आजच्या दिवशी तुमचं वय काय ?, कसं चेक कराल वय ?; हा आहे सोपा उपाय

तुमचं वय किती आहे ते मोजणं तसं सोपं आहे. पण किती वर्ष, महिने आणि दिवस हे अगदी बरोब्बर मोजायचं असेल तर थोडं किचकट होऊ शकतं. पण आजच्या कॉम्प्युटर आणि मोबाईल फोनच्या युगात हे काम अगदी सहज करता येते.

आजच्या दिवशी तुमचं वय काय ?, कसं चेक कराल वय ?; हा आहे सोपा उपाय
Image Credit source: freepik
Follow us
| Updated on: Nov 01, 2023 | 3:25 PM

What’s your age : जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल, तर अनेकदा फॉर्म भरताना तुम्हाला तुमचे सध्याचे वय (age) भरण्यास सांगितलं जातं. अशा वेळेसे आपण वय कॅलक्युलेट (age calculation) करून लिहीतो, ते सोपं आहे. पण किती वर्ष, महिने आणि दिवस पूर्ण झाले, असं कोणी विचारलं तर ते मोजणं थोडं किचकट होऊ शकतं की. अशा वेळेस आपण वही-पेन घेऊ, बरंच डोक लढवून संपूर्ण वय ( वर्ष, महिने, दिवस) मोजू लागतो. पण असं असलं तरी प्रत्येकालाच वय Calculate करायला जमतच असं नाही.

पण सध्याचं युग हे टेक्नॉलॉजीचं आहे. कॉम्प्युटर, लॅपटॉप आणि मोबाईलच्या फास्ट जमान्यात एखादी गोष्ट चुटकीसरशी होऊ शकते. मग वय मोजणं तरी कठीण का राहील ? या साधनांचा योग्य वापर केला तर तुम्ही चुटकीसरशी तुमचं ( संपूर्ण) वय मोजून सांगू शकता. फक्त त्यासाठी त्याची योग्य पद्धत माहीत असली की झालं.

चला मग जाणून घेऊया वय मोजण्याचा उपाय (How to Calculate Age) 

  1. सर्वप्रथम तुमच्या मोबाईल किंवा लॅपटॉपच्या ब्राऊझरवर ‘Age Calculator’ असे टाईप करा.
  2. त्यानंतर तुमच्यासमोर काही वेबसाईटचे ऑप्शन्स येतील. त्यापैकी एखाद्या ऑप्शनवर क्लिक करा.
  3. नंतर तिथे तुमची जन्मतारीख (Date of Birth) टाकावी.त्यापुढे तुम्हाला ज्या तारखेपर्यंतचे वय कॅलक्युलेट करायचे आहे, ते टाकावे.

Mobile App द्वारे असं मोजा तुमचं वय

  1. Google Play Store या Apple App Store वर जा.
  2. नंतर Age Calculator सर्च करा.
  3. सर्वात जास्त डाउनलोड करण्यात आलेले आणि चांगले रिव्ह्यू असलेले App डाउनलोड करा.
  4. डाउनलोड केलेले App ओपन करा.
  5. तिथे तुमची जन्मतारीख टाका.
  6. नंतर तुम्हाला ज्या तारखेपर्यंतचे वय मोजायचे आहे तो आकडा तिथे टाका.

Excel Sheet द्वारेही मोजता येईल वय

जर तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असाल आणि तुम्हाला कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांचे वय शोधायचे असेल तर प्रत्येकाचे वय स्वतंत्रपणे ऑनलाइन शोधणे खूप मोठं आणि जिकीरीचं काम होतं. पण तुम्ही हे काम स्प्रेडशीट किंवा एक्सेल शीटद्वारे अगदी सहजपणे करू शकता. यासाठी तुम्हाला प्रत्येकाची जन्मतारीख लिहावी लागेल आणि त्यानंतर फॉर्म्युला सेट करावा लागेल. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या कर्मचाऱ्यांचे वय काही मिनिटांत शोधू शकाल. तुमच्या गरजेनुसार तुम्ही ऑनलाइन फॉर्म्युला शोधू शकता.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.