नवी दिल्ली | 29 ऑक्टोबर 2023 : नोव्हेंबर महिन्यात सणासुदीची धूम असेल. या महिन्यात सुट्यांचा सुकाळ आहे. सुट्यांच्या यादीवर नजर टाकली तर लक्षात येते की अनेक दिवस बँकांना ताळे असेल. सणासुदीत घर, कार अथवा इतर काही कर्ज प्रकरणांची फाईल पुढे सरकवायची असेल अथवा इतर काही ऑफलाईन कामे करायची असतील तर सुट्यांची ही यादी जरुर नजरेखालून घाला. नाहीतर कामाच्या गडबडीत सुट्टीच्या दिवशी बँकेकडे नाहक चक्कर होईल. काम पण होणार नाही. अर्थात संपूर्ण देशात एकाच दिवशी सर्व बँकांना सुट्टीचे प्रमाण तसे कमीच आहे. ठराविक दिवशीच संपूर्ण देशात बँकांना एकाच दिवशी ताळे असतात.
अशा जाहीर होतात सुट्या
भारतीय रिझर्व्ह बँक तीन श्रेणीत सुट्यांची यादी जाहीर करते. परक्राम्य संलेख अधिनियम (negotiable instrument act), तात्काळ पैसे पाठविणे (real time gross settlement) आणि बँक खाते व्यवहाराचा लेखाजोखा मांडण्यासाठी (Bank closing Account) याअंतर्गत बँकेच्या सुट्या असतात. तर राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर बँकांना सुट्टी जाहीर होते. या सुट्या शनिवारी आणि रविवार व्यतिरिक्त दिल्या जातात. दसरा, दिवाळी आणि इतर सणाच्या दिवशी देशभरातील बँकांना सुट्टी असते.
ऑनलाईन बँकिंग दिमतीला
सुट्टीच्या दिवशी ग्राहकांना बॅंकेच्या शाखेत जाऊन त्यांचे पैसे जमा करता येणार नाहीत किंवा शाखेतून पैसे काढता येणार नाहीत. परंतु एटीएममध्ये अशा सेवा उपलब्ध राहतील. ऑनलाईन बँकिंग सेवा, एटीएम आणि मोबाइल बँकिंगच्या माध्यमातून व्यवहार करता येईल. क्रेडिट, डेबिट कार्ड आणि युपीआयचा वापर करुन ऑनलाईन पेमेंट करता येईल.