मुंबई: आपण आतापर्यंत पॅनकार्ड, पीएफ अकाऊंट किंवा बँक अकाऊंट आधारशी लिंक करण्यासंदर्भातील सूचना अनेकवेळा ऐकल्या असतील. या सर्व गोष्टी आधारशी लिंक केल्याने अनेक फायदे मिळू शकतात. केंद्र सरकारकडून पॅनकार्ड, पीएफ अकाऊंट आणि बँक खाते आधारशी लिंक करणे सक्तीचे करण्यात आले आहे. अन्यथा भविष्यात तुम्हाला आर्थिक व्यवहार करणे जवळपास अशक्य होऊन बसेल.
मात्र, तुम्ही एलआयसी पॉलिसी आधारशी लिंक करण्यासंदर्भात कदाचित ऐकले नसले. परंतु, यामुळे अनेक फायदे मिळू शकतात. एलआयसी पॉलिसी आधारशी लिंक करणे बंधनकारक नाही. पण तसे केल्यास जेव्हा पॉलिसीच्या मॅच्युरिटीचा कालावधी पूर्ण होतो तेव्हा पैसे काढणे आणखी सुलभ होते.
एलआयसीच्या केवळ दोन पॉलिसीसाठीच आधार कार्ड बंधनकारक आहे. यामध्ये एलआयसी आधार स्तंभ आणि एलआयसी आधार शिला या दोन योजनांचा समावेश आहे.
LIC पॉलिसी आधारशी लिंक केल्यास तुमची ओळख पटवणे सोपे होते. तसेच एलआयसीलाही ग्राहकाची खात्रीशीर माहिती मिळते. समजा तुमची एलआयसी पॉलिसीची कागदपत्रे हरवली तर अशावेळी पॉलिसी आधारशी लिंक असल्यास फायदा होतो. याशिवाय, पॉलिसीवर कर्ज घेतानाही आधारमुळे फायदा होतो.
तुम्हाला एलआयसी पॉलिसी आधारशी लिंक करायची असल्यास एक रिक्वेस्ट फॉर्म भरावा लागेल. नजीकच्या एलआयसी शाखेत हा फॉर्म मिळेल. तुम्ही ऑनलाईनही हा फॉर्म डाऊनलोड करु शकता. हा फॉर्म भरून एलआयसीच्या कार्यालयात जमा करावा.
संबंधित बातम्या:
आधार नंबर बँक खात्याशी लिंक करा आणि निश्चिंत राहा, बँक खात्याचा गैरव्यवहार रोखण्यास होईल मदत
पॅन-आधार लिंक करणे आवश्यक, परंतु ‘या’ लोकांना सूट, पाहा संपूर्ण यादी
PAN-AADHAR LINK : तुमचा पॅन आधारशी लिंक झाला की नाही? असे चेक करा स्टेटस