…तर, कोट्यावधी दूध उत्पादकांना फटका, ‘या’ निर्णयाला हवी मुदतवाढ; अमूलचं केंद्राला पत्र

केंद्राच्या या निर्णयामुळं दूध उत्पादक शेतकरी आणि दूध उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे. अमूल (Amul) सोबत अन्य कंपन्यांनी प्लासिक स्ट्रॉ वर बंदी न घालण्याची विनंती केली होती

...तर, कोट्यावधी दूध उत्पादकांना फटका, ‘या’ निर्णयाला हवी मुदतवाढ; अमूलचं केंद्राला पत्र
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 12:13 AM

नवी दिल्ली: हवाबंद दुग्धउत्पादनांसोबत मिळणाऱ्या प्लास्टिक स्ट्रॉ (Plastic Straw) वर बंदी घालण्याच्या विचारात केंद्र सरकार आहे. केंद्राचं नव्या पावलामुळं देशातील सर्वात मोठा दुग्धप्रक्रिया उद्योग समूहानं सरकारला पत्र लिहिलं आहे. अमूलनं प्लास्टिक स्ट्रॉ बंदी काही दिवसासाठी लांबणीवर टाकण्याची विनंती केली आहे. केंद्राच्या या निर्णयामुळं दूध उत्पादक शेतकरी आणि दूध उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे. अमूल (Amul) सोबत अन्य कंपन्यांनी प्लासिक स्ट्रॉ वर बंदी न घालण्याची विनंती केली होती. मात्र, सरकारनं निर्णय धुडकावून लावला आहे. अमूलनं थेट पंतप्रधान कार्यालयाची दार ठोठावली आहेत. पीएमओला (PMO) लिहिलेल्या पत्रात अमूलचे महाव्यवस्थापक आर.एस.सोधी यांनी प्लास्टिक स्ट्रॉमुळे दूधाच्या खपात वाढ होत असल्याचं म्हटलं आहे.

दूध उद्योगाला फटका:

अमूलनं म्हटलयं प्लास्टिक स्ट्रॉ वरील बंदीचा निर्णयामुळे देशातील दहा कोटी दुध उत्पादकांना फटका बसणार आहे. प्लास्टिक स्ट्रॉचा वापर कमी प्रमाणात होतो. त्याऐवजी पेपर स्टॅॉचा वापर केला जाऊ शकतो. 5 रुपयांपासून सुरू होणाऱ्या दुग्ध उत्पादनांना भारतात सर्वाधिक मागणी आहे. अमूल, पेप्सिको, कोका-कोला सारखे पेय पदार्थ प्लास्टिक स्ट्रॉ पॅक करुन ग्राहकांपर्यंत पोहचवितात.

पर्याय पेपर स्ट्रॉचा:

केंद्राच्या नव्या पावलामुळं अमूल, पेप्सिको तसेच कोका-कोला सारख्या अन्य कंपन्यांना धक्का बसला आहे. मात्र, सरकारनं निर्णय बदलण्यास ठाम नकार दिला आहे. सरकारच्या ताठर भूमिकेमुळे प्लास्टिक स्ट्रॉला अन्य पर्याय शोधण्यासाठी मुदत मागितली आहे.कंपन्या पेपर स्ट्रॉ आयात करण्याचा विचार करत आहे. स्थानिक पातळीवर पेपर स्ट्रॉ तयार करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण होईपर्यंत बंदी घालू नये. सध्या आमच्याकडे पर्याय नसल्याने बंदी घालू नाहे. किमान दोन-तीन वर्षे पर्याय निर्माण करण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी अमूलसहित अन्य कंपन्यांनी सरकारकडं केली आहे.

अमूल जागतिक ब्रँड:

अमूल ही भारत देशामधील एक प्रमुख दूध उत्पादक सहकारी संस्था आहे. गुजरातच्या आणंद शहरामध्ये स्थापित अमूल भारतामध्ये दूध क्रांती घडवून आणण्यासाठी ओळखली जाते. व्हर्गीस कुरियन ह्यांनी अमूल दूधाला देशभर पोचवण्यात सिंहाचा वाटा उचलला. अमूलची 38600 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल आहे. दूधासोबत ताक, दही, चीज, पनीर, चॉकलेट इत्यादी असंख्य लोकप्रिय उत्पादने अमूलच्या ब्रॅंडखाली विकली जातात.

सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....