Gold Paper : अक्षय तृतीयाला साधा सोन्याचा मुहूर्त ! पेपर गोल्ड करेल मालामाल

Gold Paper : अक्षय तृतीयाला सोनेरी मुहूर्त गाठा. या दिवशी सोने खरेदी शुभ मानण्यात येते. त्यामुळे सोन्याच्या वाढत्या किंमतींमुळे सोने खरेदीबाबत तुम्ही संभ्रमात असाल तर तुमच्यासाठी पेपर गोल्ड हा चांगला पर्याय ठरु शकतो. कसा, ते जाणून घ्या..

Gold Paper : अक्षय तृतीयाला साधा सोन्याचा मुहूर्त ! पेपर गोल्ड करेल मालामाल
मुहूर्त साधा
Follow us
| Updated on: Apr 19, 2023 | 4:38 PM

नवी दिल्ली : साडेतीन मुहूर्तांपैकी एक अक्षय तृतीयाला (Akshay Tritiya) हिंदू धर्मात अनन्यसाधारण महत्व आहे. अर्धा मुहूर्त असला तरी या दिवशी खरेदी केलेली गोष्ट, केलेले कार्य अक्षय टिकते, अशी मान्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्य या दिवशीचा मुहूर्त गाठून सोने खरेदी करतात. दिवाळीनंतर सोन्याने जोरदार उसळी घेतली आहे. सोन्याचे भाव गगनाला भिडले आहेत. सोने आणि चांदीने (Gold Silver Price) खरेदीदारांचे तोंडचे पाणी पळवले, त्यामुळे अनेक जण थेट सोने खरेदी करण्याऐवजी त्याला पर्याय शोधत आहे. फिजिकल सोन्याला पेपर गोल्ड (Paper Gold) हा चांगला पर्याय ठरु शकतो. यामधील गुंतवणूक तुम्हाला मालामाल करु शकते.

Paper Gold म्हणजे काय? आपण सोने खरेदी करतो, त्यावेळी एक पिवळा चमकदार धातू घरी घेऊन येतो. यामध्ये शिक्के, बिस्कट, तुकडा, आभुषण, दागिने यांचा समावेश आहे. सोन्याच्या धातू रुपाला फिजिकल गोल्ड असे म्हणतात. आता तुमच्याकडे सोन्यासारखी कोणतीच जड वस्तू नाही. पण कागदाचा एक तुकडा आहे, ज्याचे मूल्य सोन्याच्या किंमती इतकेच आहे, सोन्याची विक्री करुन जेवढा पैसा तुम्हाला मिळेल. तेवढीच हा कागद दिल्यानंतर रक्कम मिळेल तर? म्हणजे दस्तावेज, करार करुन मिळालेले सोने म्हणजे पेपर गोल्ड आहे. हा कागद सोन्या इतकाच मौल्यवान असतो. त्यातूनही तेवढाच परतावा मिळतो. भारतात पेपर गोल्डमध्ये गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत. भारतीय रिझर्व्ह बँक सॉव्हेरिन गोल्ड बाँड, गोल्ड ईटीएफ आणि गोल्ड म्युच्युअल फंड यासारखी पर्याय ग्राहकांना देते.

पेपर गोल्डचे फायदे काय तुम्ही प्रत्यक्ष सोने खरेदी केल्यावर एक निश्चित स्वरुपात तुम्हाला फिजिकल सोने घरी आणता येते. एक ग्रॅमपासून ते काही किलोपर्यंत तुम्हाला सोने खरेदी करता येते. पेपर गोल्डमध्ये पण असाच फायदा मिळतो. पण फिजिकल गोल्ड खरेदी करुन घरात ठेवणे जिकरीचे काम ठरते. पेपर गोल्डमध्ये ही जोखीम नसते. तसेच फिजिकल गोल्डपेक्षा यामध्ये अधिक परतावा मिळतो.

हे सुद्धा वाचा

सवलत ही मिळते सॉव्हेरिन गोल्ड बाँडमध्ये डिजिटल पेमेंट केल्यास खरेदीदाराला आरबीआय प्रत्येक ग्रॅमच्या खरेदीमागे 50 रुपयांपर्यंतची सवलत देते. डीमॅट खात्यातून सोन्याची खरेदी केल्यास तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये या सोन्यावर ट्रेडिंग करु शकता. सॉव्हेरिन गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूकदाराला सोन्याच्या मूल्यासह वार्षिक 2.5 टक्के व्याज पण मिळते.

म्युच्युअल फंड गोल्ड म्युच्युअल फंड केवळ सोन्यात गुंतवणूक करत नाहीत. तर अनेकदा त्यांच्या पोर्टफोलिओत विविध कंपन्याचा समावेश असतो. ज्या सोन्याच्या खाणी आणि सोन्यासंबंधीच्या व्यापारात गुंतलेल्या असतात. त्यामुळे या म्युच्युअल फंडमधील गुंतवणुकीवरील रिटर्न आणखी वाढतो. म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला एक रक्कमी गुंतवणूक करण्याची गरज नाही, तुम्ही मासिक 1000 रुपयांची कमीत कमी गुंतवणूक करुन फायदा घेऊ शकता.

सोन्याची मोठी झेप जर गेल्या पाच वर्षांतील आकडेवारीवर नजर टाकली तर सोन्याची लांब उडी लक्षात येईल. सोने 31 हजार रुपयांहून 61 हजार रुपयांवर पोहचले आहे. सोन्याने गेल्या पाच वर्षांत दुप्पट कमाई करुन दिली आहे. आता 1 एप्रिलपासून हॉलमार्किंग सोने विक्री आणि खरेदी अनिवार्य करण्यात आली आहे. 1 एप्रिलपासून सोन्यावर (Gold) 6 अंकी अल्फान्यूमेरिक हॉलमार्क कोड अनिवार्य करण्यात आलेला आहे. त्यामुळे शुद्ध सोन्याची हमी ग्राहकांना मिळाली आहे.

दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.