Masked Aadhaar Card : आधार कार्डबाबत मोठा निर्णय! हॉटेलमध्ये आता आधारची गरज नाही, जाणून घ्या केंद्राचा नवा नियम
सायबर कॅफेमध्ये जाऊन तुम्ही कधीही तुमचे आधार कार्ड डाऊनलोड करू नये.
मुंबई : कोणताही व्यवहार करायचा असल्यास आधार कार्डची (Aadhaar Card) गरज पडतेच. आधार कार्ड हे अत्यंत महत्त्वाच्या ओळख पुराव्यांपैकी एक आहे. ज्या प्रकारे सुरूवातील मतदान कार्डचा वापर व्हायचा. तशाच प्रकारे आता कुठेही गेलं तरी आधार्ड कार्ड विचारतातच. कोणत्याही शासकीय योजनेचा (government scheme) लाभ घेणं असो वा कोणताही आर्थिक व्यवहार करणं असो. अनेक महत्त्वाच्या कामांसाठी या कार्डची गरज पडते. त्यासाठी वारंवार आधार कार्डच्या झेरॉक्स कॉपी आपण काढून ठेवतो. पण, हे धोकादायक ठरू शकतं. आधार कार्ड हा तुमच्या ओळखीचा पुरावा आहे. त्यात 12 अंक असतात. हे अंक तुमची बायोमेट्रिक ओळख सुनिश्चित करण्याचं काम करतात. अशा परिस्थितीत आधार कार्ड वापरताना अनेक गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. अनेकदा आपण आपल्या आधार कार्डची प्रत कोणाहीसोबत कुठेही शेअर करतो. तुम्ही देखील ही चूक करत असाल तर तुम्ही तातडीनं सावध व्हायला हवं. तुमच्या या निष्काळजीपणामुळे मोठं नुकसान होऊ शकतं. याबाबत केंद्र सरकारनं (Central Goverment) एक नवा नियम काढला आहे. विशेष म्हणजे याच वेळी केंद्रानं सावध इशारा देखील दिला आहे.
आधार कार्डबाबत मोठा निर्णय!
Citing misuse, UIDAI suggests sharing ‘masked’ Aadhaar instead of photocopies
Read more @ANI story | https://t.co/FgpTVbuxJp#AadharCard #UADAI pic.twitter.com/EgLq2cWysg
हे सुद्धा वाचा— ANI Digital (@ani_digital) May 29, 2022
कुणालाही आधार कार्ड देऊ नका!
आधार कार्डची प्रत कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेला शेअर केल्यास त्याचा गैरवापर होऊ शकतो, असं केंद्र सरकारनं सांगितलं आहे. कारण, आपण कुठेही आपले आधार कार्ड अगदी विश्वासानं देतो. पण, हीच गोष्ट धोकादायक ठरू शकते. यामुळे आपल्या मोठं नुकसान देखील सहन करावं लागू शकतं.
कोणतं आधार कार्ड द्याल?
तुमच्या आधार कार्डवर 12 अंकी संख्या असते. या संख्येवरुन तुमची ओळख असते. आता हीच संख्या पूर्ण दिसणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे. आधार कार्डचं सध्या असं स्वरुप आलंय की आधार कार्डमध्ये आता पूर्ण संख्या दिसत नाही. मास्क केलेल्या आधारमध्ये आधार क्रमांकाचे फक्त शेवटचे 4 अंक दिसतात. तुम्ही मास्क केलेले आधार कार्ड ऑनलाइन सहज डाऊनलोड करू शकता.
सायबर कॅफेमधून आधार कार्ड डाऊनलोड करू नका
सायबर कॅफेमध्ये जाऊन तुम्ही कधीही तुमचे आधार कार्ड डाऊनलोड करू नये. जर तुम्ही सायबर कॅफेला जाऊन तुमचे आधार कार्ड डाउनलोड करत असाल तर अशा परिस्थितीत तुम्ही संगणकातील आधार कार्डची डाऊनलोड केलेली फाईल कायमची डिलीट करावी.
मास्क आधार कार्ड कसं डाऊनलोड कराल
- तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जा
- याठिकाणी जाऊन ‘आधार डाउनलोड करा’ हा पर्याय निवडावा लागेल
- त्यानंतर ‘Aadhaar/VID/Enrollment ID’ या पर्यायावर क्लिक करा
- ‘मास्क केलेले आधार कार्ड’ या पर्यायावर क्लिक करा.
- आता तुम्हाला महत्त्वाची माहिती जसं की आधार क्रमांक इत्यादी भरावी लागेल
- यानंतर ‘OTP विनंती’ या पर्यायावर क्लिक करा
- तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक वन टाईम पासवर्ड येईल
- यानंंतर आधार कार्डशी लिंक केलेला नंबर जो तुम्हाला टाकावा लागेल
- त्यानंतर ‘आधार डाउनलोड करा’ वर क्लिक करा
- असे केल्याने तुमचे मुखवटा घातलेले आधार कार्ड सहज डाउनलोड केले जाईल.