Diwali: हेवा वाटावा अशी दिवाळी..असा अनुभव पुन्हा नाही..चला येथे साजरा करुयात दिव्यांचा सण..

Diwali: प्रकाशपर्वात न्हाऊन निघण्यासाठी ही ठिकाणं आहेत सर्वात बेस्ट..

Diwali: हेवा वाटावा अशी दिवाळी..असा अनुभव पुन्हा नाही..चला येथे साजरा करुयात दिव्यांचा सण..
प्रकाशपर्वाची मेजवाणी Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Oct 20, 2022 | 3:08 PM

नवी दिल्ली : दिवाळीला(Diwali) आता अवघे काही दिवस उरले आहेत. दिवाळीत मुलांना सुट्या (Vacation) लागल्या असतील. तुमच्याही ऑफिसला (Office) ब्रेक लागला असेल. तेव्हा कुटुंबियांसोबत या ठिकाणी दिवाळी साजरी केल्यास डोळ्यांचं पारणं फिटल्याशिवाय राहणार नाही. प्रकाशपर्वात न्हाऊन टाकणारी दिवाळी तुमच्या कायमची आठवणीत राहील.

सुट्यांमध्ये देशात फिरण्याचे प्लॅनिंग करत असाल तर काही शहरातील दिवाळी अत्यंत फेमस असल्याचे तुमच्या लक्षात येईल. याठिकाणी दिवाळी साजरी करण्याची परंपरा आणि प्रथा काही औरच आहे. त्यामुळे तुमच्या डोळ्यांचे पारणं फिटल्याशिवाय राहणार नाही.

आयोध्येतील दिवाळीपर्व काही औरच म्हणता येईल. येथील देव दीपावली सर्वात फेमस आहे. उत्तर प्रदेशातील शरयू नदीच्या काठी प्रभू श्रीरामाच्या भव्य मंदिराचे काम सुरु आहे. लवकरच हे ठिकाणी धार्मिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने महत्वपूर्ण राहणार आहे.

हे सुद्धा वाचा

प्रभू श्रीराम आयोध्येत परतल्यानंतर नगरवासियांनी मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरी केली होती. येथील भव्य घाट आणि त्यावर आरती, दिव्यांची रेलचेल, आकाशात फटक्यांची आतषबाजी हे सर्व अद्भूत असते.

बनारस शहरातील दिवाळीही डोळ्यात साठवण्यासारखी असते. लांबच लांब घाटावर गंगा आरतीचे स्वर आणि गंगेचे खळखळणारं पाणी तुम्हाला शांतीची अनुभूती देते. याठिकाणी खाण्या-पिण्याचीही रेलचेल असते. दिवाळी साजरी करण्यासाठी या सारखं दुसरं सुंदर शहर नाही.

अमृतसरचं स्वर्ण मंदिर देश-विदेशात विख्यात आहे. याठिकाणची दिवाळी चार चांद लावणारी असते. स्वर्ण मंदिराच्या आजुबाजूला फटाक्यांच्या आतषबाजीचा नजारा जबरदस्त असतो. याठिकाणी प्रार्थना करुन तुम्ही सूख-शांतीचा अनुभव घेऊ शकता.

दिवाळीसाठी जयपूर हे शहर ही जबरदस्त डेस्टिनेशन मानण्यात येते. येथील घरे,रस्ते रोषणाईने न्हाऊन निघतात. भरपूर सजावट असते. येथे रस्त्याने फिरण्याची मजा काही औरच असते.

गोवाही दिवाळीसाठी चांगलं डेस्टिनेशन म्हणता येईल. नरक चतुर्दशीच्या दिवशी गोव्यात श्रीकृष्णाने नरकासूरचा वध केला म्हणून राक्षसांचे पुतळे जाळतात. बाकी गोवा एन्जॉय करण्यासाठी हॉट डेस्टिनेशन आहेच.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.