Personal Loan | पर्सनल लोनसाठी करताय खटपट, कर्ज मिळेल झटपट, व्याजदर तर जाणून घ्या..

Personal Loan | अनेकदा वैयक्तिक कर्ज घ्यावे लागते. त्यासाठी बँकांचे व्याजदर काय आहेत हे माहिती असणे गरजेचे आहे. अडचणीच्या काळात पर्सनल लोन उपयोगी पडते.

Personal Loan | पर्सनल लोनसाठी करताय खटपट, कर्ज मिळेल झटपट, व्याजदर तर जाणून घ्या..
वैयक्तिक कर्ज मिळवा झटपटImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 03, 2022 | 10:45 AM

Personal Loan | तातडीची आर्थिक निकड (Financial Need) भागवण्यासाठी अनेकदा वैयक्तिक कर्ज (Personal Loan) घ्यावे लागते. त्यात गैरही काही नाही. पर्सनल लोन तात्काळ मिळते. काही कागदपत्रांआधारे कर्ज मिळवता येते. आता तर अनेक बँका आणि वित्तीय संस्थांच्या अॅपवर (Bank App)काही प्रक्रिया पूर्ण करताच, थोड्यात तासात कर्ज मंजुरीचा संदेश येतो. थोड्यावेळाने रक्कमही खात्यात जमा होते. ऑनलाईनही प्रक्रिया सोपी झाली आहे. तुमचा क्रेडिट स्कोअर उत्तम असेल तर इंस्टंट लोनही मिळते. विशेष म्हणजे क्रेडिट स्कोअर (Credit Score) जेवढा तगडा असेल तेवढ्या ऑफर्सही चांगल्या असतात. व्याजदरात आणि प्रक्रिया शुल्कात सूट दिल्या जाते. वैयक्तिक कर्जासाठी कोणत्याही प्रकारची मालमत्ता तारण ठेवावी लागत नाही. खासगी वित्त संस्था, बँका आणि सरकारी बँका वैयक्तिक कर्ज पुरवठा करतात. या बँकांचे व्याजदर किती असतो. त्याची माहिती घेऊयात…

ही कागदपत्रे महत्वाची?

नोकरीबाबतचा तपशील, पत्त्याचा पुरावा, आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक स्टेटमेंट, फोटो आदी दस्ताऐवज पर्सनल लोन घेण्यासाठी लागतात. सलग एक वर्षाची नोकरीत असणाऱ्या कर्मचाऱ्याला पर्सनल लोन देण्यात येते. क्रेडिट स्कोअरही तपासल्या जातो.

लगेच कर्ज कसे मिळेल?

कर्जदाराची क्षमता जोखून बँका वैयक्तिक कर्ज देतात. क्रेडिट स्कोअर चांगला असेल तर कर्ज मिळणे अधिक सोपे होते. क्रेडिट स्कोअर चांगला ठेवण्यासाठी कर्जाचे हप्ते कधीही चुकवू नका. नाहीतर पुढील कर्ज घेताना त्याचा फटका सहन करावा लागतो.

हे सुद्धा वाचा

इतक्या कोटींची मागणी

गेल्या दोन वर्षांत वैयक्तिक कर्जांमध्ये 10 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. जून-2022 मध्ये वैयक्तिक कर्जांमध्ये 18 टक्के (वर्षागणिक) दराने वाढ झाली. जुलै 2020 मध्ये वैयक्तिक कर्ज घेण्याचा दर 9 टक्के होता. याचा अर्थ कोरोना काळाच्या सुरुवातीला कर्ज घेण्याच्या प्रमाणापेक्षा आता कर्ज घेण्याचे प्रमाण दुप्पट झाले आहे.

कोरोना काळात ही कर्जाचे प्रमाण जास्त

जवळजवळ प्रत्येक क्षेत्रात वैयक्तिक कर्ज घेण्याचे प्रमाण वाढले आहे. यामध्ये गृहनिर्माण, वाहन आणि क्रेडिट कार्डद्वारे कर्ज घेण्याचे प्रमाण वाढले आहे. जुलै-2020 ते जून-2022 या कालावधीत 4 लाख कोटी रुपयांचे गृहकर्ज घेतल्या गेले आहे. तर वाहन खरेदीसाठी 2 लाख कोटी रुपये आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून 515 अब्ज रुपयांचे कर्ज घेण्यात आले आहे.

असे आहेत व्याज दर

बँक                                  वार्षिक व्याज दर

एचएसबीसी बँक               9.50% ते 15.25%

एसबीआय                        9.60% ते 15.65%

सिटी बँक                          9.99% ते 16.49%

बँक ऑफ बडोदा             10.50% ते 12.50%

एचडीएफसी बँक              10.5% ते 21.00%

येस बँक                           10.99% ते 16.99%

कोटक महिंद्रा बँक            10.25% पासून सुरु

इंडसइंड बँक                   10.49% ते 31.50%

फेडरल बँक                     10.49% ते 17.99%

बँक ऑफ इंडिया              10.35% ते 12.35% या

आयसीआयसीआय           10.75% ते 19.00%

अॅक्सिस बँक                   12.00% ते 21.00%

वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.