Cyber Crime : महाराजा थाळी पडली महागात! अवघ्या 200 रुपयांच्या ऑफरसाठी महिलेला लाखांचा गंडा..

Cyber Crime : महाराजा भोग थाळीची ऑफर मुंबईतील महिलेला महागात पडली..

Cyber Crime : महाराजा थाळी पडली महागात! अवघ्या 200 रुपयांच्या ऑफरसाठी महिलेला लाखांचा गंडा..
थाळीच्या नावाखाली गंडाImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 21, 2022 | 4:29 PM

मुंबई : महाराजा भोग थाळीच्या (Maharaja Bhog Thali) आकर्षक ऑफरखाली मुंबईतील महिलेला सायबर भामट्यांनी (Cyber Crime) लाखोंचा चूना लावला आहे. थाळी तर दूर पण खात्यातून दणादण रक्कम लंपास झाली. त्यामुळे अशा ऑफरपासून (Offer) सावध राहणे हेच सर्वात महत्वाचे आहे.

वांद्रे पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार, या महिलेने फेसबूकवर महाराजा भोग थाळीची जाहिरात पाहिली. त्यात 200 रुपयांच्या बाय वन गेट वन फ्री ऑफर देण्यात आली होती. ही जाहिरात फसवी (Fraud Facebook Ads) होती. या जाहिरातीवर क्लिक केल्यावर महिलेला लाखोंचा गंडा घालण्यात आला.

या महिलेने या दोन थाळींसाठी 200 रुपये देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी तिने सायबर भामट्यांनी लिंक पाठविलेल्या मॅसेजमध्ये रिमोट अॅक्सेस अॅपही डाऊनलोड झाले आणि रिमोट अॅक्सेसची परवानगी महिलेने नकळतपणे दिली.

हे सुद्धा वाचा

याचा वापर करत सायबर भामट्यांनी या 54 वर्षीय महिलेच्या खात्यातून धडाधड रक्कम पळवायला सुरुवात केली. आरोपीने तिच्या खात्यातून 27 व्यवहार केले आणि खात्यातून 8.46 लाख रुपये दुसरीकडे वळते केले.

ही महिला तिच्या भावासह राहते. संध्याकाळी फेसबूक बघत असताना या महिलेला ही जाहिरात दिसली. महाराजा भोग थाळीसाठी 200 रुपयांच्या बाय वन गेट वन फ्री ऑफर होती. तिने लिंकवर क्लिक केल्यावर हा सर्व प्रताप घडला.

लिंकवर तिला तिचे वैयक्तिक तपशील आणि बँकेचा तपशील तसेच मोबाईल क्रमांक भरण्यास सांगण्यात आले. त्यानंतर तिला एक कॉल आला. त्यानंतर दुसरी लिंक पाठविण्यात आली. त्यात पुन्हा बँक डिटेल्स आणि डेबिट कार्डचा तपशील देण्यात आला. त्याच लिंकमध्ये भामट्यांनी झोहो हे रिमोट अॅक्सेस अॅप ही पाठविले.

अॅप डाऊनलोड होऊन, ते वापरण्याची परवानगी नकळतपणे या महिलेने दिली. त्यानंतर पुढील व्यवहार करताना, तिचा पासवर्ड आणि वन-टाईम पासवर्ड चोरट्यांनी वाचला. त्याआधारे चोरट्यांनी महिलेच्या खात्यातून 8.46 लाख रुपये वळते केले.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.