Top up Loan : कर्ज डोक्यावर असताना किती फायदेशीर टॉपअप लोनचा पर्याय

Top up Loan : घर खरेदीसाठी अनेक जण होम लोनचा पर्याय निवडतात. पण तरीही पैसा कमी पडल्यावर टॉपअप लोन मिळते. कर्ज मिळतंय म्हणून ते गरज नसताना घेणे फायदेशीर ठरते का?

Top up Loan : कर्ज डोक्यावर असताना किती फायदेशीर टॉपअप लोनचा पर्याय
खोटी कागदपत्रं बनवून बँक व्यवस्थापकाने घेतले कर्ज
Follow us
| Updated on: Jun 20, 2023 | 7:20 PM

नवी दिल्ली : घर खरेदीसाठी होम लोन घेण्याचा पर्याय अनेक जण निवडतात. पण घर खरेदी करुन भागत नाही. घराच्या सजावटीसाठी, इंटरिअरसाठी, फर्निचरसाठी अनेक खर्च असतो. हा खर्च पूर्ण करण्यासाठी अनेक जण नंतर टॉपअप लोन घेतात. काहीजण टॉपअपऐवजी वैयक्तिक कर्जाकडे वळतात. पण हे कर्ज असुरक्षित वर्गात येत असल्याने बँका त्यावर अधिक व्याज आकारतात. त्यामुळे टॉपअप कर्ज (Top up Loan) घेण्याकडे सर्वांचाच कल असतो. गृहकर्जावर (Home Loan) टॉपअप कर्ज घेणे सर्वात सोपा आणि स्वस्त पर्याय ठरतो. पण कर्ज मिळतंय म्हणून ते गरज नसताना घेणे फायदेशीर ठरते का?

काय आहे अतिरिक्त कर्ज गृहित धरा की तुम्ही 10 वर्षांसाठी 50 लाख रुपयाचं कर्ज घेतलं आहे. तुम्ही गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने याचे हप्ते पण फेडत आहात. तेव्हा घराच्या डागडुजीसाठी तुम्हाला कर्जाची गरज आहे. फर्निचर करायचे असेल, तेव्हा पैशांची आवश्यकता आहे. अशावेळी तुम्हाला गृहकर्जावर हे अतिरिक्त कर्ज उचलता येते.

असा करा अर्ज टॉपअप कर्जासाठी तुम्ही ज्या बँकेतून गृहकर्ज घेतले आहे, तिथे अर्ज करावा लागेल. ही सुविधा त्याच ग्राहकांना मिळते, ज्यांनी संबंधित बँकेतून गृहकर्ज घेतले आहे. टॉपअप लोन हे कर्जदाराची संपत्ती, त्याचा हप्त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड, जोरदार क्रेडिट स्कोअर या आधारे देण्यात येते. तसेच टॉपअप कर्जावरील व्याज पण ग्राहकाची आर्थिक स्थिती, क्रेडिट स्कोअर यावर अवलंबून असते. प्रत्येक बँकेचे टॉपअप कर्जावर व्याजदर वेगवेगळे असते. तुमचा कर्जासाठीचा अर्ज स्वीकारल्यानंतर अतिरिक्त रक्कम तुमच्या खात्यात वर्ग करण्यात येते.

हे सुद्धा वाचा

टॉपअप कर्जाचे फायदे टॉपअप कर्जासाठी अर्ज करताना आणि स्वीकृत प्रक्रिया अत्यंत गतीशील आणि सोपी असते. कारण कर्जदाराशी बँकेचे अगोदरच संबंध असतात, त्यामुळे कागदी घोडे फारशे नाचवावे लागत नाही. लागलीच कर्ज प्रक्रिया मार्गी लागते.

वैयक्तिक कर्जापेक्षा स्वस्त टॉपअप कर्ज हे मुळ कर्जावरच देण्यात येत असल्याने त्याची व्याजदरे किंचित जास्त असतात. तुमचे बँकेशी चांगले संबंध असतील तर तुमचा परतफेडीचा ट्रॅक रेकॉर्ड उत्तम असेल तर तुम्हाला टॉपअप कर्ज अत्यंत कमी व्याजावर देण्यात येते. त्यामुळे पैशांची गरज पूर्ण करण्यासाठी तुम्हाला वैयक्तिक कर्जापेक्षा टॉपअप कर्ज स्वस्त पडते.

एकाचवेळी ईएमआयचा पर्याय सध्याच्या गृहकर्जावर तुम्ही टॉपअप कर्ज घेतले. तर मुळ कर्जाचा ईएमआय आणि टॉपअप कर्जावरील व्याज एकदाच चुकता करण्याचा पर्याय मिळतो. त्यामुळे एकाचवेळी दोन्ही कर्जाचा हप्ता तुम्हाला लागलीच चुकता करता येतो. कर्ज हप्ता चुकण्याचा प्रश्न उरत नाही.

गरज नसताना घेऊ नका तुम्हाला अत्यंत आवश्यकता असेल तरच हे आगाऊ कर्ज घ्या. नाहीतर हा आगाऊपणा तुम्हाला नडू शकतो. तुमची आर्थिक परिस्थिती, कर्जाचा हप्ता भरताना तुम्हाला नाकेनऊ येत असताना टॉपअर कर्जाच्या नाहक भानगडीत पडू नका. अथवा गरजेपेक्षा जास्त कर्ज ही घेऊ नका. त्यामुळे व्याजाचा नाहक भूर्दंड तुम्हाला बसणार नाही.

मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार
मला काही सांगायचंय..., महाराष्ट्रातील राजकारण आता रंगमंचावर सादर होणार.
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर
'त्या' मनसे कार्यकर्त्याचा मारहाणीमुळे मृत्यू,पोस्टमार्टम रिपोर्ट समोर.
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा
'त्या दोन्ही वाचाळविरांना आवरा, अन्यथा..', नाना पटोलेंचा सरकारला इशारा.
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट
संजय गायकवाडांची वादग्रस्त वक्तव्यावरून माघार? पण राहुल गांधींसमोर अट.
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली
'चेहऱ्याला बघून चाटायचं? तो कितीही चांगला...', बच्चू कडूंची जीभ घसरली.
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी
‘एक देश, एक निवडणूक’ प्रस्तावाला मोदी कॅबिनेटची मंजुरी.
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?
अमित ठाकरेंना दिडोंशी विधानसभेतून उमेदवारी मिळणार?.
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?
पुण्यात 27 तास झाले मिरवणूक सुरूच,गेल्या वर्षीचा रेकॉर्ड ब्रेक होणार?.
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?
रश्मी ठाकरे राज्याच्या पहिल्या मुख्यमंत्री? काय म्हणाल्या पेडणेकर?.
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा
'२०२४ ला वाटच लावणार, मराठ्यांचे पोरं आता...',मनोज जरांगेंचा थेट इशारा.