Insurance : तुटू द्या मन वा लूट द्या बँक, या विमा कंपन्या मदतीला धावणार
Insurance : आजकल विमा क्षेत्र विस्तारत आहे. अनेक प्रकारचे विमा बाजारात आले आहे. एवढेच नाही तर ॲड ऑनच्या माध्यमातून तुम्हाला विमा पॉलिसीचा विस्तार करता येतो. आता तर प्रेमभंग, लग्न समारंभाचाही विमा काढता येतो.
नवी दिल्ली : आतापर्यंत तुम्ही अनेक विमा कंपन्या आणि त्यांच्या विविध पॉलिसीविषयी ऐकले असेल. नुकतीच काही दिवसांपूर्वी प्रेमभंग (Heartbreak Insurance Policy) झालेल्या लोकांसाठी विमा पॉलिसी आली आहे. मुलगी वा मुलाने प्रेमात धोका दिल्यास या पॉलिसीअंतर्गत नुकसान भरपाई मिळते. शरीराच्या अवयवांसाठी पण आता विमा पॉलिसी आली आहे. तसेच तुमच्या सौंदर्याचा, शरीराच्या एखाद्या विशिष्ट भागाचा पण तुम्हाला विमा करण्याची सुविधा काही कंपन्या देतात. परदेशात तर आपण विचार केला नसेल, अशा विमा पॉलिसी उपलब्ध आहेत. भारतातही काही विमा कंपन्या निरनिरळ्या विमा पॉलिसीत संरक्षण देत आहेत. त्यामुळे दावा दाखल केल्यास तुम्हाला पॉलिसीअतंर्गत विम्याचे संरक्षण मिळते.
अविश्वसनीय कंपन्या जगात अनेक विमा कंपन्या कशाचा विमा देतील हे काही सांगता येत नाही. काही विमा कंपन्या केवळ ओढांचा विमा देतात. तर काही कंपन्या शरीराच्या एखाद्या विशिष्ट भागाचा विमा काढतात. काही कंपन्या घरातील एखाद्या वस्तूचा तर काही कंपन्या तुमच्या एखाद्या छंदाचाही विमा काढतात. काही गायकांनी त्यांच्या गळ्याचाही विमा काढला आहे. जगात अनेक विमा कंपन्यांनी अविश्वसनीय असा विमा दिला आहे. तसेच त्यांनी दाव्याचा निपटारा पण केला आहे.
प्रेमभंग विमा आजकल प्रेमावरुन लोकांचा विश्वास उडत चालला आहे. त्यामुळे अनेक जण रिलेशनशीपमध्ये एकत्र येतानाच संरक्षण म्हणून विमा काढतात. या दोन्ही पार्टनर इन क्राईममधील व्यक्तींनी जर विम्यात धोका दिला तर याचा फटका ते सहन करु शकणार नाहीत. त्यामुळे अनेकजण आता प्रेमात पडताच प्रेमाचा विमा काढतात. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण भारतात ही असा विमा सुरु झाला आहे. Move on Na असे म्हणत, सॅफरन आणि पॉयोनिअर या सारख्या विमा कंपन्या ही विमा योजना बाजारात दाखल केली आहे. प्रेमात विश्वासघात झाल्यास व्यक्तीला विमा दावा करता येतो.
बॉडी पार्टस विमा वेळेनुसार, आपल्या शरिराचा काही भाग, काही अवयव योग्यरित्या काम करत नाहीत. त्यामुळे ग्राहक आता त्यांच्या अवयवांचा, शरिराराच्या काही भागांचा विमा उतरवितात. त्यामुळे तो अवयव निकामी होत असल्यास, दुखापत झाल्यास विम्याचे संरक्षण मिळते. भारतात काही बॉलिवूड स्टार्सने त्यांच्या अवयवांचा विमा काढला आहे. सानिया मिर्झापासून ते रजनीकांत यांच्यापर्यंत अनेक लोकप्रिय अभिनेते, अभिनेत्रींचा यामध्ये समावेश आहे.
बँक बुडाली तर संरक्षण जर गुंतवणूक करत असलेली बँक बुडाली तर तुम्हाला विम्याचे संरक्षण मिळू शकते. अनेक विमा कंपन्यांना बँकेसंबंधीचा विमा देतात. एखादी बँक बुडाली, दिवाळखोरीत निघाली तर ग्राहकाला 5 लाख रुपयांपर्यंत विमा मिळतो. केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वीच नुकसान भरपाईची रक्कम वाढवली आहे. याशिवाय विमा कंपन्या, आरोग्य, जीवन विमा, अपघात विमा सह अनेक प्रकारचे विमा संरक्षण देतात. त्यामुळे वेळीच विमाधारकाला मोठे आर्थिक नुकसान होत नाही.