Crorepati SIP : एक कट चहा करेल करोडपती! अवघ्या 10 रुपयांची गुंतवणूक करेल मालामाल

Crorepati SIP : एक कट चहा काय कमाल करु शकतो, असे तुम्हाला वाटत असेल तर त्याचा चमत्कार तुम्ही बचत केल्यावर लक्षात येईल. रोज केवळ 10 रुपये बचतीने तुम्ही लखपतीच नाही तर करोडपती होऊ शकता. विश्वास बसत नाही, पण हा फॉर्म्युला तुम्हाला मदत केल्याशिवाय राहणार नाही.

Crorepati SIP : एक कट चहा करेल करोडपती! अवघ्या 10 रुपयांची गुंतवणूक करेल मालामाल
एक कप चहात व्हा श्रीमंत
Follow us
| Updated on: Mar 04, 2023 | 9:30 AM

नवी दिल्ली : आता तुम्हाला अवघ्या 10 रुपयांमध्ये कोण करोडपती (Crorepati) करेल? इथं महागाने कळस गाठला आहे. लोक रांत्रदिवस काबाडकष्ट करुनही त्यांच्या हातात पैसा उरत नाही. मध्यमवर्ग तर अत्यंत हवालदिल झाला आहे. पण काही साध्या ट्रिक्सही तुम्हाला लखपतीच नाही तर करोडपती बनवू शकता. केवळ थोडा अभ्यास आणि योग्य सल्ला तुम्हाला घ्यावा लागेल. एक कट चहा (A Cup of Tea) काय कमाल करु शकतो, असे तुम्हाला वाटत असेल तर त्याचा चमत्कार तुम्ही बचत (Saving) केल्यावर लक्षात येईल. रोज केवळ 10 रुपये बचतीने तुम्ही लखपतीच नाही तर करोडपती होऊ शकता. विश्वास बसत नाही, पण हा फॉर्म्युला तुम्हाला मदत केल्याशिवाय राहणार नाही.

आता तुम्हाला वाटेल काय तरीच काय फेकताय? इथं खूप मेहनत केली. मोठी बचत केली तरच कुठे तरी थोडासा फायदा होतो. तिथं दहा रुपयांचा एक कप चहा काय जादू करेल? पण त्यासाठी इच्छाशक्ती आणि नियमीत बचतीची सवय अंगी भिनवावी लागेल. तुम्ही बाहेर दिवसाला चहावर जर 20-60 रुपये खर्च करत असाल तर केवळ दहा रुपये रोजची बचत तुम्हाला मालामाल करेल. पण त्यासाठी एक कप चहा तुम्हाला सोडावा लागेल.

तुम्हाला म्युच्युअल फंड (Mutual Fund) आणि सिस्टेमॅटिक इन्व्हेसटमेंट प्लॅनविषयी (SIP) तुम्हाला माहितीच असेल. जर तुम्ही एक कप चहा सोडला आणि रोज दहा रुपयांची एसआयपीत बचत केली, तर दीर्घकालावधीनंतर तुम्हाला जोरदार परतावा मिळाल्याशिवाय राहणार नाही. एक कप चहा साधारणपणे 10 रुपयांना मिळतो. एक कप चहा जर तुम्ही सोडला. तर दहा रुपये उरतात. आता या दहा रुपयांवर तुम्ही दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक केली तर मोठा फायदा होईल.

हे सुद्धा वाचा

एक कप चहा साधारणपणे 10 रुपयांना मिळतो. जर तुम्ही एक कप चहा सोडला आणि एसआयपीत गुंतवणूक केली तर महिन्याला 300 रुपये जमा होतील. हे दहा रुपये म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे गुंतवा. जर तुम्ही खंड न पडता 35 वर्षे एखाद्या चांगल्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक केली तर जोरदार फायदा होईल. साधारणपणे 12 टक्के परतावा मिळाल्यास तुम्ही लखपती व्हाल. 18 टक्के रिटर्न मिळाल्यास करोडपती व्हाल. तुम्हाला यावर विश्वास बसणार नाही. पण हा प्रयोग उपयोगात येऊ शकतो.

म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचा सर्वात सोपा मार्ग एसआयपी आहे. या आधारे दर महा म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता येते. एसआयपी हा बँकेच्या आवर्ती ठेव योजनेसारखा, म्हणजे आरडी सारखी आहे. पण एसआयपी तुम्हाला बँकेपेक्षा अधिक रिटर्न देतो. तुमच्या बँक खात्यातूनव दर महा निश्चित तारखेला एसआयपीद्वारे रक्कम कपात होते आणि त्यावर जोरदार परतावा मिळतो.

एसआयपीचेही प्रकार आहेत. काही लोक रोजची बचत करतात. रोज एसआयपीद्वारे त्यांच्या खात्यातून एक ठराविक रक्कम कपात होते. दररोज कमाई करणाऱ्या लोकांसाठी ही एसआयपी चांगली आहे. फंड जर चांगला आणि योग्य निवडला असेल तर रोजच्या एसआयपीतून चांगला परतावा मिळू शकतो. लार्ज कॅप फंडातील गुंतवणूक फायदेशीर ठरते. हा फंड गुंतवणुकीसाठी सुरक्षित मानण्यात येतो.

काही जण रोजच्या एसआयपीपेक्षा आठवड्याचा एक दिवस एसआयपीसाठी निश्चित करतो. त्यादिवशी एसआयपीचा हप्ता तुमच्या बँक खात्यातून वळता होतो. ही अल्पबचत तुम्हाला भविष्यात लखपती नाही तर करोडपती नक्की करते. पण त्यासाठी नियमीत बचत आणि योग्य फंडची निवड करणे आवश्यक आहे. तर नोकरदार वर्ग मासिक एसआयपीचा पर्याय निवडतात. खात्यात पगार जमा झाल्यानंतर काही दिवसांनी त्यांच्या खात्यातून म्युच्युअल फंडासाठी रक्कम कपात होते. म्युच्युअल फंड निवडीसाठी थोडा अभ्यास आणि तज्ज्ञांचा सल्ला जरुर घ्या. दीर्घकालावधीसाठी बचत केल्यास फायदा होतो.

Non Stop LIVE Update
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.