नोकरी जाण्याची भीती विसरा, आर्थिक आघाडीवर हे बदल करा

Job | नोकरी हे पैसा कमाविण्याचे साधन झाले आहे. अनेकांना नेहमी नोकरी जाण्याची भीती वाटते. त्यामुळे त्यांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक आहे. आर्थिक बाजू सक्षम असली तर नोकरी जाण्याची भीती एकदम चिंतेत टाकणार नाही आणि खर्चाचे प्रश्न एकदम पुढ्यात उभे ठाकणार नाहीत. त्यासाठी उपयोगी ठरेल हा उपाय...

नोकरी जाण्याची भीती विसरा, आर्थिक आघाडीवर हे बदल करा
Follow us
| Updated on: Nov 16, 2023 | 10:04 AM

नवी दिल्ली | 16 नोव्हेंबर 2023 : कोरोनानंतर जगाचे चित्र पार पालटून गेले आहे. अनेकांच्या हातचा रोजगार हिसकावला गेला आहे. काही तर अजून या धक्क्यातून सावरलेले नाही. पण कोरोनाने जगाला बरेच धडे गिरवायला दिले. आर्थिक स्थिती मजबूत ठेवण्यासाठी अनेकांनी उपया योजना सुरु केल्या. कोरोनासारखे संकट आले तर निदान काही महिने तरी आर्थिकदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक असल्याचे अनेकांच्या लक्षात आले. आता मंदीची कारणं सांगून कंपन्या, स्टार्टअप्स अनेकांना घरी बसवत आहेत. अशावेळी आर्थिकदृष्ट्या तुम्ही मजबूत असणे आवश्यक आहे. या 5 टिप्स तुमच्या उपयोगी पडतील…

वायफळ खर्चाला लावा कात्री

वायफळ खर्च टाळणे हा सर्वात चांगला उपाय आहे. विनाकारण शॉपिंग, हॉटेलिंग या खर्चांना वेळीच कात्री लावा. त्यामुळे तुमचा पैसा वाचेल. या बचतीतून एक अल्प गुंतवणूक करा. तुम्ही आरडी, एफडी अथवा म्युच्युअल फंडात ही गुंतवणूक करु शकता. बचत हीच कमाई असते.

हे सुद्धा वाचा

अत्यावश्यक फंड

जर तुमच्याकडे इमरजेंसी फंड नसेल तर मग आतापासूनच त्याची प्लॅनिंग करा. त्यामुळे काही महिने घर खर्च भागविता येईल, निदान इतका तरी पैसा गाठिशी ठेवा. त्यासाठी अत्यावश्यक निधी जमा करा. जर तुमचा महिन्याचा खर्च 25-30 हजारांच्या घरात असेल तर कमीत कमी 4 लाख रुपयांपर्यंत अत्यावश्यक फंड असणे आवश्यक आहे. पैसा बचत करुन हा फंड तयार करता येतो.

गुंतवणुकीला संरक्षण

नोकरी सुटल्यानंतर यापूर्वी सुरु असलेल्या गुंतवणूक योजनांवर त्याचा परिणाम होता कामा नये. तुम्ही आरडी सुरु केली असेल. म्युच्युअल फंडचा हप्ता, विमा योजनेचा हप्ता यासाठी निधीची तजवीज कशी करता येईल याचा विचार करा. नोकरी गेल्यानंतर निदान काही महिने तर यामध्ये खंड पडू नये अशी व्यवस्था करणे गरजेचे आहे.

विमा पॉलिसीत गुंतवणूक

आरोग्य विमा, जीवन विमा यामध्ये गुंतवणूक करा. आरोग्य विम्यात मोठी गुंतवणूक आवश्यक आहे. योग्य तज्ज्ञाच्या मदतीने तुम्ही आरोग्य विम्याची खरेदी करणे. त्यात एड ऑन सेवा घेणे आवश्यक आहे. या सेवा जोडल्या तर नोकरी गमाविण्याच्या स्थितीत एखादा आरोग्यविषयक संकटाला तोंड देता येईल.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.