Amazon Summer Sale : अॅमेझॉनच्या समर सेलला सुरुवात, वस्तुंच्या खरेदीवर आकर्षक सूट; आजच खरेदी करा
अॅमेझॉनकडून भारतात समर सेलची सुरुवात करण्या आली आहे. या समर सेलमध्ये विविध प्रकारच्या वस्तुंवर भरघोस सुट देण्यात आली आहे.
मुंबई : जगातील टॉप ऑनलाई विक्री वेबसाईट असलेल्या अॅमेझॉनकडून भारतात समर सेलची (Amazon Summer Sale) घोषणा करण्यात आली आहे. या समर सेलला 2 मे 2022 पासून सुरुवात झाली आहे. समर सेलच्या (Summer Sale) निमित्ताने स्वस्तात वस्तूंची खरेदी करण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध झाली आहे. या समर सेलमध्ये वन प्लस, एलजी, इंटेल, टेक्नो, फ्युजिस्तू, रेनी, आणि शुगर यांसारख्या अनेक ब्रॅण्ड्सच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असून, ग्राहक अॅमेझॉनवरून या वस्तूंची खरेदी करून मोठी बचत देखील करू शकतात. समर सेलमध्ये रियलमी, अॅपल, सॅमसंग, ओप्पो, बोट, नॉईज, फोसिल, फास्ट्रॅक, टायमेक्स, अमेरिकन टुरिस्ट (American Tourist), सफारी, स्कायबॅग, युरेका फोर्ब्स, फिलीप्स, हिरो सायकल इत्यादींसारख्या ब्रॅण्ड्सवर घसघशीत सुट देण्यात आली आहे. या समर सेलचे वैशिष्ट म्हणजे विविध जग प्रसिद्ध ब्रॅण्ड्सच्या वस्तूंवर तर सुट देण्यात आलीच आहे. सोबतच आयसीआयसीआय बँक, कोटक आणि आरबीएलच्या क्रेडिट, डेबिट कार्डवर अतिरिक्त दहा टक्के सूट देण्यात आल्याने इथे ग्राहकांना दुहेरी बोनस मिळवण्याची संधी आहे.
विविध वस्तू विक्रीसाठी उपललब्ध
या समर सेलमध्ये, ग्राहक लहान आणि मध्यम व्यवसाय, भारतीय डायरेक्ट-टू-कंझ्युमर स्टार्ट-अप, स्टोअर्स आणि संपूर्ण भारतातील महिला उद्योजकांद्वारे ऑफर केलेल्या विस्तृत निवडी शोधू शकतात आणि खरेदी करू शकतात. फॅशन आणि ब्युटी अत्यावश्यक वस्तू, अॅक्सेसरीज, स्मार्ट वेअरेबल, ऑफिस उत्पादने आणि स्टेशनरी, घर, किचन आणि स्पोर्ट्स उत्पादने, फर्निचर, किराणा, खेळणी आणि बेबी केयर उत्पादने या सारख्या विविध श्रेणींमधील उत्पादनावर समर सेलमध्ये मोठी सूट देण्यात आली आहे. तसेच विविध बँकांच्या क्रेडीत आणि डेबीट कार्डवर देखील सूट देण्यात आल्याने ग्राहकांचा मोठा फायदा होऊ शकतो.
उद्योजकांसाठी मोठी बचत
या समर सेलचे आणकी एक वैशिष्ट म्हणजे जे किरकोळ विक्रेते आहेत, किंवा होलसेल विक्रेते आहेत त्यांना देखील मोठी सूट मिळणार आहे. एकाच वेळी बल्क वस्तूंची खरेदी केल्याने त्यांना इतर ग्राहकांपेक्षा अतिरिक्त सूट मिळणार आहे. तसेच जे सिंगल ग्राहक आहेत एक किंवा दोन वस्तू खरेदी करणारे ग्राहक आहेत त्यांना जो ऑनलाईन खरेदीचा लाभ मिळणार आहे. तो लाभ देखील या विक्रेत्यांना मिळणार असून, सेलमध्ये खरेदी केल्यास त्यांची मोठी बचत होऊ शकते.