Voter Card | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम, इथबी आणि तिथबी मतदानाला बसणार चाप, तुम्ही मतदार कार्डशी आधार जोडले का?

Aadhaar Voter ID linking: इथबी आणि तिथबी मतदान करणाऱ्या मतदारांना चाप बसणार आहे. मतदार अनेक ठिकाणी राहिल्यानंतर ते दोन ओळखपत्र बनवून घेतात आणि दोन्ही ठिकाणी मतदान करतात. त्यासाठी आता मतदान कार्ड आधारसोबत लिंक करण्यात येणार आहे.

Voter Card | स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम, इथबी आणि तिथबी मतदानाला बसणार चाप, तुम्ही मतदार कार्डशी आधार जोडले का?
असे जोडा मतदान कार्ड आधारशीImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jul 21, 2022 | 7:32 AM

Aadhaar Voter ID linking: केंद्र सरकारने अखेर केंद्र सरकारने निवडणूक ओळखपत्र (Voter Id) आधारशी जोडणे बंधनकारक करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. इथबी आणि तिथबी मतदान करणाऱ्या मतदारांना चाप बसणार आहे. मतदार अनेक ठिकाणी राहिल्यानंतर ते दोन ओळखपत्र बनवून घेतात आणि दोन्ही ठिकाणी मतदान करतात. या बनावटगिरीमुळे अनकेदा बोगस मतदानाची भीती वाढते. या प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि ज्यांच्या नावावर एकापेक्षा अधिकची निवडणूक ओळखपत्र आहेत, त्यांची शहानिशा करण्यासाठी त्यांची ओळख पटवण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. आधार कार्डसोबत (Aadhar Card) मतदान कार्ड लिंक करण्यात येणार आहे. त्याआधारे अशा प्रकारांना आळा घालण्यात येणार आहे. या निर्णयामुळे बोगस मतदानाला (Bogus Voting) आळा बसेल आणि मतदाराकडे एकापेक्षा जास्त कार्ड असेल तर त्यांची माहिती घेऊन ते मतदान ओळखपत्र रद्द करण्यात येणार आहे.

घरोघरी जाऊन तपास

निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने मतदार ओळखपत्र आणि आधार लिंक करणे अनिवार्य केले आहे. मतदार कार्ड आधारशी जोडण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन यावर जनजागृती सुरु केली आहे. त्यामुळे एकाच मतदाराचे अनेक ठिकाणी नाव असल्यास ते शोधणे सोपे होणार आहे.

हे सुद्धा वाचा

असा कराल ऑनलाईन अर्ज ?

केंद्र सरकारने वर्षाच्या सुरुवातीला निवडणूक कायदा विधेयक 2022 मंजूर केले आहे.

या कायद्यानुसार मतदारांना त्यांचे मतदार ओळखपत्र आधारकार्डशी लिंक करावे लागेल.

आधार आणि मतदार ओळखपत्र लिंक करण्यासाठी प्रथम राष्ट्रीय किंवा राज्य मतदार पोर्टलच्या अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.

याठिकाणी तुमचा मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडी आणि मतदार ओळखपत्र क्रमांक आणि पासवर्ड टाकून लॉग इन करावे लागेल.

अर्ज क्रमांक 6 कशासाठी ?

मतदाराला अर्ज क्र.6 द्वारे प्रथम नावनोंदणी करता येते. किंवा दुसऱ्या मतदारसंघात स्थलांतर केल्यासही हाच अर्ज करावा लागतो. अनिवासी मतदाराला अर्ज क्रं 6(अ) भरुन द्यावा लागतो.

अर्जासोबत काय माहिती देणार?

आधारसह मनरेगा जॉबकार्ड, पॅनकार्ड, इतर माहितीही अर्जावर भरावी लागते. ओळखपत्र, जन्मदाखला, पासपोर्ट, बँक पासबुक, रेशनकार्ड यापैकी एका दस्तवेजाची आवश्यकता असते. वयाच्या दाखल्यासाठी शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, पॅनकार्ड, वाहनचालक परवाना यांची सत्यप्रत जोडता येते.

येथे अर्ज उपलब्ध

ceo.maharashtra.gov.in, voterportal.eci.gov.in, www.nvsp.in. यावर मतदारांना मतदान कार्ड आधारशी लिंक करण्याचा अर्ज उपलब्ध आहे. यावर विचारलेली माहिती अपलोड केल्यानंतर मोबाइलवर एसएमएस (SMS) येतो.

निवडणूक आयोग काय म्हणतो?

सरकारने मतदार ओळखपत्र आणि आधार लिंक करणे अनिवार्य केले आहे. घरोघरी जाऊन यावर जनजागृती सुरु केली आहे. एकाच मतदाराचे अनेक ठिकाणी नाव असल्यास त्याची तपासणी सुरु आहे. नागरिकांनी आधार कार्ड आणि मतदार कार्डचे लिकिंग लवकर करावे.

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.