सावधान ! घरावर टॉवर लावण्याचा विचारत करत आहात? तर ‘ही’ माहिती जाणून घ्या, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान

जर तुम्ही देखील तुमच्या घरावर किंवा मोकळ्या जागेवर मोबाईल टॉवर (Mobile Tower) लावण्याचा विचार करत असाल तर वेळीच सावध व्हा. सध्या सोशल मीडियावर एक जाहिरात प्रचंड व्हायरल होत आहे. घरावर मोबाईल टॉवर बसवण्यासाठी दूरसंचार विभागाकडून (DoT) नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट (NOC) देण्यात येत असल्यासंदर्भातील ही जाहिरात आहे.

सावधान ! घरावर टॉवर लावण्याचा विचारत करत आहात? तर 'ही' माहिती जाणून घ्या, अन्यथा होऊ शकते मोठे नुकसान
Follow us
| Updated on: Feb 28, 2022 | 5:40 AM

नवी दिल्ली : जर तुम्ही देखील तुमच्या घरावर किंवा मोकळ्या जागेवर मोबाईल टॉवर (Mobile Tower) लावण्याचा विचार करत असाल तर वेळीच सावध व्हा. सध्या सोशल मीडियावर एक जाहिरात प्रचंड व्हायरल होत आहे. घरावर मोबाईल टॉवर बसवण्यासाठी दूरसंचार विभागाकडून (DoT) नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट (NOC) देण्यात येत असल्यासंदर्भातील ही जाहिरात आहे. मात्र ही जाहिरात फेक असल्याचे ‘पीआयबी’च्या फॅक्ट चेकमधून समोर आले आहे. दूरसंचार विभागाकडून अशाप्रकारचे कोणतेही प्रमाणपत्र देण्यात येत नसल्याचे पीआयबीने म्हटले आहे. त्यामुळे तुम्ही जर ही जाहिरात पाहून प्रमाणपत्रासाठी पैसे देणार असाल तर सावध व्हा. अन्यथा मोठे नुकसान हेऊ शकते. तुम्हाला मोठा आर्थिक फटका बसू शकतो. डीओटी अशाप्रकारचे कोणतेच प्रमाणपत्र देत नसल्याचे समोर आले आहे.

फसवणूक कशी होते?

मोबाईल टॉवरसंदर्भात सरकारच्या वतीने देखील जनजागृती करण्यात येत आहे. मोबाईल टॉवर बसवण्याच्या नावाखाली लुटणाऱ्या अनेक टोळ्या सध्या सक्रिय झाल्या आहेत. सुरुवातीला बनावट कंपनी स्थापन केली जाते. नंतर तुम्हाला मोबाईल टॉवर बसवल्यास आकर्षक कमाईचे स्वप्न दाखवले जाते. तुम्ही तुमच्या घरावर मोबाईल टॉवर बसवण्यास तयार झाल्यानंतर सरकारी टॅक्स, सुरक्षा डिपॉझिट, स्टॅंप ड्यूटी असे विविध कारणे सांगून तुमच्याकडून हजारो रुपये उकळले जातात. हे पैसे ते त्यांच्या कंपनीच्या खात्यात जमा करून घेतात. एकदा पैसे खात्यात जमा झाले की, ते तुमच्याशी कायमचाच संपर्क तोडून टाकतात. अशाप्रकारो तुम्हाला लाखो रुपयांचा फटका बसू शकतो. त्यामुळे अशाप्रकारे कोणताही व्यवहार करण्यापूर्वी काळजी घ्यावी असे आवाहन सरकारच्या वतीने करण्यात आले आहे.

दूरसंचार विभाग काय म्हणतो?

याबाबत बलतोना दूरसंचार विभागाकडून देखील एक निवेदन सादर करण्यात आले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, अशा प्रकारे टॉवर बसवण्यासाठी दूरसंचार विभागाकडून कोणत्याही प्रकारचे प्रमाणपत्र देण्यात येत नाही. तसेच मोबाईल टॉवर बसवण्यासाठी कोणतीही रक्कम आकारण्यात येत नाही. त्यामुळे अशा प्रकाचा कोणताही व्यवहार करण्यापूर्वी नागरिकांनी काळजी घ्यावी. तसेच काही शंकास्पद वाटल्यास पोलिसांशी संपर्क साधावा.

संबंधित बातम्या

Financial Tips : पहिल्या नोकरीतील ‘या’ चुका टाळा आणि व्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम

मालमत्तेवर कर्ज घ्यायचे आहे? जाणून घ्या नियम, अटी व व्याजदर…

कच्च्या तेलाचा भडका, भारत आपला राखीव तेलसाठा वापरणार?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.