Best Multibagger Stock : ‘या’ कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना केले मालामाल, दोन महिन्यांत एक लाखाचे झाले पाच लाख

चालू महिना हा शेअर मार्केटसाठी म्हणावा असा चांगला राहिला नाही. गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडाले. मात्र यात असा देखील एक शेअर्स होता. ज्याने दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधित गुंतवणूकदारांना तब्बल 395.48 टक्के इतका रिटर्न दिला आहे.

Best Multibagger Stock : 'या' कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांना केले मालामाल, दोन महिन्यांत एक लाखाचे झाले पाच लाख
Image Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 29, 2022 | 11:51 AM

Best Multibagger Stock : चालू महिना शेअर बाजारामधील गुंतवणूकदारांसाठी (investors) म्हणावा असा चांगला राहिला नाही. मे महिन्यात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण पहायला मिळाली. सेन्सेक्स घसरल्याने गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडाले. मात्र काही कंपन्यांचे शेअर्स असेही होते, ज्या शेअर्सने गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत मालामाल केले. गुंतवणूकदाराना चांगला परतावा देणाऱ्या शेअर्समध्ये एका पेनी स्टॉकचा (Penny Stock) समावेश झाला आहे. या पेनी स्टॉकने गेल्या दोन महिन्यात गुंतवणूकदारांना तब्बल 400 टक्के परतावा दिला आहे. हा पेनी स्टॉक आहे कोहिनूर फूड्सचा (Kohinoor Foods), 6 एप्रिल 2022 पासून या शेअर्सचे मूल्य सातत्याने वाढतच गेल्याचे दिसून येते. सलग 35 सत्रांत या शेअरमध्ये तेजी राहिली. दोन महिन्यापूर्वी 6 एप्रिल 2022 ला या शेअर्स किंमत अवघी 7.75 रुपये इतकी होती. 27 मे 2022 ला या शेअर्सची किंमत 7.75 रुपयांहून 38.40 रुपयांवर पोहोचली आहे. या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना गेल्या दोन महिन्यात 395.48 टक्के इतका परतावा दिला आहे.

परतावा किती मिळाला?

या शेअरमध्ये दोन महिन्यांपूर्वी जख एखाद्या गुंतवणूकदाराने एक लाख रुपये गुंतवले असतील, तर त्याला आज तब्बल चार लाख 95 हजारांचा परतावा मिळाला आहे. ते देखील दोन महिन्यांपेक्षाही कमी कालावधीत. या शेअर्सने गेल्या दोन महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 395.48 टक्के इतका रिटर्न दिला आहे. एक महिन्यापूर्वी 29 एप्रिलला या कंपनीच्या शेअरमध्ये 147 टक्क्यांची तेजी आल्याचे पहायला मिळाले होते. 29 एप्रिल रोजी या शेअर्सची किंमत 7.75 रुपयांहून 15.55 रुपयांवर पोहोचली. या शेअर्समध्ये वाढ सुरूच राहीली. या आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी या शेअर्सची किंमत ही 7.75 रुपयांहून 38.40 रुपयांवर पोहोचली. या शेअर्समधील गुंतवणुकीमुळे गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

पेनी स्टॉकमध्ये गुंतवणूक जोखमीची

कोहिनूर फूड्सच्या या पेनी स्टॉकने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते अशा स्टॉकमधील गुंतवणुकीत जोखीम अधिक असते. कोहिनूर फूड्स ही कंपनी तांदूळ विक्री आणि उत्पादन क्षेत्रात काम करते. या कंपनीच्ये मुख्यालय हे सोनीपतच्या मुरथलमध्ये आहे. या कंपनीची स्थापना 1989 मध्ये करण्यात आली असून, ही कंपनी जगातील वेगवेगळ्या देशांना तांदुळाची निर्यात करते.

टीप : ही बातमी फक्त माहितीच्या उद्देशाने देण्यात आली आहे. या बातमीला गुंतवणुकीचा सल्ला म्हणून कोणतीही गुंतवणूक करू नये. गुंतवणुकीपूर्वी आपल्या गुंतवणूक तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. टीव्ही 9 मराठी गुंतवणुकीचा कोणताही सल्ला देत नाही.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.