Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Loan Apps : लोन ॲपच्या जाळ्यात अडकला? झिरोधाचे नितीन कामथ यांचा सल्ला पडेल उपयोगी

Loan Apps : लोन ॲपच्या जाळ्यात अडकून अनेक भारतीयांचे आयुष्य नरकासारखे झाले आहे. आताच एका कुटुंबाने या कर्ज जाळ्यात अडकून आयुष्य संपवले. अशा कर्ज प्रकरणात न अडकण्याचे आवाहन अनेक जण करतात. झिरोधाचे नितीन कामथ यांनी पण या ॲपपासून वाचण्याचा सल्ला दिला आहे.

Loan Apps : लोन ॲपच्या जाळ्यात अडकला? झिरोधाचे नितीन कामथ यांचा सल्ला पडेल उपयोगी
Follow us
| Updated on: Jul 19, 2023 | 6:45 PM

नवी दिल्ली | 19 जुलै 2023 : आता बाजार ऑनलाईन आला आहे. तुम्हाला झटपट कर्ज देणाऱ्या अनेक वित्तीय संस्था ऑनलाईन आल्या आहेत. Google प्ले स्टोअरवर कर्ज देणारे भरमसाठ ॲप (Loan Apps) उपलब्ध आहे. काही कागदपत्रांच्या आधारे या वित्तीय संस्था, लोन ॲप तुम्हाला झटपट कर्ज मंजूर करतात. पण ही सावकारी लवकर लक्षात येत नाही. दुप्पट, तिप्पट व्याज वसूल करुनही हे भामटे कर्जदाराकडून वसूली करतच राहतात. त्याचे शोषण करतात. त्याला अपमानीत करतात. देशात अशा कर्जप्रकरणांमुळे कुटुंबची कुटुंब उद्धवस्त होत आहेत. अनेक जण कुटुंबासह आत्महत्या करत आहेत. अशा मोहजाळापासून वाचण्याचा सल्ला झिरोधाचे नितीन कामथ ( Nitin Kamath, Zerodha) यांनी दिला आहे. त्यासाठी त्यांनी कानमंत्र दिला आहे. काय आहे नितीन कामथ यांचा सल्ला

कायद्याचा घ्या आधार

अनेकजण अत्यावश्यक खर्चासाठी, मौजमजेसाठी अथवा महागड्या मोबाईलसाठी या ॲपच्या विळख्यात सापडतात. त्यानंतर त्यांची पिळवणूक सुरु होते. पठाणी वसूली करण्यात येते. नितीन कामथ यांनी याविषयी एक ट्विट केले आहे. त्यांनी अशा ॲप पासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. तुम्ही जर अशा मोहजाळ्यात अडकला तर टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी अगोदर कायदेशीर सल्ला आवश्य घ्या. तुमच्या सुरक्षेसाठी अनेक कायदे असल्याचा सल्ला नितीन कामथ यांनी अडकलेल्यांना दिला आहे.

हे सुद्धा वाचा

कारवाईच थातूरमातूर

झिरोधाचे सहसंस्थापक नितीन कामथ यांनी या बोगस ॲपपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. देशात गेल्या वर्षात अशाप्रकारचे कर्ज घेणाऱ्यांचे प्रचलन वाढल्याचे त्यांनी सांगितले. या पठाणी वसूलीमुळे अनेक कुटुंबाची वाताहत झाल्याचे त्यांनी सांगितले. ब्लॅकमेलिंगमुळे त्रासलेल्या कुटुंबांनी सामुहिक आत्महत्या केल्याच्या अनेक घटना घडली आहे. पण याविरोधात कडक कारवाई होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

ॲप तर सुरुच

कर्ज ॲपविरोधात भारतीय रिझर्व्हने बँकेने कारवाईचे निर्देश दिले आहेत. त्यांच्याविरोधात कारवाईचा फास आवळला आहे. नागरिकांना या ॲपपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. पण याचा कोणताही फायदा झाला नाही. अनेक ॲप अजून सुरुच असल्याचे दिसते. त्यांच्या विळख्यात अजून किती कुटुंबांना आत्महत्या करावी लागणार आणि त्यानंतर यंत्रणांना जाग येणार, हा सवाल आहे.

समोर आले दोन प्रकरणे

भोपाळमधील एका व्यक्तीने लोन ॲपच्या वसूली एजंटमुळे हैराण झाले. पत्नी आणि मुलासह त्याने जीवन संपवले. यासारखीच घटना बेंगळुरु शहरात घडली. येथे 22 वर्षाच्या एका इंजिनिअरने ऐन तारुण्यातच मृत्यूला कवटाळले. या दोन्ही घटना लोन ॲपशी संबंधित आहेत. कर्ज वसूली एजंटने सातत्याने ब्लॅकमेल केल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे समोर आले. कोविडनंतर असे अनेक प्रकरणे समोर आली.

या ठिकाणी करा तक्रार

नितीन कामथ यांनी या लोन ॲपच्या विळख्यात अडकलेल्या लोकांना सल्ला दिला आहे. त्यांच्या ब्लॅकमेलिंगला न घाबरता त्यांच्याविरोधात तक्रार देण्याचा सल्ला त्यांनी दिला. लोन ॲपचे वसुली एजंट तुम्हाला त्रास देत असेल तर त्यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करा. तसेच नॅशनल सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार दाखल करता येते. ऑनलाईन तक्रार दाखल करता येते. नितीन यांनी पीडितांना 1930 या क्रमांकावर कॉल करण्याचे आवाहन केले आहे.

सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त
भारतीय जवानांकडून 2 दहशतवाद्यांचा खात्मा; मोठा शस्त्रसाठा जप्त.
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?
हल्ल्यानंतर काय आहे पहलगामची परिस्थिती?.