जर तुम्ही देखील कार (car) खरेदी करण्याचा प्लॅन बनवत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. बँक ऑफ बडोदाने (Bank of Baroda) कार लोनच्या (Car loan) व्याज दरात कपात केली आहे. बँक ऑफ बडोदाकडून कार लोनच्या व्याज दरात 0.25 टक्क्यांची कपात करण्यात आली आहे. नव्या व्याज दरानुसार आता बँकेकडून ग्राहकांना कार खरेदी करण्यासाठी वार्षिक आधारावर 7.25 टक्के व्याज दराने कर्ज उपवब्ध करून दिले जात आहे. बँकेच्या वतीने सोमवारी याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली. बँकेकडून केवळ व्याज दरच कमी करण्यात आलेला नाही तर प्रोसेसिंग फीमध्ये देखील कपात करण्यात आली आहे. बँकेच्या वतीने 30 जून 2022 पर्यंत प्रोसिंग चार्ज म्हणून केवळ 1500 रुपयेच आकारण्यात येणार आहेत. याबाबत बोलताना बँकेच्या वतीने सांगण्यात आले की, जे ग्राहक नवी कार खरेदी करणार आहेत, त्यांनाच बँकेच्या या योजनेचा फायदा होणार आहे. ग्राहकांचा क्रेडिट स्कोर पाहून कर्ज देण्यासंबंधिचा निर्णय घेतला जाईल.
याबाबत बोलताना बँकेचे महाप्रबंधक (गहाण आणि इतर किरकोळ मालमत्ता) यांनी सांगितले की आमच्या ग्राहकांचे कार खरेदीचे स्वप्न पूर्ण व्हावे, त्यांना कार लोन स्वस्त मिळावे या हेतून बँकेने कार लोनच्या दरात 0.25 टक्क्यांची कपात केली आहे. तसेच 30 जून 2022 पर्यंत प्रोसेसिंग चार्ज म्हणून केवळ 1500 रुपयेच आकारण्यात येणार आहेत. यामुळे ग्राहक आपल्या आवडीची कार खरेदी करू शकतील. सध्या बँकेच्या वतीने ग्राहकांना 7.25 टक्के व्याज दराने कर्ज उपवब्ध करून दिले जात आहे. जास्तीत जास्त ग्राहकांनी बँक ऑफ बडोदाच्या या स्कीमचा फायदा घ्यावा.
बँक ऑफ बडोदाकडून केवळ कार लोनच्याच नाही तर गृह कर्जाच्या दरात देखील कपात करण्यात आली आहे. बँकेने गृह कर्जाच्या दरामध्ये देखील 0.25 टक्क्यांची कपात केली आहे. मात्र हे व्याज दर मर्यादीत कालावधीसाठी असणार आहेत. बँक ऑफ बडोदाचा गृह कर्जाचा व्याज दर 6.75 टक्के आहे. मात्र सध्या बँकेकडून गृह कर्जात 0.25 टक्क्यांची कपात करण्यात आल्याने ग्राहकांना वारर्षिक आधारावर 6.50 टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येत आहे. गृह कर्जावरील ही कपात 30 जून 2022 पर्यंत राहणार असल्याची माहिती बँकेच्या वतीने देण्यात आली आहे.