Pension Plan : निवृत्तीचे करताय प्लॅनिंग? मग या चार योजना आहेत ना!

Pension Plan : निवृत्ती योजनेत गुंतवणूक केल्यास औषधपाण्यावरील खर्च भागविता येऊ शकतो. त्यासाठी वेळेवर कुठे कर्ज मागण्याची गरज भासत नाही. आयुष्याची संध्याकाळ जोडीदारसोबत निवांत घालविण्यासाठी निवृत्ती योजनेत गुंतवणूक कामी येते.

Pension Plan : निवृत्तीचे करताय प्लॅनिंग? मग या चार योजना आहेत ना!
Follow us
| Updated on: Feb 26, 2023 | 9:51 PM

नवी दिल्ली : नवीन वर्षात भविष्यातील खर्चासाठी (Financial Expenditure)आर्थिक तरतूद करणे अत्यंत आवश्यक आहे. निवृत्ती योजनेत (Pension Scheme) गुंतवणूक केल्याने आयुष्याची संध्याकाळ सुखकर होईल. पण त्यासाठी अर्थातच तुम्हाला भरघोस गुंतवणूक करावी लागेल. तरच जोरदार परतावा मिळेल. त्यामुळे औषधपाण्यावरील खर्च भागविता येऊ शकतो. त्यासाठी वेळेवर कुठे कर्ज मागण्याची गरज भासणार नाही. आयुष्याची संध्याकाळ जोडीदारसोबत निवांत घालविण्यासाठी निवृत्ती योजनेत गुंतवणूक (Investment) कामी येते. निवृत्ती योजनेत तुम्हाला दरमहा, तिमाही, सहामाही आणि वार्षिक अशा स्वरुपात परतावा घेता येतो. त्यानुसार रक्कम वाटून दिल्या जाते. आता जेवढी जास्त गुंतवणूक कराल, तेवढी पेन्शन जास्त मिळते.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना फायदेशीर आहे. 60 वर्षांवरील नागरिकांना या योजनेत सहभागी होता येते. 55 ते 60 वय असणारी नागरिक पण या योजनेत सहभागी होऊ शकतात. या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना 30 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. या योजनेत तुम्हाला कराचा फायदा मिळतो. प्राप्तिकर कायद्याच्या कलम 80 सी अंतर्गत ही सवलत मिळते. अल्पबचत योजनेतून या स्कीमचे संचालन होते.

राष्ट्रीय निवृत्ती योजनेत तुम्ही नियमीत गुंतवणूक करु शकता. निवृत्तीनंतर कर्मचारी या योजनेतून काही पैसे काढता येतात. इतर पैसा गुंतवू शकतात. त्यानंतर तुम्हाला महिन्याला पेन्शन मिळते. ही मार्केट लिंक योजना आहे. या योजनेत गुंतवणूकदारांना सरासरी 8-10 टक्के वार्षीक परतावा मिळतो. पाच वर्षांच्या मॅच्युरिटीनंतर या योजनेतून रक्कम काढता येते.

हे सुद्धा वाचा

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री वय वंदना योजना आहे. एलआयसीच्या मार्फत ही योजना राबविण्यात येते. त्यामुळे उतारवयात लोकांना सामाजिक सुरक्षा मिळते. पंतप्रधान वय वंदना योजनेत (PMVVY) एकरक्कमी 9 लाख रुपयांची गुंतवणूक तुम्हाला आयुष्याच्या संध्याकाळी फायदेशीर ठरु शकते. या योजनेत तुम्हाला वार्षिक 72 हजार रुपयांची पेन्शन मिळेल. या योजनेवर LIC सध्या 7.40% वार्षिक व्याज देते.

तुम्ही अर्धवार्षिक व्याजाचा पर्यायही निवडू शकता. तुम्हाला सहा महिन्यासाठी 36 हजार रुपये मिळतील. म्हणजेच दरमहा गुंतवणूकदाराला निवृत्ती वेतन मिळेल. ही रक्कम दरमहा 6 हजार रुपये असेल. LIC च्या योजनेत ही रक्कम तुम्हाला मिळेल. या योजनेतंर्गत पेंशनधारकाला मासिक, त्रैमासिक, सहामही, वार्षिक आधारावर पेन्शन देण्यात येते. केंद्र सरकार आणि भारतीय आर्युविमा महामंडळ (LIC) ही योजना राबविते.

अटल पेन्शन योजना (Atal Pension Scheme) ही फायदेशीर आहे. कष्टकरी आणि मजूर वर्गासाठी ही योजना फायदेशीर आहे. दरमहा त्यांच्या खात्यातून एक ठराविक रक्कम निवृत्ती योजनेसाठी वळती होते. ही योजना निवृत्तीसाठी स्वेच्छेने बचत करण्यास प्रोत्साहन देते. भविष्यात खर्च भागविण्यासाठी या योजनेत रक्कम जमा करता येते.

अटल पेन्शन योजना ही एक सामाजिक सुरक्षा योजना आहे. असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी या योजनेत एक छोटी रक्कम कपात होते. योगदान राशी दरमहा जमा करण्यात येते. या योजनेमुळे भविष्य सुरक्षिततेची हमी मिळते. उतारवयात खर्चासाठी एक ठराविक रक्कम मिळते.

सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.