Atal Pension Yojana | दरमहा फक्त 210 रुपये जमा करा आणि मिळवा वार्षिक 60,000 रुपये पगार

Atal Pension Yojana | अटल पेन्शन योजनेत तुम्हाला किमान 20 वर्षे पैसे जमा करावे लागतील. वयाची 60 वर्षे पूर्ण केल्यानंतर तुम्हाला दरमहा 5,000 रुपये पेन्शन मिळेल.

Atal Pension Yojana | दरमहा फक्त 210 रुपये जमा करा आणि मिळवा वार्षिक 60,000 रुपये पगार
अटल पेन्शन योजना Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 05, 2022 | 8:02 AM

Atal Pension Yojana | केंद्र सरकारची (Central Government) अल्पावधीतच सर्वाधिक लोकप्रिय झालेली योजना म्हणजेच प्रधानमंत्री अटल पेन्शन योजना (APY) ही होय. आयुष्याची संध्याकाळ सुखात जावी यासाठी ही योजना लाभधारकांना मदत करते. या योजनेतंर्गत अल्पबचत करुन तुम्हाला उतार वयात महिन्याचा औषधांचा खर्च भागविता येतो. आतापासूनच या योजनेत जर तुम्ही गुंतवणूक केली तर योजनेतंर्गत तुम्हाला चांगले फायदे मिळू शकतात. ही योजना विविध बँक (Bank) अथवा पोस्ट कार्यालयातही (Post Office) उपलब्ध आहे. या योजनेचे अॅप ही उपलब्ध आहे. ज्यामध्ये तुमच्या गुंतवणुकीची अद्ययावत माहिती तुम्हाला मिळते. तुम्हीही भविष्यासाठी अधिक चांगल्या योजनेच्या शोधात असाल तर अटल पेन्शन योजना हा सर्वात शानदार पर्याय ठरू शकतो. या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर वयाच्या 60 व्या वर्षानंतर दरमहा 5 हजार रुपये पेन्शन मिळते. केंद्र सरकारच्या या योजनेत देशातील नागरीक मोठ्या प्रमाणात गुंतवणूक(Investment) करत आहेत. या योजनेसाठी देशातील कोणताही नागरिक अर्ज करू शकतो.

योजनेत वयाची अट

अटल पेन्शन योजनेत 18 वर्षे ते 40 वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक सहभागी होऊ शकतो. या योजनेत किमान 20 वर्षे मासिक पैसे जमा करणे बंधनकारक आहे. प्रत्येक महिन्यात किती योगदान द्यायचे हे लाभार्थ्यांच्या वयावर अवलंबून असते.

अटल पेन्शन योजनेचा लाभ

किमान 18 वर्षे वयाचा कोणताही भारतीय नागरिक या योजनेत सहभागी होऊ शकतो. वयाच्या 18 व्या वर्षी, जास्तीत जास्त 5000 महिन्यांच्या पेन्शन मर्यादेसाठी, त्याला दरमहा 210 रुपये द्यावे लागतील. वयाच्या 25 व्या वर्षी जोडल्यास योगदान दरमहा 376 रुपये, तर 30 वर्षे वय असलेल्यांसाठी 577 रुपये, 35 वर्षांच्या लोकांसाठी 902 रुपये आणि 39 वर्षे वयाच्यांसाठी 1318 रुपये योगदान आहे. पती-पत्नी असे संयुक्त खाते उघडता येते. तसेच त्यांना वेगवेगळी खाती ही उघडता येतात. त्यानुसार त्यांना हे योगदान वेगळे द्यावे लागेल.

हे सुद्धा वाचा

आयकर सूट

या योजनेची खास वैशिष्ट्ये म्हणजे यामध्ये गुंतवणूक केल्यानंतर गुंतवणूकदारांना प्राप्तीकर खात्याच्या कलम 80 सी अंतर्गत कर सवलत मिळते. यात कमीत कमी 1 हजार रुपये आणि जास्तीत जास्त 5 हजार रुपये मासिक पेन्शन मिळू शकते. ग्राहकाचा मृत्यू झाल्यास पेन्शनची रक्कम वारसदाराला देण्यात येते. या योजनेअंतर्गत तुम्हाला किमान 20 वर्षे गुंतवणूक करावी लागेल.

पंतप्रधान सुरक्षा विमा योजना

पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेंतर्गत, विमाधारकाला 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते. या योजनेत खातेदाराला दरवर्षी 12 हजार रुपये प्रीमियम जमा करावा लागतो. लाभधारकाला विम्याचे दोन लाख रुपयांचे संरक्षण मिळते. या योजनेचा लाभ 18 ते 70 वर्षे वयोगटातील व्यक्ती घेऊ शकते. या योजनेचे दरवर्षी नूतनीकरण करावे लागते. खातेधारकाचा मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास तुम्हाला 2 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळेल. हा विमा १ जून ते ३१ मे पर्यंत वैध असतो.

Non Stop LIVE Update
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार
ठाकरे लंडनच्या तयारीत, त्यांनी भांडुपच्या देवानंदला..., राणेंचा पलटवार.
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात
'... त्यामुळे दैत्यांचं तेच झाल', मविआच्या पराभवावर कंगना यांचा घणाघात.
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?
महायुतीत कोणाला किती मंत्रिपद? मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर काय चर्चा?.
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी
सत्तास्थापनेच्या हालचालींदरम्यान अजित पवार यांची मोठ्या पदावर वर्णी.
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?
'मला पाडण्यासाठी भाजपकडं भीक मागितली पण..',सत्तारांचा कोणावर हल्लाबोल?.
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?
रणजितसिंह मोहिते पाटलांची भाजपमधून हकालपट्टी करा, कोणाची आक्रमक मागणी?.
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'
पंकजा मुंडेंवर नवनिर्वाचित आमदाराकडून टीका, 'ताईंनी मला धोका...'.
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?
महायुतीला बहुमत, आता मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार?.
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका
'सुपडासाफ, रात्री 3 पर्यत सभा घेतल्या पण...', भुजबळांची जरांगेंवर टीका.
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?
Result 2024: तुफान मुसंडी, 2014 हून मोठी लाट, पहिल्यांदाच असं काय घडल?.