सावधान! स्टार्ट अप कंपन्यांत गुंतवणूक करताय ? मग त्यापूर्वी हे वाचाच

लाखो गुंतवणूकदारांना स्टार्टअप्स कंपन्यांत गुंतवणूक करून फसगत झाल्यासारखं वाटतंय. चमकणारे तारे अचानक जमिनीवर का आले? हे कोडे अद्यापपर्यंत गुंतवणूकदारांना उलगडले नाही. झोमॅटो, नायका, पेटीएम, पॉलिसीबाजार यांच्यासारख्या अनेक स्टार्टअप शेअर्सची एकसारखी परिस्थिती आहे

सावधान! स्टार्ट अप कंपन्यांत गुंतवणूक करताय ? मग त्यापूर्वी हे वाचाच
Follow us
| Updated on: Feb 24, 2022 | 5:30 AM

मुंबई : पुण्यात राहणारा आनंद गोंधळलाय. त्यानं आयपीओ (IPO) मध्ये झोमॅटोचे (Zomato) शेअर घेतले होते. 53 प्रीमियमवर शेअर्सची (Shares)चांगली लिस्टिंगही झाली होती. मात्र, आनंदनं त्यावेळी झोमॅटोचे शेअर्स न विकण्याचा निर्णय घेतला. 76 रुपये इश्यु किंमतीचा झोमॅटोचा शेअर्स 169 रुपयांपर्यंत पोहचला होता. त्यानंतर बाजारातील पडझडीमुळे इश्यू किंमतीच्या खालीही गेला होता. सध्या झोमॅटोच्या शेअर्सची किंमत 86 रुपयांच्या जवळपास आहे. आनंदसारख्या लाखो गुंतवणूकदारांना स्टार्टअप्स कंपन्यांत गुंतवणूक करून फसगत झाल्यासारखं वाटतंय. चमकणारे तारे अचानक जमिनीवर का आले? हे कोडे अद्यापपर्यंत गुंतवणूकदारांना उलगडले नाही. झोमॅटो, नायका, पेटीएम, पॉलिसीबाजार यांच्यासारख्या अनेक स्टार्टअप शेअर्सची एकसारखी परिस्थिती आहे. गुंतवणुकदारांची 20 ते 62 टक्के गुंतवणूक बुडालीय. या कंपनीच्या मूल्यांकनावरूनही अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

तज्ज्ञांचे मत काय?

कॅश बर्निंगच्या फॉर्म्युल्यावर टिकून असलेल्या या कंपन्याच्या बिझनेस मॉडेलमध्ये सध्या नफ्याची शक्यता बिलकूल नाही. के.आर. चोकशी शेअर्स आणि सिक्युरिटीजचे एमडी देवेन चोकशी यांनीही याबाबत चिंता व्यक्त केलीये. याबाबत बोलताना त्यांनी म्हटले आहे की, या कंपन्या नफ्यासाठी अजूनही जंग जंग पछाडत आहेत. त्यातच मूल्यांकन जास्त असल्यानं कंपन्या या निकषांवर पूर्णपणे खऱ्या उतरल्या नाहीत. तंत्रज्ञानावर आधारित या कंपन्या खऱ्या जगापासून दूर होत्या. कंपन्या मैदानात उतरल्यानंतर बाजारातील तेजी-मंदीमुळे या कंपन्यांना मोठा फटका बसला आहे. त्यातच रशिया आणि युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे या कंपन्या घाबरल्या आहेत. तसेच अमेरिकेच्या फेडरल रिझर्व बँकेनं व्याज दर वाढवण्याचा इशारा दिल्यानं सर्वच पर्याय सध्या बंद आहेत. त्यामुळे अशा कंपन्यांत गुंतवणूक करण्यामध्ये सध्या तरी रिस्क असल्याचे चोकशी यांनी म्हटले आहे.

कंपन्यांच्या नफ्यात घट

डिसेंबर 2021 मध्ये पेटीएमची कमाई गेल्यावर्षीपेक्षा 89 टक्क्यानं वाढून, 1,456 कोटी रुपयांपर्यंत पोहचलीये. मात्र, कमाईप्रमाणं कंपनीचा तोटाही 49 टक्क्यांपर्यंत वाढलाय. पेटीएमला 778.5 कोटी रुपयांचा तोटा झालाय. डिसेंबर 2021 मध्ये नजारा या गेमिंग कंपनीचा नफा 17 टक्क्यानं कमी झालाय. केवळ 14.6 कोटी रुपये नफा झाल्यानं गुंतवणूकदार निराश आहेत. यंदाच्या आर्थिक वर्षातील तिमाहीत ‘नायका’च्या नफ्यात 59.5 टक्के घट झाली आहे. ‘कारट्रेड’ला डिसेंबर 2021 मध्ये 23.4 कोटी रुपयांचा तोटा झालाय. एक वर्षापूर्वी कंपनीला 18.2 कोटी रुपयांचा नफा झाला होता.

शेअर्सचे भाव वाढण्याची शक्यता धुसर

आता गुंतवणूकदारांनी काय करावं ? पुन्हा या कंपन्यांना चांगले दिवस येतील का ? सध्या तरी तज्ज्ञांना याची शक्यता दूरपर्यंत दिसत नाही. जास्तीचं मूल्यांकन आणि तोट्यामुळे या कंपन्यांचे शेअर्सचे भाव वाढण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी जोखमी घेऊ नये, असं जियोजित फायनांशियल सर्विसेसचे रिसर्च हेड विनोद नायर यांनी म्हटले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात फक्त नाव पाहून कोणत्याही स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करणे धोक्याचे ठरू शकते.

संबंधित बातम्या

‘पीएमजेजेबीवाय पॉलिसीधारकांना ‘आयपीओ’त सूट?, अध्यक्षांच्या विधानावर एलआयसीचे स्पष्टीकरण

ITI Conservative Hybrid Fund लाँच, जाणून घ्या काय आहेत ऑफर्स, 7 मार्चपर्यंत गुंतवणुकीची संधी

IRCTC खात्याशी आधार कार्ड लिंक करा, तुम्ही महिन्यातून 6 नव्हे तर रेल्वेची 12 तिकिटे बुक करू शकता, कसे ते जाणून घ्या

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.