी करण्याची गरज नाही. कारण तुम्ही घरबसल्या सदस्याचे नाव ऑनलाइन पद्धतीने शिधापत्रिकेमध्ये जोडू शकाल. यासाठी तुमच्याकडे कुटुंबप्रमुखाचे शिधापत्रिका आणि त्याची फोटो कॉपी असणे आवश्यक आहे. शिधापत्रिकेमध्ये मुलांचे नाव जोडायचे असल्यास मुलाचा जन्म दाखला त्यासोबत पालकांचे आधार कार्डही आवश्यक आहे. तसेच शिधापत्रिकेमध्ये जर विवाहित महिलेचे नाव जोडायचे असल्यास त्या महिलेचे आधार कार्ड, लग्नाचा दाखला आणि आई- वडिलांचे रेशनकार्ड आवश्यक आहे.
ही ऑनलाईन प्रक्रिय फॉलो करा
- ऑनलाईन शिधापत्रिकेमध्ये तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याचे नाव जोडण्यासाठी तुम्हाला तुमच्या राज्याच्या अन्न पुरवठा विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
- यानंतर तुम्हाला एक आयडी तयार करावा लागेल. जर तुमचा आयडी आधीच तयार झाला असेल तर तुम्हाला लॉगिन करावं लागेल.
- लॉगिन केल्यानंतर तुम्हाला शिधापत्रिकेबद्दल माहिती/ पर्याय दिसेल, ज्यामध्ये तुम्हाला नवीन मेंबर ॲड करण्याचा पर्याय मिळेल. त्या पर्यायावर जाऊन नवीन सदस्य जोडण्यासाठी फॉर्म भरा.
- त्यासोबतच नव्या सदस्याचा संपूर्ण तपशील भरावा लागणार आहे. सदस्याचा फॉर्म भरू झाल्यावर त्या व्यक्तीची कागदपत्रे अपलोड करा.
- संपूर्ण माहिती भरल्यानंतर डॉक्युमेंटेशन केल्यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिट करावा लागेल.
- फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर मिळेल. तुम्ही यात नोंदणी क्रमांकासह तुमची विनंती ट्रॅक करू शकता.
- यानंतर तुमचा फॉर्म आणि तुमची कागदपत्रं तपासली जातील. सर्व काही बरोबर असेल तर नवीन सदस्याचे नाव रेशनकार्डमध्ये जोडले जाईल.
- त्याही तुमच्या जवळच्या रेशन दुकानात जाऊन आपल्या शिधापत्रिकेमध्ये नाव अपडेट करू शकता.