Cheque : चालवा की डोकं! धनादेशावर रक्कम लिहिल्यानंतर का लिहिण्यात येते ‘फकस्त’

Cheque : दैनंदिन व्यवहारासाठी अनेकदा आपण धनादेशाचा हमखास वापर करतो. त्यामुळे व्यवहाराची नोंद तर होतेच पण पुढे कायदेशीर प्रकरणात त्याचा वापर होतो. पण त्यावर 'फकस्त' हा शब्द का बरं लिहिण्यात येतो.

Cheque : चालवा की डोकं! धनादेशावर रक्कम लिहिल्यानंतर का लिहिण्यात येते 'फकस्त'
Follow us
| Updated on: Apr 30, 2023 | 7:31 PM

नवी दिल्ली : बँकेच्या रोजच्या व्यवहारासाठी आपण धनादेशाचा (Cheque) हमखास वापर करतो. त्यामुळे व्यवहाराची नोंद तर होतेच पण पुढे कायदेशीर प्रकरणात त्याचा वापर होतो. अनेकदा फसवणुकीच्या प्रकरणात धनादेश हा मोठा पुरावा ठरतो. या आधारे शिक्षा होऊ शकते आणि दंड ही भरावा लागू शकतो. त्यामुळे घर घेताना, शेती खरेदी विक्री करताना, मोठे व्यवहार करताना शक्यतोवर ते धनादेशाद्वारेच करण्यात येतात. त्यामुळे तुम्ही या फसवणुकीपासून वाचू शकता. वा फसवणूक झाल्यास तुमच्याकडे त्याचा सबळ पुरावा असतो. पण अनेकदा चेकवर रक्कम लिहिल्यानंतर फकस्त (Only) हा शब्द लिहिण्यात येतो. त्याचे कारण आहे तरी काय

Only चे काय गौडबंगाल अनेकदा व्यावसायिक, वैयक्तिक, व्यापार वा इतर कारणांसाठी, व्यवहारासाठी धनादेश देण्यात येतो. जर एखाद्या व्यक्तीला आपण धनादेश देत असेल तर त्यासंबंधीची काही माहिती आपल्याकडे असणे आवश्यक आहे. तुम्ही अनेकदा पाहिले असेल की, जेव्हा मोठ्या संस्था, व्यापारी, धनादेश देतात, तेव्हा त्यावर Only हा शब्द लिहितात. त्याचे कारण तरी काय

फसवणूक टळणार खरंतर चेकवर रक्कम लिहिल्यानंतर नेहमीच Only हा शब्द लिहितात. त्याचे कारण तुमची फसवणूक टाळणे हे असते. जर तुम्ही फक्त हा शब्द लिहिला तर मोठी फसवणूक टळू शकते. रक्कमेनंतर जर तुम्ही शेवटी Only हा शब्द लिहिला असेल तर त्यापुढे कोणतीही रक्कम, अंक लिहिता येत नाही. त्यामुळे तुमची फसवणूक टळते. दुसरी कोणतीही व्यक्ती त्यापुढे कोणतीही रक्कम लिहू शकत नाही. तुम्ही टाकलेली रक्कमच तुमच्या खात्यातून वळती होते. एका फकस्त शब्दामुळे तुम्ही निश्चिंत होता.

हे सुद्धा वाचा

काय आहे पॉझिटिव्ह पे सिस्टिम रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकेतील फसवणूक टाळण्यासाठी पॉझिटिव्ह पे सिस्टिम लागू केली आहे. फसवणूक रोखण्यासाठी 2020 पासून धनादेशासाठी केंद्रीय बँकेने पॉझिटिव्ह पे सिस्टिम सुरु केली आहे. या सिस्टिममुळे 50,000 आणि त्यावरील अधिकच्या पेमेंटसाठी नुकसान टाळण्यास येणार आहे. सिस्टिमनुसार, SMS,बँकेचे मोबाईल ॲप वा एटीएमद्वारे धनादेश देणाऱ्या व्यक्तीला धनादेशाविषयीची माहिती बँकेला द्यावी लागणार आहे. धनादेशाविषयी ही माहिती तपासली जाते. सर्व माहिती योग्य वाटल्यावरच धनादेशाची पुढील प्रक्रिया पूर्ण करता येते.

पाच लाखांवरील व्यवहार गेल्यावर्षी बँक ऑफ बडोद्याचे (BOB) धनादेशाचे नियम बदलले. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन बँक केले आहे. बँक ऑफ बडोद्याने त्याअनुषंगाने धनादेश व्यवहारांचा नियम बदलले. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या तारखेपासून पाच लाख रुपयांच्या वरील आर्थिक व्यवहारांसाठी बँकेने पॉझिटिव्ह पे सिस्टिम (Positive Pay System) लागू केली आहे. धनादेश देणाऱ्याला बँक आता धनादेश व्यवहाराची विषयीची अद्ययावत माहिती एसएमएस, नेटबँकिंग, मोबाईल ॲपद्वारे देईल. त्यामुळे धनादेश व्यवहाराच्या फसवणुकीचे प्रकार होणार नाही.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.