Pan Aadhaar Link : बँक करणार खाते बंद! का नाही केले पॅन-आधार लिंक

Pan Aadhaar Link : पॅनकार्ड आणि आधार कार्ड जोडणीचे आकडे उत्साहवर्धक आहेत. पण तरीही देशातील अनेक लोकांनी अद्याप जोडणी केली नाही. त्यांच्याकडे आता अवघे काही दिवस उरले आहेत..

Pan Aadhaar Link : बँक करणार खाते बंद! का नाही केले पॅन-आधार लिंक
Follow us
| Updated on: Jun 09, 2023 | 4:32 PM

नवी दिल्ली : पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडणीची (Pan-Aadhaar Linking) अंतिम मुदत आता अगदी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. गेल्यावर्षीपासून ही जोडणी सशुल्क करण्यात आली आहे. तुमचा आर्थिक लेखाजोखा विस्तृत स्वरुपात समोर येण्यासाठी ही कवायत करण्यात येत आहे. मध्यंतरी अनेकदा यासाठी मुदतवाढ देण्यात आली. यावर्षी मार्च महिन्यात खासदारांच्या आग्रहास्तव पुन्हा अंतिम मुदत वाढविण्यात आली. पण आता केंद्र सरकार मुदत वाढ करण्याच्या विचारात नाही.पॅनकार्ड आणि आधार कार्ड जोडणीचे आकडे उत्साहवर्धक आहेत. पण तरीही देशातील अनेक लोकांनी अद्याप जोडणी केली नाही. त्यांच्याकडे आता अवघे काही दिवस उरले आहेत.

अंतिम मुदत काय प्राप्तिकर खात्याने (Income Tax) पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी आता 30 जून 2023 ही अंतिम मुदत दिली आहे. त्यानंतर पॅनकार्ड बाद करण्यात येईल. त्यामुळे तुम्हाला बँकेचा व्यवहार, इतर व्यवहार करता येणार नाहीत. बँकिंग व्यवहारासाठी पॅनकार्ड अनिवार्य असते. सध्या पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी 1,000 रुपये दंड द्यावा लागतो. मुदत संपल्यावर नागरिकांना ही संधी देण्यात येणार नाही.

पॅन कार्ड होईल निष्क्रिय या 30 जूनपर्यंत दोन्ही कार्डची जोडणी केली नाही तर पॅन कार्ड निष्क्रिय होईल. मुदतीनंतर जोडणी केल्यास तुम्हाला 10,000 रुपये दंड बसू शकतो. आयकर अधिनियमाच्या कलम 272बी अंतर्गत 10,000 रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. सध्या एक हजार रुपयांचा दंड भरुन ही प्रक्रिया पूर्ण करता येईल. अजूनही ज्यांनी या दोन्ही कार्डची जोडणी केली नाही, त्यांना एक हजार रुपये भरुन ऑनलाईन पद्धतीने प्रक्रिया पूर्ण करता येईल.

हे सुद्धा वाचा

जबरदस्त प्रतिसाद केंद्र सरकारने यापूर्वी नागरिकांना अनेकदा संधी दिली. त्यानंतर गेल्या वर्षीपासून केंद्र सरकारने दोन्ही कार्ड जोडणीसाठी 500 रुपये शुल्क आकारले. तर जुलै महिन्यानंतर हे शुल्क एक हजार रुपये करण्यात आले. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार, 51 कोटींहून अधिक नागरिकांनी पॅनकार्ड-आधारकार्डची जोडणी केली आहे.

आधार पॅन कार्ड लिंक केले नसेल तर ?

  1. आयकर विभागाच्या ई-फायलिंग या अधिकृत पोर्टलवर तुम्हाला जावे लागेल
  2. याठिकाणी तुमची नोंदणी नसली तरी ई-फायलिंगसाठी तुम्ही पात्र असाल
  3. येथे तुम्हाला लिंकिंग करता येऊ शकते
  4. या पोर्टलच्या होमपेजवर त्यासाठीची लिंक दिलेली आहे
  5. या लिंकिंगसाठीचे विलंब शुल्क (1000रुपये) NSDL च्या वेबसाईटवर जाऊन भरावे लागेल
  6. विलंब शुल्क भरल्यावर आयकर विभागाच्या ई फायलिंग पोर्टलवर पुढील प्रक्रिया होईल
  7. विलंब शुल्क भरल्याची नोंद त्याठिकाणी रिफ्लेक्ट होण्याला काही अवधी लागू शकतो
  8. त्यासाठी नागरिकांना किमान चार दिवस थांबावे लागेल
  9. आधार आणि पॅनकार्डावरील तुमचे व्यक्तिगत नाव, जन्मतारीख, पत्ता मोबाईल क्रमांक आदी तपशील द्यावे लागतील
  10. हे तपशील परस्परांशी जुळत नसले, तर हे लिंकिंग होणार नाही

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....