अमेझॉनने भारतात लाँच केला आयपी एक्सेलरेटर प्रोग्राम, विक्रेत्यांना असा मिळेल फायदा
अमेझॉनचा हा एक्सेलेरेटर मालमत्ता (आयपी) एक्सेलेरेटर प्रोग्रामद्वारे अशा विक्रेत्यांची मदत करेल, जे ब्रँडचे मालकही आहेत आणि विश्वसनीय इंटलेक्चुअल प्रॉपर्टी तज्ज्ञ आणि कायदा संस्थांकडून सहजपणे सेवा मिळवू शकतील. (Amazon launches IP accelerator program in India, sellers will benefit)
नवी दिल्ली : ई-कॉमर्स क्षेत्रातील प्रमुख अॅमेझॉनने भारतात इंटलेक्चुअल प्रॉपर्टी एक्सेलरेटर (आयपी एक्सेलरेटर) कार्यक्रम सुरू करण्याची घोषणा केली आहे. याअंतर्गत, ब्रँड मालक असलेले विक्रेत्यांना आयपी तज्ज्ञ आणि कायदा कंपन्यांकडून सेवा मिळू शकतील. छोटे आणि मध्यम आकाराचे हे विक्रेते अमेझॅन.इन वर आणि जागतिक स्तरावर या आयपी लॉ कंपन्यांच्या सहकार्याने ट्रेड मार्कला संरक्षित, आपल्या ब्रँडला सुरक्षित करु शकतील आणि कोणताही उल्लंघनापासून बचाव करु शकतील, असे एका निवेदनात म्हटले आहे. (Amazon launches IP accelerator program in India, sellers will benefit)
अॅमेझॉनच्या टेक्निकल व्हाइस प्रेसिडेंट, ब्रँड प्रोटेक्शन, मेरी बेथ वेस्टमोरलँड म्हणाले की, आयपी एक्सेलरेटर प्रोग्राम अमेरिका, युरोप आणि कॅनडामध्ये आधीच उपलब्ध आहे. वेस्टमोरलँड म्हणाले, “या कार्यक्रमाचा लाभ भारतीय कंपन्यांना उपलब्ध करुन दिल्याने आम्हाला आनंद झाला. आमच्या या प्रोग्रामद्वारे कंपन्या त्यांच्या इंटलेक्चुअल प्रॉपर्टीचे रक्षण करू शकतील. हे सर्वांसाठी एक चांगला खरेदी अनुभव देते.” ते म्हणाले की, 2019 मध्ये अमेरिकेत आयपी एक्सेलेटर लाँच केले गेले. तेव्हापासून या कार्यक्रमाचा विस्तार युरोप, जपान, कॅनडा, मेक्सिको आणि आता भारतात झाला आहे.
एक्सेलेरेटर प्रोग्रामचा ब्रँड मालकांना होईल फायदा
अमेझॉनचा हा एक्सेलेरेटर मालमत्ता (आयपी) एक्सेलेरेटर प्रोग्रामद्वारे अशा विक्रेत्यांची मदत करेल, जे ब्रँडचे मालकही आहेत आणि विश्वसनीय इंटलेक्चुअल प्रॉपर्टी तज्ज्ञ आणि कायदा संस्थांकडून सहजपणे सेवा मिळवू शकतील. अमेझॉनडॉटइन आणि अॅमेझॉन वेबसाइट्सवर वैश्विक स्तरावर ट्रेडमार्क सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्यांचा ब्रँड जागतिक स्तरावर संरक्षित करण्यासाठी आणि उल्लंघन रोखण्यासाठी मदत करण्यासाठी व्यवसाय या आयपी लॉ फर्मांशी जोडण्याचा पर्याय निवडू शकतात.
अॅमेझॉन इंडियाचे संचालक (एमएसएमई आणि सेलिंग पार्टनर एक्सपीरियन्स) प्रणव भसीन म्हणाले, “आम्ही आयपी एक्सेलेरेटर कार्यक्रम भारतात सुरू करण्यास उत्सुक आहोत. हे लाखो विक्रेत्यांना, विशेषत: नवीन ब्रँडसह लहान आणि मध्यम आकाराच्या विक्रेत्यांना आयपी संरक्षण स्थापित करण्यास मदत करते. ते म्हणाले, “आज भारतात अमेझॉनवर 8.5 लाखाहून अधिक विक्रेते नोंदणीकृत आहेत आणि त्यांना वाढण्यास मदत करण्यासाठी आम्ही नवीन साधने, तंत्रज्ञान आणि नाविन्यपूर्ण उपक्रम आणण्यास वचनबद्ध आहोत.” (Amazon launches IP accelerator program in India, sellers will benefit)
पुढचे 25 वर्ष राजकारणातच राहणार; संन्यास घेण्याच्या विधानानंतर फडणवीसांची सारवासारव https://t.co/HS24adZz6m @Dev_Fadnavis @OfficeofUT @AjitPawarSpeaks @BJP4Maharashtra @ShivSena #Devendrafadnavis #PoliticalRetirement #bjp4india #uddhavThackeray
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 4, 2021
इतर बातम्या
‘दिरंगाई’ हा एमपीएससीचा आवडता ‘उद्योग’, ‘दिरंगाईचा खेळ’ कायमचा थांबवा; अमित ठाकरेंचा संताप
नागपुरात तिसऱ्या लाटेचे संकेत, 12 दिवसांच्या बाळाचा कोरोनामुळे मृत्यू