लॉन्च होताच पडला LICचा शेअर! गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग, आता काय काळजी घ्यावी? जाणून घ्या

एलआयसीचे शेअर्स आज 8 टक्क्यांहून अधिक घसरणीसह सूचीबद्ध झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. अशा परिस्थितीमध्ये आता गुंतवणूकदारांनी काय करावे जाणून घेऊयात

लॉन्च होताच पडला LICचा शेअर! गुंतवणूकदारांचा अपेक्षाभंग, आता काय काळजी घ्यावी? जाणून घ्या
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 17, 2022 | 11:45 AM

एलआयसीचे (LIC) शेअर्स आज 8 टक्क्यांहून अधिक घसरणीसह सूचीबद्ध (LIC Listing) झाले. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनचा शेअर इश्यू किमतीच्या तुलनेत 8.11 घसरला. एलआयसीचा शेअर आज 872 रुपयांवर सूचीबद्ध झाला. तर दुसरीकडे बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच बीएसईवर देखील शेअरमध्ये 8.62 टक्क्यांची घसरण दिसून आली. बीएसईमध्ये शेअर 867.20 रुपयांवर लिस्टिंग झाला आहे. एलआयसीचा शेअर्स किरकोळ गुंतवणूकदारांना 904 रुपये तर विमाधारकांना खास सवलतीसह 889 रुपयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र आता एलआयसीचे शेअर्स 8 टक्क्यांहून अधिक घसरणीसह सूचीबद्ध झाल्याने त्याची किंमत 867.20 रुपयांवर पोहोचली आहे. याचा मोठा फटका हा गुंतवणूकदारांना (Investor) बसला आहे. अशा परिस्थितीमध्ये गुंतवणूकदारांनी नेमकी काय कळजी घ्यावी हे जाणून घेऊयात.

गुंतवणूकदारांनी काय करावे?

एलआयसीचा शेअर घसरणीसह लिस्टिंग झाला आहे. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर 8.11 टक्के तर बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये 8.62 टक्के घसरणीसह शेअर सूचीबद्ध झाला आहे. मात्र तरी देखील अनेक गुंतवणूकदारांना एलआयसीचे शेअर चांगला परतावा देऊ शकतात असा विश्वास आहे. याबाबत बोलताना जीईपीएल कॅपीटलचे हर्षद गाडेकर यांनी म्हटले आहे की, सध्या एलआयसीच्या शेअर्समध्ये पडझड सुरू आहे. मात्र गुंतवणूकदारांनी शेअर्स खरेदी करावेत. ‘इन्वेस्ट आज फॉर कल’चे अनंत लोढा यांनी म्हटले आहे की, ज्या गुंतवणूकदारांनी एलआयसीच्या शेअर्समध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. एलआयसीच्या शेअर्समधून शॉर्ट टर्मसाठी चांगला परतावा मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी एक तर आपली गुंतवणूक कमी करावी अन्यथा लॉंग टर्मसाठी विचारा करावा. लॉंग टर्म गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे.

छोट्या गुंतवणूकदारांना दिलासा

एलआयसीची लिस्टिंग घसरणीसह झाली आहे. मात्र त्यात समाधानाची बाब म्हणजे शेअर्स खरेदीचा जोर वाढला आहे. येत्या काळात शेअर्स खरेदी आणखी वाढल्यास स्टॉकची किंमत 900 रुपयांच्या वर जाण्याची शक्यता आहे. विमाधारक तसेच एलआयसीचे कर्मचारी यांना शेअर खरेदीमध्ये सूट देण्यात आली होती. विमाधारकांना प्रति शेअर मागे 60 रुपयांची तर कर्मचाऱ्यांना प्रति शेअर्समागे 45 रुपयांची सूट देण्यात आली होती. त्यामुळे जर शेअर्सची किंमत 900 पार पोहोचल्यास हे गुंतवणूकदार फायद्यात राहू शकतात.

हे सुद्धा वाचा

गुंतवणूकदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण

दरम्यान गुंतवणूकदारांमध्ये सध्या गोंधळाचे वातावरण आहे. एलआयसीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल या आशेने अनेक जणांनी एलआयसीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली. मात्र एलआयसीचा शेअर घसरणीसह लिस्टिंग झाला त्यामुळे गुंतवणूकदारांची धाकधूक वाढली आहे.

अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.