Bank Holidays | सुट्यांची मांदियाळी, सणासुदीत बँका राहतील इतक्या दिवस बंद
Bank Holidays | ऑक्टोबर महिन्यात सणांची रेलचेल आहे. तेव्हा तुमची कामे लवकर उरकून घ्या..या दिवशी बँकेला सुट्टी असेल.
नवी दिल्ली : सप्टेंबर महिना (September) संपायला आता अवघे काही दिवस उरले आहेत. पुढील महिना हा सणांचा आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिन्यात (October) अनेक दिवस बँका बंद (Bank Holiday) राहतील. ऑक्टोबर महिन्यात एकूण 21 दिवस बँकांचे कामकाज प्रभावित राहील.
पण संपूर्ण भारतात एकाच दिवशी सगळ्याच बँका बंद राहतील असे नाही. काही भागात सुट्टी असली तरी इतर राज्यात मात्र त्यादिवशी कामकाज सुरु राहिल. त्यामळे बँकेसंबंधी काही कामकाज असेल तर त्वरीत उरकून घ्या.
RBI द्वारे बँकांना सुट्टी जाहीर करण्यात येते. पण सर्वच राज्यातील बँकांना एकाच दिवशी सुट्या नसतात. काही राज्यातच बँका बंद असतात. पण मोठ्या सणाला, राष्ट्रीय सणाला मात्र सर्वच बँकांना सुट्टी असते.
पुढील महिन्यात 3, 4, 5, 6, 7, 8, 13, 14, 18, 24, 25 ,26, 27 आणि 31 ऑक्टोबर रोजी निगोशिएबल इन्स्ट्रमेंट अॅक्टतंर्गत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. या दिवशी बँका बंद राहितील. त्यामुळे ग्राहकांना वेळतच बँकेसंबंधीची कामे उरकून घेणे महत्वाचे आहे.
Bank Holidays in October: ऑक्टोबर 2022 मधील सुट्यांची यादी
1 ऑक्टोबर – बँकांमध्ये खाते परीक्षण, हाफ इयरली क्लोजिंग सुट्टी 2 ऑक्टोबर – गांधी जयंती, रविवार (साप्ताहिक सुट्टी) 3 ऑक्टोबर- दुर्गा पूजा (महाअष्टमी) 4 ऑक्टोबर- दुर्गा पूजा (महानवमी)/आयुध पूजा/श्रीमंत शंकरदेव जन्मोत्सव 5 ऑक्टोबर- दसरा (विजय दशमी)/श्रीमंत शंकरदेव जन्मोत्सव 6 ऑक्टोबर- दुर्गा पूजा 7 ऑक्टोबर- दुर्गा पूजा 8 ऑक्टोबर- मिलाद-ए-शरीफ/ईद-ए-मिलाद-उल-नबी (दुसरा शनिवार-सुट्टी) 9 ऑक्टोबर- रविवार (साप्ताहिक सु्ट्टी) 13 ऑक्टोबर- करवा चौथ 14 ऑक्टोबर- ईद-ए-मिलाद-उल-नबी नंतरचा शुक्रवार 16 ऑक्टोबर- रविवार (साप्ताहिक सु्ट्टी) 18 ऑक्टोबर- काति बिहू 22 ऑक्टोबर- चौथा शनिवार (सुट्टी) 23 ऑक्टोबर- रविवार (साप्ताहिक सुट्टी) 24 ऑक्टोबर- काली पूजा/दीपावली/दीवाळी (लक्ष्मी पूजा)/नरक चतुर्दशी 25 ऑक्टोबर- लक्ष्मी पूजा/दीपावली/गोवर्धन पूजा 26 ऑक्टोबर- गोवर्धन पूजा/विक्रम संवत नववर्ष दिवस/ बळी प्रतिपदा 27 ऑक्टोबर- भाईदूज/चित्रगुप्त जयंती/लक्ष्मी पूजा/दीपावली 30 ऑक्टोबर- रविवार (साप्ताहिक सुट्टी) 31 ऑक्टोबर- सरदार वल्लभभाई पटेल जन्मदिन