मुंबईः फेसबुक, ट्विटर (Twitter), यूट्यूब, गुगल आदींवर मोठ्या प्रमाणात जाहिराती दाखूवन गुंतवणूकदारांना पैसे गुंतवण्याचे व जादा परतावा देण्याच्या आमिषाने फसवणूक केली जात आहे. जाहिराती पाहून परदेशी कंपन्यांमध्ये (foreign companies) पैसे गुंतवूण मोठा नफा कमावण्याचा विचार करत असाल तर हे तुमच्यासाठी धोक्याचे ठरु शकते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने अनधिकृत इलेक्ट्रॉनिक ट्रेडिंग प्लॅटफॉर्म (ETP)वर परकीय चलन व्यापार करू नये किंवा अशा व्यवहारांसाठी पैसे न पाठवण्याच्या सूचना केल्या आहेत. आरबीआयने सांगितलेय, की जे लोक असे करतात त्यांच्याविरुद्ध फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अॅक्ट म्हणजेच ‘फेमा’अंतर्गत दंडात्मक कारवाई केली जाईल. सोशल मीडिया, सर्च इंजिन, ओटीटी प्लॅटफॉर्म, गेमिंग अॅप्स आणि इतर तत्सम प्लॅटफॉर्मवर फसव्या जाहिरातींद्वारे अनधिकृत इटीपी वरून परकीय चलन व्यापाराची ऑफर दिली जात असल्याची माहिती बँकेला मिळाली आहे. डिजिटल मीडियावर अनधिकृत परकीय चलन आणि डेरिव्हेटिव्ह ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर जाहिरातींवर बंदी घालण्यासाठी आरबीआय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाशी संपर्क साधणार आहे.
केंद्रीय बँक मंत्रालय आणि नियामक संस्था फेसबुक, ट्विटर, यूट्यूब, गुगल, बिंग इत्यादी प्रमुख सोशल मीडिया आणि सर्च इंजिन प्लॅटफॉर्मवर फसव्या जाहिरातींवर बंदी घालण्यात येइल. याशिवाय गुगल, ऍपल आणि मायक्रोसॉफ्टच्या मोठ्या अॅप स्टोअर्सना भारतीय कायद्याचे पालन न करणारे अनधिकृत ट्रेडिंग प्लॅटफॉर्म काढून टाकण्यास सांगितले जाणार आहे. इलेक्ट्रॉनिक फॉरेक्स व्यवहारांसाठी फक्त RBI अधिकृत ETP किंवा मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अनधिकृत ईटीपीद्वारे काही एजंटही नेमण्यात आले असून, ते लोकांशी थेट संपर्क साधून त्यांना मोठ्या प्रमाणात नफा कमविण्याचे आमिष दाखवून फॉरेक्स ट्रेडिंग किंवा गुंतवणूक योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करतात. आरबीआयने याला नवीन प्रकारची फसवणूक म्हटले आहे. या फसव्या जाहिरातील तसेच एजंटपासून सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
भारतीयांमध्ये विदेशी शेअर्स, विशेषत: अमेरिकन कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणुकीचा कल अधिक आहे. टेस्ला, मायक्रोसॉफ्ट, अॅमेझॉन, फेसबुक आणि गुगल सारख्या कंपन्याही झपाट्याने श्रीमंत होत आहेत. या कंपन्यांची झपाट्याने होणारी वाढ पाहून भारतातील अनेक गुंतवणूकदारही अमेरिकन कंपन्यांमध्ये पैसे गुंतवत आहेत.
संबंधित बातम्या
Lata Mangeshkar health update : लतादीदी आयसीयूत, उपचाराला प्रतिसाद देत आहेत; डॉक्टरांनी दिली माहिती
तुम्हालाही पॅनकार्डवरील फोटो बदलायचा आहे, अगदी सोप्या पध्दतीने सहज शक्य आहे…