Car Driving : पहिल्यांदाच कार खरेदी करतायं? मग ‘या’ महत्वाच्या गोष्टींची माहिती असायलाच हवी

तुम्ही आयुष्यातील पहिली कार खरेदी करत असाल आणि त्यातही ऑटोमॅटिक कार खरेदीच्या विचारात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अधिक महत्वाची आहे. कार खरेदी करण्यापूर्वी तुम्ही AMT आणि CVT कारमधील फरक नक्की जाणून घ्या. या दोन्ही ऑटोमॅटिक ट्रान्समिशन भारतात अत्यंत लोकप्रिय असल्या तरी तुमच्यासाठी कोणता पर्याय योग्य आहे, हे या लेखातून जाणून घ्या.

Car Driving : पहिल्यांदाच कार खरेदी करतायं? मग ‘या’ महत्वाच्या गोष्टींची माहिती असायलाच हवी
Automatic Car Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 11:12 PM

मुंबई : कारच्या गिअर्सचे (Gears) दोन प्रकार असतात, त्यातील पहिला मॅन्युअल आणि दुसरा ऑटोमॅटिक. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन असलेल्या कारमध्ये क्लच नसतो तुम्ही यासाठी मोपेड म्हणजेच विना गिअरच्या स्कूटरचे उदाहरण घेउ शकतात. यामध्ये तुम्ही फक्त एक्सलेटर आणि ब्रेकच्या आधारे वाहन चालवता. ॲक्टिव्हा या दुचाकीच्या जास्त खपामागे हे एक मोठे कारण आहे. कारमधील ऑटोमॅटिक ट्रान्समिशन (Automatic transmission) तुम्हाला आरामदायी ड्रायव्हिंगचा अनुभव देते. विशेषतः शहरातील रस्त्यांवर जिथे मोठी रहदारी असते, तेथे ऑटामॅटिक गिरअची कार चालवणे सोपे जाते. ऑटोमॅटिक कारमध्ये ड्युअल पेडल टेक्नॉलॉजी उपलब्ध असून, त्यातील एक एक्सलेटर आणि दुसरा ब्रेक आहे. अशा वाहनांमध्ये, कारचे ABC (Accelerator, brake and clutch) फक्त A आणि B पर्यंत मर्यादित असतात. स्वयंचलित ट्रांसमिशनचे अनेक प्रकार देखील आहेत. स्वयंचलित ट्रांसमिशनमध्ये AMT, CVT, DCT, टॉर्क कन्व्हर्टर आणि इतर पर्याय मिळतात. AMT आणि CVT हे भारतातील दोन लोकप्रिय ट्रान्समिशन आहेत. या दोघांमध्ये कोणता ट्रान्समिशन चांगला पर्याय आहे याची माहिती घेणार आहोत.

AMT (ऑटोमॅटीक मॅन्युअल ट्रांसमिशन)

हे सर्वात स्वस्त आणि फ्यूल अफिशिएंट ऑटोमॅटीक ट्रांसमिशन आहे. सध्या तुम्हाला यापेक्षा स्वस्त ऑटोमॅटिक ट्रांसमिशन भारतात मिळणे कठीण आहे. स्वस्त असल्याने कारची किंमतही कमी आहे. AMT मधील क्लच आणि गिअर शिफ्ट एकतर हायड्रॉलिक ॲक्च्युएटर किंवा सेमी-इलेक्ट्रॉनिकसह येतात. दरम्यान, त्याच्या फायद्यांसह, काही तोटे देखील आहेत. हा पर्याय पहिल्यांदा कार घेणारे किंवा नवीन ड्रायव्हींग करणार्यांसाठी सोयीचा ठरतो. मारुती सुझुकी, टाटा, रेनॉल्टच्या वाहनांमध्ये ही टेक्नॉलॉजी दिसून येते.

CVT (कंटीन्यूअस व्हेरिएबल ट्रांसमिशन)

AMT प्रमाणे, CVT देखील एक लोकप्रिय ऑटोमॅटीक ट्रांसमिशन आहे. या तंत्रज्ञानामध्ये स्टीलच्या गिअरऐवजी पुल्ली किंवा बेल्ट वापरला जातो. कंटीन्यूअसली व्हेरिएबल ट्रांसमिशनच्या माध्यमातून तुम्हाला चांगला ड्रायव्हींग अनुभाव मिळू शकतो. या प्रकारच्या ट्रांसमिशनमध्ये, तुम्हाला इंजिनच्या गतीनुसार सतत गिअर शिफ्टींग मिळते. होंडा सिटी आणि होंडा जाझमध्ये हे ट्रान्समिशन वापरले जाते. ऑटोमॅटिक गाड्यांबद्दल बोलायचे झाले तर, AMT वाहनांना मेंटेन करणे अधिक सोपे असते. CVT कारच्या तुलनेत AMT सह येणाऱ्या कार स्वस्त देखील असतात.

इतर बातम्या :

Samsung : दीड लाखांचा साउंडबार मोफत मिळवा, सॅमसंगकडून बंपर धकामा ऑफर

Redmi : रेडमी 10 पॉवर भारतात लाँच, किमतीसह ‘ही’ आहेत खास स्पेसिफिकेशन्स

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.