Currency : ATM मधून मिळाल्या फटाक्या नोटा? कुठे बदलवणार? हा आहे सोपा मार्ग

Currency : ATM मधून पैसे काढताना अनेकदा फाटक्या नोटा येतात, तेव्हा काय करावे..

Currency : ATM मधून मिळाल्या फटाक्या नोटा? कुठे बदलवणार? हा आहे सोपा मार्ग
अशा मिळतील नोटा बदलवूनImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 13, 2022 | 8:29 PM

नवी दिल्ली : ATM मधून पैसे काढताना अनेकदा फाटक्या नोटा (Damage Note) मिळतात. एकतर नोटा मळकट, तुकडे झालेल्या, चिकट टेपचा वापर करुन जोडलेल्या अशाही मिळतात. अशा फाटक्या नोटांना पर्याय काय आहे? कारण आपल्याकडून फाटक्या नोटा कोणची घेत नाही. त्या दैनंदिन व्यवहारात (Daily Practice) चालविता येत नाही. अशावेळी या नोटांचे काय करावे? केंद्रीय बँकेचा यासाठी काही नियम आहे का?

तर यावर अत्यंत सोपा उपाय आहे. कोणत्याही बँकेत तुम्ही या नोटा जमा करु शकतात. त्यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागत नाही. बँक तुमच्याकडून या नोटांची नोंद करुन त्याबदल्यात तुम्हाला त्याच मूल्याच्या दुसऱ्या नोटा देते.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) एटीएम मधून निघणाऱ्या फाटक्या, तुटक्या नोटा बदलण्यासाठी नियम तयार केले आहेत. या नियमानुसार, बँकेच्या एटीएममधून फाटक्या नोटा आल्या, तर बँक या नोटा बदलण्यास नकार देऊ शकत नाही.

हे सुद्धा वाचा

नोटा बदलण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे. त्यासाठी कोणतीही किचकट प्रक्रिया नाही. जुलै 2016 मध्ये आरबीआयने अशा नोटा बदलण्यासाठी एक परिपत्रकही काढले होते. त्यानुसार, जर एखादी बँक नोट बदलण्यासाठी नकार देत असेल तर तिच्यावर कारवाई होते.

जर एखादी बँक ग्राहकाला नोटा बदलवून देत नसेल तर अशा बँकेविरोधात नियमानुसार आरबीआय कारवाई करते. ही कारवाई दंडात्मक असते. बँकेला 10 हजार रुपयांपर्यंत दंड लावता येतो. हा नियम बँकांचा शाखांवरही लागू होतो.

जर बँकेच्या एटीएममधून फाटक्या, तुटक्या नोटा येत असतील तर ही बँकेवर जबाबदारी निश्चित होते. अशा नोटा बदलण्याची जबाबदारी बँकेची असते. त्यामुळे एटीएममध्ये नोटा जमा करतानाच त्याची पडताळणी करणे हे बँकेचे काम असते.

जर नोटेचा अनुक्रमांक, महात्मा गांधींचा वॉटरमार्क आणि गर्व्हनरची शपथ दिसत असेल, तर बँकेला ती नोट बदलून द्यावी लागते. आरबीआयच्या नियमानुसार, एका व्यक्तीला जास्तीत जास्त 20 नोटाही बदलविता येतात. त्यांचे मूल्य 5000 रुपयांहून अधिकचे नसावे.

नोटा बदलविण्यासाठी व्यक्तीला अर्ज लिहावा लागेल. एटीएममधून किती तारखेला, वेळ नमूद करत किती रक्कम काढली याचा तपशील नोंदवावा लागेल. तसेच कोणत्या मूल्याची नोट फाटकी आली आहे त्यांचा उल्लेख आणि एटीएमची स्लीप जोडावी लागेल.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.