Insurance Fraud | स्वस्तात विम्याचे जाळे, अलगद अडकवून खाते करतील साफ सारे

Insurance Fraud | स्वस्तात विमा देण्याच्या भूलथापांना चुकूनही बळी पडू नका. हा स्वस्तातला विमा तुमचे खाते साफ करु शकतो. बोगस विमा एजंटपासून तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे.

Insurance Fraud | स्वस्तात विम्याचे जाळे, अलगद अडकवून खाते करतील साफ सारे
रहा अलर्टImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Aug 23, 2022 | 9:00 AM

Insurance Fraud | स्वस्तात विमा देण्याच्या भूलथापांना चुकूनही बळी पडू नका. हा स्वस्तातला विमा तुमचे खाते साफ करु शकतो. बोगस विमा एजंटपासून तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे. सायबर विमा फसवणूक (Cyber Insurance fraud) प्रकरणे हल्ली वाढली आहेत. स्वस्तात विमा (cheaper Insurance Policy) देण्याच्या आमिषाने तुमचे खाते साफ करण्याचे गंभीर प्रकार देशात वाढले आहेत. बोगस विमा एजंटचे मोठे जाळे पसरले असून अशा जाहिरातीपासून तुम्ही सतर्क राहणे आवश्यक आहे. ऑनलाइन विमा पॉलिसी खरेदी (Online Insurance buy) करताना फसव्या विमा ऑफरला (Insurance Offer) बळी पडू नका. कमी प्रिमियमच्या लोभात तुमचे खूप मोठे नुकसान होऊ शकते. भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) ने अलीकडेच सामान्य नागरिकांना अशा सायबर विमा फसवणुकीविरोधात जागरुक केले आहे. लोकांनी अशा फसव्या विमा ऑफरला बळी न पडण्याचे आवाहन प्राधिकरणाने केले आहे.

अशी होते विमा फसवणूक

भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने विमा फसवणुकीचे प्रकार सांगितले आहेत. त्यात ऑनलाईन विमा फसवणुकीसोबतच इतर ही प्रकारची माहिती देण्यात आली आहे.

माहिती लपवण्याचा प्रकार

काही विमा एजंट तुम्हाला विमा योजनेची योग्य माहिती देत नाहीत. ते माहिती देताना ती लपवतात. विमा कंपनी अथवा विमा एजंट ग्राहकाला उत्पादन खरेदी करण्यासाठी खोट्या थापा मारतो. त्याला बळी पडून ग्राहक विमा खरेदी करतो. परंतू, पुढे त्याची फसवणूक झाल्याचे लक्षात येते. कधी कधी ग्राहक आरोग्य विम्यासाठी तपासणीची खोटी कागदपत्रे जोडतो, ही ग्राहकांकडून कंपनीची फसवणूक असते.

हे सुद्धा वाचा

मध्यस्थाकडून फसवणूक

मध्यस्थी व्यक्तीकडून करण्यात येणारी फसवणूक दुसऱ्या प्रकारात मोडते.विमा एजंट, कॉर्पोरेट एजंट, तृतीय पक्ष प्रशासक आणि मध्यस्थांकडून विमा कंपनी किंवा पॉलिसीधारक किंवा दोघांची यामध्ये फसवणूक करण्यात येते.

अंतर्गत फसवणूक

विमा कंपनीचे संचालक, व्यवस्थापक आणि इतर कर्मचारी सदस्य किंवा अधिकारी यांच्याकडून फसवणूक होते. ती अंतर्गत फसवणूक मानली जाते. यामध्ये ग्राहकाला आणि कंपनी या दोघांना फटका बसतो.

फसवणूक कशी टाळाला

याप्रकरात फसवणूक टाळण्यासाठी ग्राहाकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी त्यांनी विमा एजंटची रीतसर माहिती घेतली पाहिजे. एजंटकडे रक्कम दिल्यानंतर त्याने ती कार्यालयात जमा केली की नाही याची खातरजमा केली पाहिजे. त्याच्याकडे रक्कम जमा केल्याची पावती मागायला हवी.

कोणतीही विमा पॉलिसी ऑनलाईन खरेदीपूर्वी त्या कंपनीची आणि अधिकृत संकेतस्थळाची माहिती असायला हवी. आता चांगल्या कंपन्यांच्या नावे ही बोगस आणि बनावट संकेतस्थळे तयार करण्यात येत आहेत. त्यामुळे ऑनलाईन पेमेंट करताना वेबसाइटचा खरेपणा आणि विमा कंपनी, मध्यस्थ किंवा एजंटचा खरेपणा तपासावा असे आवाहन IRDAI ने केले आहे.अधिक माहितीसाठी, ग्राहक IRDAI च्या policyholder.gov.in/ या संकेतस्थळावरुन माहिती मिळवू शकता.

फोन कॉलवर एजंटची पडताळणी करा. लागलीच कोणतीही कागदपत्रे त्याच्या हवाली करु नका. त्याला तुमच्या बँकिंगची संपूर्ण माहिती देऊ नका. अथवा पेमेंट स्कॅन कोडची तो मागणी करत असेल तर तात्काळ याविषयीची माहिती सायबर पोलिसांना द्या.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.