तुम्ही नवी नोकरी जॉईन करणार आहात?, मग ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
खासगी क्षेत्रातील (Private sector) लोकांना वारंवार नोकऱ्या (job) बदलाव्या लागतात. नोकरी बदलण्यामागे अनेक कारणे असतात. मुख्य कारण म्हणजे पगार (Salary) कमी असणे, कामाबाबत समाधानी नसणे अशा कारणांमुळे अनेक जण नोकरी बदलतात.
खासगी क्षेत्रातील (Private sector) लोकांना वारंवार नोकऱ्या (job) बदलाव्या लागतात. नोकरी बदलण्यामागे अनेक कारणे असतात. मुख्य कारण म्हणजे पगार (Salary) कमी असणे, कामाबाबत समाधानी नसणे अशा कारणांमुळे अनेक जण नोकरी बदलतात. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर तुमची नोकरी बदलली तर काही गोष्ट लक्षात घेणे गरजेचे असते. नाही तर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. यामध्ये अनेक गोष्टींचा समावेश होते. जसे की तुम्ही जी कंपनी जॉईन करणार आहात, त्या कंपनी संर्दभात आधीच सर्व माहिती घ्या, जसे की त्या कंपनीचा इतिहासा नियम, सॅलरी स्ट्रकचर, तिथे किती कर्मचारी काम करतात. कामाचे स्वरुप कसे आहे. या सर्व गोष्टींची माहिती घेणे गरजेचे असते. ज्याचा तुम्हाला भविष्यात मोठा फायदा होऊ शकतो. आज आपण अशाच काही गोष्टींची माहिती घेणार आहोत. ज्या गोष्टी तुम्हाला जॉब बदलताना फायद्याच्या ठरू शकतात.
ऑफर लेटर पूर्ण वाचा
सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही ज्या कंपनीत जॉईन होणार आहात, त्या कंपनीचे ऑफर लेटर ज्वाइन होण्यापूर्वी निट वाचा. सर्व गोष्टी समजून घ्या. तुम्हाला नोकरी जॉइन केल्यानंतर तुम्हाला कंपनीकडून काय सुविधा देण्यात येणार आहेत. तुमची सॅलरी किती असणार आहे. इतर कोणत्या सुविधा देण्यात येणार आहेत. तुमचा कंपनीसोबत करार कसा आहे. या सर्व गोष्टींची माहिती असते. तुम्ही जर ऑफर लेटर व्यवस्थित वाचले आणि तुम्हाला जर कंपनीच्या सर्व अटी शर्थी मान्य असेल्या तरच ऑफर स्विकारा.
कंपनीची माहिती घ्या
तुम्ही ज्या कंपनीमध्ये मुलाखत देण्यासाठी जाणार आहात किंवा कर्मचारी म्हणून जॉईन होणार आहात, त्या कंपनीची सर्व माहिती अगोदरच काढा. म्हणजे त्या कंपनीचा पूर्व इतिहास काय आहे? कंपनीचा टर्नओव्हर काय आहे? भविष्यात या कंपनीत काम केल्यास तुमची किती प्रगती होऊ शकते. कर्मचारी आणि कंपनी प्रशासन यांचे संबंध कसे आहेत, कामाचे स्वरूप काय आहे. या सर्व गोष्टींची आधीच माहिती घ्या. असे केल्यास तुम्ही जॉइन झाल्यानंतर तुम्हाला अडचणी येणार नाहीत.
कंपनीच्या अटी शर्थी
तुम्ही ज्या कंपनीत जॉइन होणार आहात, त्या कंपनीच्या अटी शर्थी सर्वप्रथम समजून घ्या, त्या अटी जर तुम्हाला मान्य असतील तरच कंपनी ज्वाईन करा. अन्यथा तुम्ही आणखी दुसऱ्या काही पर्यांचा अवलंब करू शकता.
संबंधित बातम्या
धनादेश फसवणुकीला ‘पीएनबी’चा चाप ! ग्राहकांसाठी सुरु केली खास सुविधा
CNG Price Hike : सुटकेचा गुरुवार, पेट्रोल-डिझेलचे भाव स्थिर, सीएनजीचे भाव मात्र 3 रुपयाने वाढले
ऑनलाईन कर्ज देणाऱ्या अॅपची न्यायालयाकडून गंभीर दखल, अॅपवर नियंत्रण कधी येणार? ‘आरबीआयला’ सवाल