Bank Holiday : ऑगस्ट महिन्यात सुट्यांचा पाऊस! इतक्या दिवस बँका बंद
Bank Holiday : आता सणासुदीचा काळ सुरु होत आहे. त्यामुळे सुट्यांसोबत आनंदाचा काळ आहे. पुढील महिन्यात सुट्यांचा पाऊस पडणार आहे. इतक्या दिवस बँका बंद राहतील. त्यामुळे अगोदरच तुम्ही बँकेची काम पूर्ण करा.
नवी दिल्ली | 27 जुलै 2023 : बँक सर्वांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा भाग आहे. खात्यातून रक्कम काढण्यापासून ते पैसे जमा करण्यापर्यंत सर्वच कामे बँकेत करावी लागतात. आता दोन हजारांच्या गुलाबी नोटा बदलण्यासाठी पण बँकेतच जावे लागते. सणासुदीचा काळ सुरु होत आहे. सुट्यांसोबत आनंदाचा काळ आहे. ऑगस्ट महिन्यात बँकेशी संबंधित काही महत्वपूर्ण काम असेल तर सुट्यांचा अंदाज घेत, ते लवकरात लवकर पूर्ण करा. पुढील महिन्यात 15 ऑगस्ट, स्वातंत्र्य दिन पण आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने ग्राहकांच्या सोयीसाठी वार्षिक सुट्यांची यादी (Bank Holidays in August 2023) जाहीर केली आहे. ऑगस्ट महिन्यात सुट्यांची दखल घेत काम उरकून घ्या.
सुट्याच सुट्या चोहीकडे
ऑगस्ट महिन्यात बँका एकूण 14 दिवस बंद राहतील. पुढील महिन्यात सुट्यांचा पाऊस पडणार आहे. केवळ इतक्या दिवसच बँका सुरु राहतील. 15 ऑगस्ट, स्वातंत्र्य दिनामुळे संपूर्ण देशभर या दिवशी बँका बंद असतील. याशिवाय, रक्षा बंधन, ओणम आणि इतर सणांमुळे देशातील अनेक भागातील बँकांना सुट्या असतील. त्यामुळे बँकेचे काम लवकरात लवकर पूर्ण करुन घ्या.
या दिवशी राहतील बँका बंद
- 6 ऑगस्ट 2023- या दिवशी रविवार असल्याने बँकेचे शटर डाऊन असेल
- 8 ऑगस्ट 2023- गंगटोक मध्ये तेन्दोंग ल्हो रम फातमुळे बँका बंद राहतील
- 12 ऑगस्ट 2023- दुसरा शनिवार असल्याने बँकांचे कामकाज बंद
- 13 ऑगस्ट 2023- रविवारमुळे बँकांचे शटर डाऊन
- 15 ऑगस्ट 2023- स्वातंत्र्य दिनामुळे देशभरातील बँका राहतील बंद
- 16 ऑगस्ट 2023- पारशी नववर्षामुळे मुंबई, नागपुर आणि बेलापूरमधील बँका बंद
- 18 ऑगस्ट 2023- श्रीमंत शंकरदेव तिथीमुळे गोवाहाटीत बँक बंद
- 20 ऑगस्ट 2023- रविवारी बँकांचे शटर डाऊन असेल
- 26 ऑगस्ट 2023- चौथ्या शनिवारमुळे बँका असतील बंद
- 27 ऑगस्ट 2023- रविवारमुळे देशभरातील बँकांना टाळे
- 28 ऑगस्ट 2023- ओणम सणामुळे कोच्ची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँका बंद राहतील
- 29 ऑगस्ट 2023- तिरुओणममुळे कोच्ची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँकाना सुट्टी
- 30 ऑगस्ट- रक्षा बंधन असल्याने जयपूर आणि शिमलातील बँकांना टाळे
- 31 ऑगस्ट 2023- रक्षा बंधन/श्री नारायण गुरु जयंती/पंग-लहबसोल यामुळे देहरादून, गंगटोक, कानपूर, कोच्ची, लखनऊ आणि तिरुवनंतपुरममधील बँका बंद असतील.
व्यवहार करता येणार
बँकेला सुट्टी असली की शटर डाऊन असते, अर्थात बँकिंगचे काम पूर्णपणे थांबत नाही. ऑनलाइन बँकिंग सेवा पूर्वीप्रमाणेच चालू राहील आणि आपण सुट्टीच्या दिवशी ही आपले काम हाताळू शकता. पण ग्राहकांना बॅंकेच्या शाखेत जाऊन त्यांचे पैसे जमा करता येणार नाहीत किंवा शाखेतून पैसे काढता येणार नाहीत. परंतु एटीएममध्ये अशा सेवा उपलब्ध राहतील. ऑनलाईन बँकिंग सेवा, एटीएम आणि मोबाइल बँकिंग सुरू राहील. काही शहरांमध्ये विशिष्ट दिवशी सर्व बँका एकाच वेळी बंद राहतील. तर क्रेडिट, डेबिट कार्ड आणि युपीआयचा वापर करुन ऑनलाईन पेमेंट करता येईल.