Home Renovation Loan : जुन्या घराला नाविन्याचा साज, झटपट मिळवा कर्ज, कर सवलत चालून येणार

Home Renovation Loan : जुने घराची डागडुजीच नाही तर घर नवीन पद्धतीने बदलण्याचे अनेकांचे स्वप्न असते. जमान्यासोबत चालण्याचे अनेकांचे स्वप्न असते. त्यासाठी कर्ज तर मिळतेच पण कर सवलतीचा पण फायदा मिळतो.

Home Renovation Loan : जुन्या घराला नाविन्याचा साज, झटपट मिळवा कर्ज, कर सवलत चालून येणार
Follow us
| Updated on: Jul 09, 2023 | 4:28 PM

नवी दिल्ली : काळानुरुप घर असावे, असे प्रत्येकाला वाटते. आजकाल इंटेरिअर डिझाईन आणि स्मार्ट लूकला महत्व आले आहे. कमी जागेत आकर्षक सजावट केलेले घर (Renovate Home) , हे अनेकांचे स्वप्न आहे. त्यासाठी अनेक बँका, वित्तीय संस्था कर्ज (Home Renovation Loan) देतात. या कर्ज सुविधेत घराच्या नुतनीकरणासह घर मालकाला इतर नाविन्यपूर्ण गोष्टींसाठी वित्त पुरवठा करण्यात येतो. तुम्हाला जुने घर नव्या पद्धतीने बदलायचे असेल अथवा त्यात मोठा बदल करायचा असेल तर बँका त्यासाठी कर्ज पुरवठा करतात. घराच्या नुतनीकरणाचा मोठा खर्च अंगावर येतो. त्यासाठी हे कर्ज अत्यंत उपयोगी पडते. या कर्जाचे तुम्हाला अनेक फायदे पण मिळतात.

घराला नाविन्याचा साज घर नवीन करण्यासाठी, त्यात बदल करण्यासाठी बँका, बिगर बॅकिंग कंपन्या आणि गृहनिर्माण वित्त कंपन्यांकडून हे कर्ज देण्यात येते. गृहकर्जाचा उपयोग अनेक प्रकारच्या घरात बदल करण्यासाठी करण्यात येतो. त्यासाठी बँका कर्जाची रक्कम पुरवितात. तुम्ही स्वयंपाक घर अथवा बाथरुममधील बदल, नवीन खोली बांधणे, पाईपलाईन, ड्रेनेज लाईन दुरुस्ती, इलेक्ट्रिक आणि ऊर्जा बचतीची अनेक कामे यामाध्यमातून होतात.

किती मिळेल कर्ज जर तुम्हाला घराचे नुतनीकरण करायचे असेल तर 5 लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन घेऊ शकता. तर घराच्या नुतनीकरणासाठी बँका 25 लाख रुपयांपर्यंत कर्ज देतात. त्यातून तुम्ही घराचे नुतनीकरण करु शकता. तुम्हाला किती कर्ज हवे आहे, हे ग्राहकाला ठरवावे लागते. तुमच्या कागदपत्रांआधारे आणि मागणीनुसार बँका कर्ज देतात.

हे सुद्धा वाचा

किती द्यावे लागेल व्याज होम नुतनीकरणासाठी कर्ज घेत असाल तर ते बँकांच्या गृहकर्जापेक्षा अधिक महाग मिळेल. त्याचा व्याजदर जास्त असेल. फ्लोटिंग व्याज दराच्या आधारे गृहकर्ज देण्यात येते. गृहकर्जावरील व्याजाचे दर क्रेडिट स्कोअर, कर्जाची रक्कम, कर्जदाराचे आर्थिक प्रोफाईल आणि इतर गोष्टींचा अभ्यास करुन ठरविण्यात येते. वैयक्तिक कर्जाच्या तुलनेत घराच्या नुतनीकरणासाठी घेतलेल्या कर्जाचे व्याजदर कमी असतात. हा व्याजदर 8 ते 12 टक्के इतका असतो. हे कर्ज चुकविण्यासाठी 20 वर्षांचा कालावधी देण्यात येतो.

कोणती कागदपत्रे आवश्यक भारतात घराच्या नुतनीकरणासाठी ओळखपत्र, पत्ता, महसूल आणि उत्पन्नाचे स्त्रोत याची माहिती देणे आवश्यक आहे. संपत्तीच्या मालकी हक्क, डागडुजी, नुतनीकरणाचा प्लॅन, अंदाजे खर्चाचे प्रमाण आणि बँकेने सांगितलेली कागदपत्रे द्यावे लागतात.

कर सवलत तुम्ही हे कर्ज घेत असाल तर कर्जदार व्यक्ती कलम 24 (बी) अंतर्गत कर सवलतीस पात्र आहे. वार्षिक 30 हजार रुपयांपर्यंत कर सवलतीला तो पात्र आहे. 2 लाख रुपयांपर्यंतच्या व्याजावर कर सवलत मिळते.

दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?.
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?
'साईबाबा जर मुस्लिम होते तर...', रामगिरी महाराज नेमकं काय म्हणाले?.
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले
उद्धव ठाकरे गटाच्या उपशहरप्रमुखाचं बोट छाटल; प्रतापराव चिखलीकर म्हणाले.