AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bank Account | बॅंक खातेधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या खात्यातील पैशांचे काय होते ?

तुम्ही बॅंकेत खाते उघडायला जाता तेव्हा तुम्हाला तुमच्यानंतर वारसदार म्हणून कुटुंबातील सदस्याचे नॉमिनी म्हणून नाव नोंदवावे लागते. तुमच्या पश्चात त्याला या खात्यातील पैसे मिळतात.

Bank Account | बॅंक खातेधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या खात्यातील पैशांचे काय होते ?
bank accountImage Credit source: socialmedia
| Updated on: Sep 21, 2023 | 5:37 PM
Share

नवी दिल्ली | 21 सप्टेंबर 2023 : वर्तमान काळात सर्व सुरळीत सुरु असल्याने प्रत्येकजण भविष्यात येणाऱ्या समस्यांचा विचार करीत नाही. परंतू आपल्या भविष्याचा विचार करुन वर्तमानात देखील तरदूत करणे गरजेचे असते आणि सर्व व्यवहार चोख राखणे गरजेचे असते. तुम्ही कधी विचार केला आहे की तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या पैशांचे काय होणार ? ते पैसे योग्य व्यक्तीच्या हाती पडावेत याची तरतूद करणे आणि  याशिवाय देखील अनेक प्रश्न असे आहेत ज्यांचे उत्तर तुम्हाला माहीती असणे गरजेचे आहे.

तुम्ही बॅंकेत खाते उघडायला जाता तेव्हा तुम्हाला तुमच्यानंतर वारसदार म्हणून कुटुंबातील सदस्याचे नॉमिनी म्हणून नाव नोंदवावे लागते. तुमचे पैशांचा वापर तुमच्यानंतर कोणाला करता यावा याची तरदूत तुम्ही हयात असतानाच करायला हवी. त्यामुळे सर्वात आधी तुम्हाला हे माहिती असायला हवे की तुम्ही बॅंकेचे खाते उघडताना कोणाला नॉमिनी केले आहे की नाही. मृत्यूनंतर तुमच्या कुटुंबियांना तुमची सेव्हींग तेव्हाच मिळत जेव्हा तुम्ही तुमच्या वारसदाराचे नाव म्हणून नॉमिनी म्हणून दिले असेल.चला यासंदर्भात तुमच्या मनातील उत्तरे पाहूयात..

मृत्यूनंतर तुमच्या पैशांचे काय होणार ?

जेव्हा एखाद्या खातेधारकाचा मृत्यू होतो. तेव्हा बॅंका सर्व चौकशी करुन त्या खात्यातील पैसे खातेधारकाने नॉमीनी नोंदवलेल्या व्यक्तीच्या नावे ट्रान्सफर करीत असते.

नॉमिनी कोण असतो ?

नॉमिनी अशी व्यक्ती असते, ज्यांना खातेधारकांच्या मृत्यूनंतर खात्यातील एफडी बॅलन्सवर दावा करण्यासाठी नामित केलेले असते. बॅंक खाते किंवा एफडी खोलताना तुम्हाला एक नॉमिनी व्यक्तीचे नाव विचारले जाते. त्या व्यक्तीला खातेधारकाचे वारसदार म्हटले जाते.

नॉमिनीबद्दल कशी माहीती द्यावी ?

बॅंकेत खाते उघडताना फॉर्म भरताना तुम्हाला नॉमिनी व्यक्तीचे नाव आणि माहीती विचारली जाते. अर्जात त्या रकान्यात माहिती भरावी लागते. आपण आपल्या वारस असलेल्या व्यक्तीचे नाव त्यात भरावे. ज्यास तुमच्या पश्चात तुमचे पैसे त्यास मिळावेत अशी तुमची इच्छा आहे. मग ती तुमच्या कुटुंबातील सदस्य, जीवनसाथी, मुले, भाऊ आणि बहिण, मित्र वा कोणताही नातेवाईक असू शकतो.

जॉईंट अकाऊंट आणि नॉमिनी व्यक्ती

जॉईंट खाते असल्यास नॉमिनी व्यक्ती निवडण्यासाठी सर्व खातेधारकाच्या सहमतीची गरज असते. अशावेळी जॉईंट खात्यात नॉमिनी व्यक्तीला जोडण्यासाठी किंवा हटविण्यासाठी सर्व खातेधारकांची सहमती आवश्यकता असते. तसेच कधीही नॉमिनी बदल्याची तरतूद असते. त्यासाठी कोणतेही बंधन असते. तुम्ही बॅंकेत जाऊन किंवा ऑनलाईन देखील नॉमिनी बदलू शकता.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.