Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LIC Policy : बंद पडलेली पॉलिसी पुन्हा करायची सुरु? अशी आहे प्रक्रिया

LIC Policy : अनेकजण उत्साहात एलआयसीची पॉलिसी सुरु करतात. पण ती सुरु ठेवणे त्यांना पुढे कठिण जाते. मग अशावेळी पॉलिसी बंद पडते. ही बंद पडलेली पॉलिसी तुम्हाला पुन्हा सुरु करता येते. त्यासाठी एलआयसीने आता सुविधा दिली आहे.

LIC Policy : बंद पडलेली पॉलिसी पुन्हा करायची सुरु? अशी आहे प्रक्रिया
Follow us
| Updated on: Feb 24, 2023 | 10:06 PM

नवी दिल्ली : अनेकजण उत्साहात एलआयसीची पॉलिसी (Insurance Policy) सुरु करतात. पण ती सुरु ठेवणे त्यांना पुढे कठिण जाते. मग अशावेळी पॉलिसी बंद पडते. ही बंद पडलेली पॉलिसी तुम्हाला पुन्हा सुरु करता येते. त्यासाठी एलआयसीने (LIC) आता सुविधा दिली आहे. तुम्हाला बंद पॉलिसी सुरु करता येणार आहे. पण त्यासाठी एक निश्चित कालावधी ठरविण्यात आला आहे. अनेक दिवसांपासून व्यपगत, बंद पडलेली पॉलिसी सुरु करण्यासाठी एलआयसीने एक ड्राईव्ह सुरु केला आहे. या मोहिमेतंर्गत 1 फेब्रुवारी ते 24 मार्च 2023 रोजी दरम्यान एलआयसीची बंद पॉलिसी सुरु करता येणार आहे. सर्व प्रकारच्या पॉलिसी रिन्युअल करता येतील. काही कारणास्तव पॉलिसी बऱ्याच दिवसांपासून बंद झाली असेल तर ती सुरु करता येईल. हप्ता न भरल्याने ही पॉलिसी बंद झाल्यास आता पुन्हा सुरु करता येणार आहे.

एखादी पॉलिसी व्यपगत (Lapsed) झाली असेल तर ती या मोहिमेत सुरु करता येईल. 1 फेब्रवारी 2023 ते 24 मार्च 2023 या कालावधीत विलंब शुल्क भरुन ही पॉलिसी सुरु करता येते. 1 लाख रुपयांपर्यंतच्या प्रीमियमवर विलंब शुल्कावर 25 टक्क्यांची सूट देण्यात आली आहे. 3 लाख रुपयांच्या प्रीमियमवर 25 टक्क्यांची सूट मिळेल. तर 3 लाख आणि त्यापेक्षा अधिकच्या प्रीमियमवर 30 टक्के सूट मिळेल. त्यानुसार दुहेरी फायदा होईल.

एलआयसी विमा पॉलिसीचे नुतनीकरण करण्यासाठी अट आणि नियमांचे पालन करावे लागेल. त्यानुसार अनपेड प्रीमियमची तारीख पाच वर्षांच्या आत नुतनीकरण करण्यात येईल. प्रीमियम भरताना तो ऑनलाईन भरल्यास 5 रुपयांची विशेष सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे विलंब शुल्क भरताना त्याचा फायदा घेता येईल.

हे सुद्धा वाचा

पण ही नुतनीकरणाची मोहिम सर्वच पॉलिसींसाठी लागू नाही. अधिक जोखिमयुक्त मुदत विमा, आरोग्य विमा, मल्टिपल रिस्क पॉलिसीजसाठी नुतनीकरणाची संधी देण्यात आलेली नाही. टर्म इन्शुरन्स पॉलिसीबाबत नियमात एक सवलत देण्यात आली आहे. त्यानुसार अशा विमांच्या मुदत अद्याप संपलेली नसेल तर त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.

एलआयसी ही देशातील सर्वात मोठी आणि जुनी विमा कंपनी आहे. वेळोवेळी एलआयसी प्रत्येक वर्गासाठी योजना आणते. या योजनेतून गुंतवणूकदारांचा मोठा फायदा होतो. त्यामुळे एलआयसीच्या योजनेवर अजून गुंतवणूकदारांचा विश्वास आहे. एलआयसी योजनाचा सर्वात चांगला फायदा म्हणजे, बचतीसह गुंतवणूकदाराला विम्याचे संरक्षणही मिळते. त्याला मॅच्युरिटी कालावधीनंतर सर्व फायदे तर मिळतातच, पण पुढे पाच ते दहा वर्ष विम्याचे संरक्षण सुरुच राहते.

मुख्यमंत्र्यांनी सांगितली नागपूर घटनेची A to Z स्टोरी
मुख्यमंत्र्यांनी सांगितली नागपूर घटनेची A to Z स्टोरी.
विधानभवनात पत्रकारांना धक्काबुक्की, माध्यमांच्या प्रतिनिधींचंच आंदोलन
विधानभवनात पत्रकारांना धक्काबुक्की, माध्यमांच्या प्रतिनिधींचंच आंदोलन.
'अजितदादा... जरा जमिनीवर या', करूणा शर्मांनी अजित पवारांना फटकारलं
'अजितदादा... जरा जमिनीवर या', करूणा शर्मांनी अजित पवारांना फटकारलं.
हल्ले करणारे चेहरे ओळखीचेच; नागपूर प्रकरणावर राऊतांचा गंभीर आरोप
हल्ले करणारे चेहरे ओळखीचेच; नागपूर प्रकरणावर राऊतांचा गंभीर आरोप.
'सत्तेतील एक मंत्री वळवळ करतोय', नागपुरातील रड्यावरून वडेट्टीवार भडकले
'सत्तेतील एक मंत्री वळवळ करतोय', नागपुरातील रड्यावरून वडेट्टीवार भडकले.
विधानभवना बाहेर सत्ताधारी-विरोधक आमनेसामने
विधानभवना बाहेर सत्ताधारी-विरोधक आमनेसामने.
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील टोल महागणार, आता किती भरावा लागणार टोल?
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील टोल महागणार, आता किती भरावा लागणार टोल?.
नागपुरातील राड्यानंतर मुख्यमंत्र्यांचे एकच आवाहन; 'सर्वांनी...'
नागपुरातील राड्यानंतर मुख्यमंत्र्यांचे एकच आवाहन; 'सर्वांनी...'.
नागपुरात कलम 144 लागू, राड्यानंतर तणावपूर्ण शांतता; नेमकं काय घडलं?
नागपुरात कलम 144 लागू, राड्यानंतर तणावपूर्ण शांतता; नेमकं काय घडलं?.
जळगावात दोन गटात तूफान राडा
जळगावात दोन गटात तूफान राडा.